बातमी लेखन / वृतांत लेखन १० वी २०२१
महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या गांधी जयंतीचे बातमी लेखन / बातमी लेखन मराठी १०वी मराठी / News writing in Marathi language / News writing 10th in Marathi / तुमच्या शाळेत साजरा केलेल्या बालदिनाचा वृतांत लिहा.
१) तुमच्या शाळेत साजरा करण्यात आलेल्या बालदिनाचा वृतांत वृत्तपत्रात देण्यासाठी तयार करा.
रत्नागिरीतील शारदा विद्यालयात
बालदिन उत्साहात साजरा.
रत्नागिरी, १५ नोव्हेंबर:
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील रत्नागिरीच्या शारदा विद्यालयात बालदिन उत्साहात
साजरा करण्यात आला. यावर्षी बालदिनानिमित्त अनेक उपक्रम घेण्यात आले. प्रत्येक
वर्गामध्ये आयोजित करण्यात आलेला कागदी गुलाब बनवण्याचा कार्यक्रम यावर्षीचा मुख्य
आकर्षण ठरला. प्रत्येक वर्गातील
विद्यार्थ्यांनी बनवलेले उत्कृष्ट गुलाब वर्ग शिक्षकांनी या कार्यक्रमात सादर
केले. बालदिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्गातील मुलांनी बनवलेल्या कार्यानुभव
विषयाच्या वस्तू, चित्रे, यांचे छोटे प्रदर्शन शाळेच्या मुख्य सभागृहात भरवण्यात
आले होते. या कार्यक्रमाला इतर वर्गातील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. सकाळी
ठीक ११ वाजता शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या
कार्यक्रमात वर्षभर विद्यार्थ्यांनी केकेल्या विविध कामांसाठी मुलांना पुरस्कार
देण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रमुख पाहुणे तसेच नगराध्यक्ष श्री. निखील
तेंडूलकर यांनी केलेल्या प्रेरणादायक भाषणांनी या कार्याक्रमाची सांगता झाली.
तुमच्या शाळेत साजरा केलेल्या बालदिनाचा
वृतांत लिहा.
वृतांत लेखन १० वी
बातमी लेखन मराठी १० वी मराठी
२०२१
वृतांत लेखन १०वी मराठी
News writing Marathi
२) तुमच्या महाविद्यालयात साजरा करण्यात आलेल्या गांधी जयंतीचा वृतांत तयार करा.
रत्नागिरी, ३ ऑक्टोबर : रत्नागिरीतील नवोदय महाविद्यालयात २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आगळ्या वेगळा पद्धतीने साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील सूचना फलकावर महात्मा गांधीजींची चित्रे आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे काही क्षण यावर आधारित लेखांचा समावेश केला होता. गांधी जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. त्यासाठी महाविद्यालयाकडून झाडू, कचऱ्याचे डबे इत्यादी साहित्य देण्यात आले होते. या उपक्रमात परिसरातील लोकांनीही आपला सहभाग दर्शवला होता. स्वच्छता उप्क्रमान्न्तर सर्व विद्यार्थी शाळेच्या मुख्य सभागृहामध्ये एकत्र आले. या ठिकाणी विविध गाणी, भजने, देशभक्तीपर गीते. यांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. गोरे सर यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या साठ आणि अहिंसा या मुल्यांची माहिती करून दिली. जाती धर्माकडे दुर्लक्ष करून सर्वांना समानतेची वागणूक दिली गेली पाहिजे असेही त्यांनी या वेली बोल्तानन सांगितले. गांधी जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी खाडी पासून बनलेले कपडे परिधान केले होते. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊचे वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
बातमी लेखन कसे करावे त्यात कोणते मुद्दे असावेत हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
वृत्तांत लेखन म्हणजे काय ? वृत्तांत लेखन कसे करावे ?
बातमी लेखनाचे अजून काही नमुने पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महाविद्यालयात साजरा झालेल्या वर्षा महोत्सवात वृत्तांत | महाविद्यालयात रेड रिबिन क्लब चे उद्घाटन झाले त्याचा वृत्तांत
प्रजासत्ताक दिन वृतांत लेखन | वृक्षारोपण वृतांत लेखन | स्पर्धेचे वृतांत लेखन
वृत्तांत लेखन म्हणजे काय ? वृत्तांत लेखन कसे करावे ?