भारतीय स्त्रियांची स्थिती - तेव्हा आणि आत्ता.
मराठी निबंध भारतीय स्त्रियांची स्थिती तेव्हा आणि आत्ता / आजची भारतीय स्त्रियांची स्थिती मराठी निबंध / वैचारिक निबंध लेखन मराठी / १०वी मराठी निबंध २०२१ / Bhartiy striyanchi sthiti tevha aani atta Marathi nibandh / Marathi nibandh bhartiy striyanchi sthiti tevha aani atta / Aajchi bhartiy striyanchi sthiti Marathi nibandh
आजपासून सुमारे ६०-७० वर्षांपूर्वी भारतीय समाज हा पूर्णपणे पुरुष प्रधान होता. घरामध्ये पुरुषांच्या इच्छेनुसार सारी कामे पार पाडली जात असत. घरातील मुख्य माणसाच्या आदेशाचे सर्वांना पालन करायला लागत असे. काही वेळेला तर स्त्रियांना पुरुषांचा त्रास देखील सहन करावा लागत असे.
भारतीय स्त्रियांची स्थिती - तेव्हा आणि आत्ता मराठी निबंध
हा तेव्हाचा काळ होता जेव्हा
आपल्या स्त्रिया शिक्षण क्षेत्रामध्ये खूपच मागे होत्या. त्यांचे सारे जीवन घरातील
जबाबदार्या आणि कामे पार पडता पडता निघून जात असे. पिंजर्यातील पक्ष्याप्रमाणे
त्यांना त्यावेळी बाहेरच्या जगाचे ज्ञान नव्हते. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही
काम करता येत नसे. त्या काळी लॉक आपल्या घरातील मुलींना शाळेत पाठवत नसत. अगदी
पाठवलेच तर पाचवी ते सहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर त्यांचे शिक्षण बंद होत असे.
स्वयंपाक, धुणीभांडी, विणकाम, शिवणकाम यामध्ये पारंगत असणे हेच मुलींसाठी त्या
वेळी महत्वाचे मानले जायचे. मुलींचे लग्न हे घरातील मोठी माणसेच ठरवत असत.
शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार
झाल्यामुळे आज स्त्रियांची पूर्वीची स्थिती पूर्णपणे बदलून गेली आहे. आज भारतीय
स्त्रिया पुरुषांच्या मर्जीच्या गुलाम नाही आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या
आपल्या आवडीला महत्व देतात. आजची स्त्री ही उच्चशिक्षण प्राप्त करण्यावर जास्त भर
देत आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने काम करताना
दिसत आहेत. त्या आज कॉलेज मध्ये शिक्षक तसेच मुख्याध्यापाच्या पदावर आहेत;एवढेच
नाही तर आज न्यायालयांमध्ये वकील आणि न्यायाधीशाचा पदभार देखील आजच्या स्त्रीने
स्वीकारला आहे. आजची स्त्री ही भूदल-नौदल आणि त्याच प्रमाणे वायुदलामध्ये देखील
कार्यरत आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, यांसारख्या खेळांमध्ये आज पुरुषांच्या
बरोबरीने स्त्रियांचे संघ सुद्धा आहेत.
राजकारणामध्ये देखील त्या
पुरुषांच्या मागे नाहीत. विधानसभा आणि लोकसभा तसेच राज्यसभेच्या सदस्यांच्या
खुर्चीवर विराजमान आहेत. श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या रुपामध्ये तिने देशाचे राष्ट्रपती
पदसुद्धा सुशोभित केले आहे. विदेशांत सुद्धा स्त्रियांना उच्च पदावर विराजमान केले
जात आहे.
या प्रकारे स्वतंत्र झाल्यावर
भारतीय स्त्री पिंजऱ्यातून बाहेर पडून मोकळ्या आकाशात मनमोकळेपणाने सैर करीत आहे.
भारतीय स्त्री च्या तेव्हाच्या आणि आत्ताच्या स्तीतीमध्ये जमीन-आसमानाचा फरक झाला
आहे.
हा निबंध लिहित असताना खाली
दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.
[मुद्दे:
पुरुषप्रधान भारतीय समाज
स्त्रियांच्या इच्छांना काही
महत्व नाही.
वर्तमानात स्त्रियांच्या
स्थितीमध्ये बदल
राजकीय क्षेत्रामध्ये ही मागे
नाही
स्थितीमध्ये जमीन अस्मानाचा फरक
शेवट.]