BUY PROJECT PDF Click Here!

पाणी टंचाई प्रकल्प पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी | Pani tanchai prakalp paryavarn jalsuraksha prakalp 11th 12th

पाणी टंचाई प्रकल्प ११वी १२वी पाणी टंचाई प्रस्तावना पाणी टंचाई प्रकल्प उद्दिष्टे पाणी टंचाई प्रकल्प निरीक्षणे पाणी टंचाई समस्या व उपाय माहिती
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 पाणी टंचाई प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प 


पाणी टंचाई प्रकल्प ११वी १२वी
पाणी टंचाई प्रस्तावना
पाणी टंचाई प्रकल्प उद्दिष्टे
पाणी टंचाई प्रकल्प निरीक्षणे
पाणी टंचाई समस्या व उपाय माहिती 

या वरील मुद्द्यांच्या आधारे आपण या लेखात माहिती घेणार आहोत. ही माहिती प्रकल्प विद्यार्थ्यांना प्रकल्प करताना उपयुक्त ठरेल.

माहिती आवडल्यास आम्हाला तुमच्या पतिक्रिया कमेंट द्वारे सांगा.

पाणी टंचाई पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी 

प्रकल्प फ्री pdf फाईल लिंक उपलब्ध आहे. 
पाणी टंचाई प्रकल्प ११वी १२वी पाणी टंचाई प्रस्तावना पाणी टंचाई प्रकल्प उद्दिष्टे पाणी टंचाई प्रकल्प निरीक्षणे पाणी टंचाई समस्या व उपाय माहिती  Pani tanchai prakalp 11th 12th Pani tanchai prakalp prastavana Pani tanchai prakalp nirikshane Pani tanchi samashya v upay mahiti Paryavarn prakalp 11vi 12vi

पाणी टंचाई प्रकल्प पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प  ११वी १२वी 


पाणी टंचाई प्रकल्प प्रस्तावना 

                माणसाला त्याच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पाण्याची गरज  भासते. मोठ्या प्रमाणवर पाणी हे आपल्याला पावसामुळे मिळते आणि नंतर ते जलस्त्रोतांच्या माध्यमातून तेच पाणी मानवाला मिळते. पण आजचे पाण्याचे चित्र पहिले तर हेच जलस्त्रोत कोरडे पडताना दिसत आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर  टंचाई भासत आहे. दैनंदिन जीवनात पाण्याला मोलाचे  महत्व आहे. पृथ्वीतलावर अस्तित्वात असणारी सजीवसृष्टी ही पाण्यामुळेच अस्तित्वात आहे. मानवी जीवनाचा जगण्याचा आधार हे पाणी आहे.


                रोज विविध मार्गांनी पाण्याचा अपव्यय होत असतो पाणी वाया जात असते. हेच पाणी वाया जाऊ नये यासाठी उपाययोजना आहेत. या उपाययोजना राबवण्यासाठी आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात विशेष बदल घडवून आणण्याची गरज नाही. आज गरज आहे ती फक्त आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याची. निसर्गाने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या या संपत्तीचा जर आपण योग्य पद्धतीने नियोजन करून वापर केला नाही तर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण सगळेच जाणतो.


                        आज आपण पाणीटंचाईवर उपाययोजना केल्या नाही, तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला मोठ्या प्रमाणवर पाणी टंचाई चा सामना करावा लागेल. हे सर्व थांबवायचे असेल तर पाणी टंचाईची कारणे जाणून घेऊन त्यावर उपाय-योजना करणे गरजेचे आहे.


                आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण ‘पाणी टंचाई आणि उपाय’ या बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

पाणी टंचाई प्रकल्प ११वी १२वी पाणी टंचाई प्रस्तावना पाणी टंचाई प्रकल्प उद्दिष्टे पाणी टंचाई प्रकल्प निरीक्षणे पाणी टंचाई समस्या व उपाय माहिती  Pani tanchai prakalp 11th 12th Pani tanchai prakalp prastavana Pani tanchai prakalp nirikshane Pani tanchi samashya v upay mahiti Paryavarn prakalp 11vi 12vi


अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

पान नं.

१)

विषयाचे महत्व

 

२)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

३)

पाण्याची उपलब्धता

 

४)

पाणी टंचाईची कारणे

 

५)

पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना

 

६)

निरीक्षण

 

७)

निष्कर्ष

 

८)

संदर्भ

 

९)

प्रकल्पाचा अहवाल

 



पाणी टंचाई  विषयाचे महत्व

 

                आजकाल मार्च-एप्रिल महिना चालू झाला न झाला तोच मोठ-मोठ्या शहरांना तसेच खेडेगावांना पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागतात. दिवसेंदिवस पाणी टंचाई चा हा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे. यावर जर वेळीच लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाही तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये पाणी टंचाई ही समस्या फार मोठे उग्र रूप धारण करू शकते.


                आपण जे पाणी वापरतो त्यासाठी आपण अगदी कमी मोबदला देतो. त्यामुळे पाण्याची आपल्याला किंमत राहिलेली नाही. पाणी जे सरकारमार्फत घराघरांत पोहोचवलं जातं, त्यासाठी पैसे आकारले जातात पण जे पाणी नागरिकांकडून वापरल्यानंतर गटारांत सोडले जाते त्या पाण्यावर जेव्हा कर आकाराला जाईल त्यावेळी पाणी वाया घालवण्यावर नियंत्रण मिळेल. तेव्हाच नागरिकांत पाण्याविषयी जागरुकता निर्माण होईल.


                आजच्या या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी पाणीटंचाई ची कारणे कोणती आहेत व त्यावर कोणत्या उपाययोजना आहेत यांची सर्वानी माहिती करून घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणून आज पाणी टंचाई या विषयाचा अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे.



पाणी टंचाई प्रकल्पाची उद्दिष्टे


Ø पाणीटंचाई च्या कारणांचा शोध घेणे.

Ø पाण्याच्या सध्याच्या उपलब्धतेचा आढावा घेणे.

Ø पाणी टंचाई समस्या दूर करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांची माहिती मिळवणे.

Ø पाणी टंचाई आणि त्यावरील उपाययोजना याबाबत माहिती सर्वाना करून देणे.

Ø पाणी टंचाईच्या कारणांचा शोध घेऊन त्या कारणांवर उपाययोजना माहित करून घेणे.

 

पाण्याची उपलब्धता


                पाण्याशिवाय या पृथ्‍वीवर सजीव सृष्टीचे जीवन अशक्य आहे. गोडे पाणी हा एक पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. गोड्या पाण्याशिवाय वनस्पती ,प्राणीतसेच इतर सजीव जिवंत राहू शकत नाहीत. मानवाला पिण्यासाठी पाणी आवश्यक आहेच पण त्याचप्रमाणे , शेतीसाठी, उद्योग चालविण्यासाठी आणि जलविद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पाणी हे पृथ्‍वीवरील अत्‍यावश्यक असे नैसर्गिक संसाधन आहे. पाण्यावरच पृथ्वीवरील सर्व प्राणी आणि  वनस्‍पतींचे जीवन अवलंबून आहे. पृथ्‍वीचा सुमरे ९७% भाग हा पाण्याने व्यापेलेला आहे. बहुतांश प्राणी व वनस्‍पतीा यांच्या शरीरात ६०-६५% पाणी असते.

 

                जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी सुमारे ५५ % पाणी हे बाष्पीभव झाल्यामुळे नष्ट होते. पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त बाष्पीभवन २७०० मिलीमीटर व कमीत कमी १४०० मिलीमीटर इतके प्रतिवर्षी होत असते.

 

                १९७१ साली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला एका वर्षासाठी ३२५३ घ.मी. इतके पाणी उपलब्ध होते. परंतु पाण्याच्या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे आणि वाढलेल्या लोकसंखेमुळे हेच प्रमाण कमी होऊन ते सन २०११ झाली १४५९ इतके कमी झाले. आज अशी भिती व्यक्त करण्यात येते आहे की, २०६१ पर्यंत पाण्याची पातळी प्रती व्यक्ती ६६७ घ.मी वार्षिक इतकीच. फाल्कनमार्क या स्वीडीश जलतज्ज्ञाने पाण्याच्या उपलब्धतेविषयी काही मापदंड प्रकाशित केले आहेत आणि ते जगमान्य आहेत. त्यानुसार १७०० घनमिटर पाण्याची उपलब्धता प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी असेल तर ती बाब संतोषजनक मानली जाते. याच पातळीचे प्रमाण १००० ते १७०० इतक्या प्रमाणावर कमी झाले तर त्या अवस्थेला 'वॉटर स्ट्रेस' असे म्हटले जाते आणि जर हीच १००० पेक्षाही कमी झाल्यास त्याला 'वॉटर स्केर्स' असे म्हणतात. म्हणजेच २०६१ च्या जवळपास महाराष्ट्रातील पाण्याची पातळी अतिशय कमी होणार आहे.

 

 Pani tanchai prakalp 11th 12th / Pani tanchai prakalp prastavana / Pani tanchai prakalp nirikshane / Pani tanchi samashya v upay mahiti / Paryavarn prakalp 11vi 12vi

 

पाणी टंचाईची कारणे

व्याख्या :

पाणी टंचाई म्हणजेच पाण्याची असणारी गरज व उपलब्ध पाणी यांतील असमानता.

पाणी टंचाईच्या कारणांची  2 गटांत विभागणी केली जाते. – 

१)निसर्ग निर्मित दुष्काळ

     २) मानव निर्मित दुष्काळ.

 

पाणी टंचाईची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१) निसर्ग निर्मित  पाणीटंचाई :

 

१. पर्जन्यछायेचा परिणाम :

                पर्जन्य छायेचा परिणाम म्हणजे पर्वत रंगांच्या मागे असणारा  कोरडा प्रदेश, मोठ्या आणि उंच पर्वतांमुळे पावसाच्या  ढगांच्या मार्गात अडथला निर्माण होत असतो. पाण्याचा अंश ज्या बाष्पकणांत जास्त आहे ते  पर्वताच्या उंच भागाकडे हवेच्या वेगामुळे ढकलले जातात आणि  मग तापमान कमी झाल्याने असे ढग पर्वतांवर पाऊस पडतात. या ढगांतील पाणी कमी होऊन ते ढग शुष्क होतात आणि नंतर पर्वताच्या मागील भागात येतात आणि अशारितीने पर्जन्यछाया तयार होते.

 

२. कमी पावसाचे प्रमाण :

                भारतामध्ये दरवर्षी समाधानकारकरित्या पाऊस पडतो. संपूर्ण जगामध्ये भारत याबाबत ९ व्या क्रमांकावर आहे. भारतात दरवर्षी समाधानकारक पाऊस होत असला तरीही पावसाच्या वितरणामध्ये, स्थळ व काळ यांमध्ये फार फरक पाहायला मिळतो. जेव्हा उत्तर पूर्व भागांतील  नद्यांना जेव्हा उदा. ब्रम्हपुत्रा नदीला पूर येतो, तेव्हा देशातील इतर भागांतील नद्यांमध्ये पाणी कमी असते. जर पूर्वेकडील चेरापुंजीला सर्वात जास्त पाऊस पडला तर त्याचवर्षी पश्चिमेकडील राजस्थानमधील भागांत पावसाची प्रमाण सर्वात कमी असते. देशात पावसाचे वितरण असमान आहे. एखाद्या वर्षी जर १५ % जरी पाऊस कमी पडला तर देशात २/३ इतक्या भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते.  आणी त्यामुळे सुमारे २५००० कोटी रुपयांचे नुकसान होते.

 

३. ग्लोबल वॉर्मिंग :

                पाण्याच्या टंचाईमध्ये सर्वात जास्त परिणाम हा ग्लोबल वॉर्मिंग मुळे होऊ लागला आहे. जागतिक तापमानात फार थोडा जरी फरक पडला तरी त्यामुळे ऋतुचक्र पूर्णपणे बिघडून जाते आणि; त्यामुळे पुन्हा पावसाचे प्रमाण कमी होते. व दुष्काळ सदृष्य परिस्थिती उद्भवते. पाऊस कमी पडल्यामुळे कृषी उत्पादन कमी होते व भूकबळींची संख्या वाढते. कोरड्या भागात दुष्काळ परिस्थिती नव्या वाळवंटाची निर्मिती करते.

 

 २)   मनुष्य निर्मित पाणीटंचाई :

 

१.     कमी होणारी भूगर्भ पाण्याची पातळी :

                जल संधारणाच्या व्यवस्थेअभावी पावसाचे पाणी समुद्रात तसेच नदीच्या प्रवाहात रन - ऑफद्वारे मोठ्या प्रमाणावर वाहून जात असते. पावसाचे पाणी जमिनीत झिरपत नसल्याने त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. यामुळेसुद्धा भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याची टंचाई जाणवते.


२.    सदोष सिंचन ( वेस्टफूल ईरिगेशन) :

                कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणवर पाण्याचा वापर केल्यामुळे नद्या, तलाव व भूगर्भातील पाण्याचे साठेआटू लागतात. महाराष्ट्रात उसासारखी जास्त पाण्याची तहान असलेली पिके घेण्यात येतात. त्यामुळे सुद्धा पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो.

 

शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेतील गळत्या :

                ज्या पाण्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रांना उत्पन्न मिळत नाही त्याला गैरमहसूली पाणी असे म्हटले जाते. २००६ च्या जागतिक बँकेच्या सर्वेक्षणानुसार जगामध्ये ७०००० कोटी रूपयांचे नुकसान हे पाण्याच्या गळत्यांमुळे होत असते आणि त्यातील १/३ एवढे प्रमाण विकसनशील देशांमध्ये होत असते. विकसनशील राष्ट्रात दरवर्षी ४५ दशलक्ष घ.मी. पाणी विविध प्रकारच्या गळत्यांमुळे वायाजाते. त्या पाण्याची बचत केली तर सुमारे २० कोटी लोकांची पाणी पुरवठ्याची समस्या दूर होऊ शकते.

पाणी टंचाई प्रकल्प ११वी १२वी / पाणी टंचाई प्रस्तावना / पाणी टंचाई प्रकल्प उद्दिष्टे / पाणी टंचाई प्रकल्प निरीक्षणे / पाणी टंचाई समस्या व उपाय माहिती 

 पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना


१. रेन हार्वेस्टिंग :

                रेन हार्वेस्टिंग हा पाणी टंचाई असलेल्या भागांत पाण्याच्या समस्यांवर मत करण्यासाठी एक उत्तर उपाय आहे. रेन हार्वेस्टिंग चे योजना तयार करत असताना इमारतीची बांधणी करते वेळी इमारतीच्या मध्यभागी साधारण ३ लक्ष क्षमतेची पाणी साठवण्याची टाकी बांधली जाते गरजेनुसार या टाकीचा आकार लहान अथवा मोठा असू शकतो. इमारतीच्या छप्परावर पडणारे पावसाचे पाणी गटारांत सोडून न देता ते पाईपद्वारे या पाण्याच्या टाकीत सोडले जाते. पावसाला सुरुवात झाल्यावर एक दोन वेळा मोठ्या पावसाने छप्पर स्वच्छ होईपर्यंत पाणी बाहेर सोडले जाते त्यानंतर चे पावसाचे आणि हे टाकीत सोडले जाते. टाकीतील  पाण्याचा उपयोग हा स्वच्छता गृहांसाठी केला जातो. या व्यतिरिक्त इमारतीच्या परिसरात असणाऱ्या बागांना आणि झाडांसाठी हेच पाणी वापरात आणले जाते. किमान ७ ते ८ महिने पाणी पुरेल इतका पाणीसाठा असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गरज पडल्यास हेच पाणी योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करून पिण्यासाठी देखील वापरण्यात येते.

 

२. वॉटर ग्रीड :

                गुजरात मध्ये असणारे ग्रीड हे वॉटर ग्रीडचे एक उत्तम उदाहरण आहे. यामध्ये नर्मदा नदीचे पाणी हे पश्चिम दिशेला असणाऱ्या कच्छच्या भागात, ज्या ठिकाणी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात पडतो आणि महाराष्ट्रात पर्जन्यछायेच्या प्रदेशांपेक्षा ज्या ठिकाणी भीषण परिस्थिती आहे.त्या भागांना कालव्यांद्वारे हे पाणी पुरवले जाते अशा प्रकारच्या वॉटर ग्रीड योजना महाराष्ट्रामध्ये सहजपणे राबता येतील. वॉटर ग्रीड करत असताना त्या कालव्यांद्वारे न  करता त्यासाठी बंद पाईप चा वापर केला जावा जेणेकरून त्यांतून गळती होणार आणि बाष्पीभवन होऊन पाणी वाया जाणार नाही. आणि पाण्याची गुणवत्ता त्यमुळे टिकून राहील.

 

३. सिंचनाचे मापदंडात न बसणारी धरणे बांधणे :

                 ज्या ठिकाणी धरणे बांधणे शक्य आहेत त्या ठिकाणी सिंचन विभागाने धरणे बांधणे आवश्यक आहे. अनेक संभाव्य धरणांची जागा सोडून दिलेली आहे. जर य ठिकाणी पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी धरणे बांधली तर जलसंपदा विभागाने बांधलेल्या धरणांवर ताण येणार नाही. या प्रकारची धरणे ही दुष्काळप्रवण प्रदेशांमध्ये प्राधान्याने बांधणे गरजेचे आहे.

 

4. नवीन तंत्रज्ञान वापरणे :

                धरणात पाणी किती प्रमाणात आहे हे समजण्यासाठी GRAS (जिओग्राफीक इंफर्मेशन सिस्टीम) आणि सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा अॅक्विझीशन (स्काडा) यांसारख्या नवनवीन तंत्रज्ञानांचा उपयोग करणे गरजेचे आहे.अशा आधुनिक तंत्रज्ञानाने धरणांच्या पाण्याची पातळी मंत्रालयात असणाऱ्या अधिकाऱ्यांना, संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांना आणि  पाणी पुरवठ्याचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही माहिती अगदी सहजपणे दिसू शकेल. जिल्हाधिकारी कार्यालयात डिजीटल बोर्डवर धरणांमध्ये उपलब्ध असेलेली पाण्याची पातळी दाखविण्यात यावी, म्हणजे जागरूक नागरिकांना ती दिसेल व धरणातून अवैधरित्या पाणी उचलावर याद्वारे प्रतिबंध आणता येईल.

 

5. शहरी पाणी पुरवठ्यामधील सुधारणा:

                महाराष्ट्रामध्ये शहरीकारणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातून शहराकडे मोठ्या प्रमाणवर स्थलांतर झाल्यामुळे शहरांतील लोकसंख्या वेगाने वाढणे त्याचबरोबर  त्यांची पाण्याची गरज सुध्दा वाढणे हे साहजिकच आहे. परंतु आज शहरांच्या पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी असलेल्या पाहायला मिळतात.


  • पाणी पुरवठ्यामधील त्रुटी :

                महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांच्या पाणी वितरण व्यवस्था या सुमारे २५ते २६  वर्षांपेक्षा जुन्या आहेत. त्यामुळे पाणी वाहून नेणाऱ्या पाईपांमधून बऱ्याच प्रमाणात गळत्या होत असतात. शहराबाहेरील भाग हा कालांतराने शहराचाच भाग बनत जातो. अशा ठिकाणी अॅस्बेस्टॉस सिमेंट व पीव्हीसी पाईप यांचा वापर केला जातो. हे पाईल कमी खोलीवर टाकले गेले असतील तर त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे असे पाईप फाटतात किंवा त्यांचे जॉइंट एकमेकांमधून निघतात. पर्यायाने पाण्याची गळती होत असते.

 

 

·       अस्ताव्यस्त पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था :

                शहरांमध्ये पाणी वितरणाचे पाईप हे बेशिस्तीने टाकले आहेत. एकाच जागी दोन - तीन पाईपलाईन्स आपल्याला टाकलेल्या दिसतात. योग्य पद्धतीने अभ्यास केला असता तर या अनेक पाईप ऐवजी एकच योग्य व्यासाची पाईपलाईन टाकणे शक्य होते. अनेक पाईप्समुळे शहराच्या काही भागात पाणी कमी दाबाने पोहचते तर काही भागात जास्त दाबाने पोहचते. असे झाल्याने पाण्याचे वितरण असमानरित्या होते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शहरे या त्रासाचा सामना करीत आहेत. यावर उपाय योजना म्हणजे पाणी पुरवठ्याचे शास्त्रोक्तरित्या जीआयएस नकाशे तयार करून शहराच्या पाणी पुरवठ्याचा अभ्यास 'हायड्रॉलिक वॉटर सिम्युलेशन’ द्वारे करावा.

 

6. दूषित पाण्याचा पुनर्वापर:

                शेतीसाठी तसेच उद्योग धंद्यांसाठी पाण्याचा वापर आज मोठ्या प्रमाणत होत आहे. उद्योगधंद्यासाठी वापरले गेलेले पाणी हे नदीत सोडले जाते. याचा परिणाम परिसरातील लोकांच्या आरोग्यावर झालेला दिसून येतो. अशा प्रकारच्या दूषित पाण्यामुळे महाराष्ट्रासह नदीकाठी वसलेल्या शहरांमधील लोकांना देखील मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला तर त्याचा फायदाच होणार आहे. शेतीसाठी तसेच स्वच्छतेसाठी  या पाण्याचा वापर होऊ शकतो. यासाठी प्रत्येक कारखान्यांनी पाण्याची प्रक्रिया यंत्रणा बसविण्याची गरज आहे.

 

7. जलसाक्षरतेची गरज:

            दूरदृष्टी असलेले लॉक गावात असतील तर तर बदल हा नक्कीच पाहायला मिळतो. पाण्याचे काटेकोर नियोजन करून गावातील पाण्याच्या समस्यांवर पूर्णपणे तोडगा काढणे आणि त्याचबरोबर लोकांच्या सहभागातून गावाचा विकास देखील साधने या दोन्हीही गोष्टी सध्या करून दाखवलाय त्या हिवरे बाजार या अहमदनगर नगर जिल्ह्यातील गावाने.

            अशा प्रकारे सर्व गावांनी लोकसहभागातून योग नियोजन करून आपल्या गावातल्या पाण्याच्या समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे.

 

८. पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती:

                    आपल्या देशात उपलब्ध असणाऱ्या पाण्यापैकी सर्वाधिक पाण्याचा वापर हा शेतीसाठी होतो. पण शेतीसाठी पारंपरिक पद्धती सोडून ठिबक तसेच तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊन त्यात चारपट पीक घेता येऊ शकतं.  

 

 

पाणी टंचाई  निरीक्षणे

 

*   पाणी टंचाईची कारणे

१.     पर्जन्यछायेचा परिणाम

२.    कमी पावसाचे प्रमाण

३.    ग्लोबल वॉर्मिंग

४.   कमी होणारी भूगर्भ पाण्याची पातळी  

५.   सदोष सिंचन पद्धती

६.    शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेतील गळत्या

 

*   पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना

१.     रेन हार्वेस्टिंग

२.    वॉटर ग्रीड

३.    सिंचनाचे मापदंडात न बसणारी धरणे बांधणे

४.   नवीन तंत्रज्ञान वापरणे

५.   शहरी पाणी पुरवठ्यामधील सुधारणा

६.    दूषित पाण्याचा पुनर्वापर

 


निष्कर्ष


Ø पाणीटंचाई च्या कारणांचा शोध घेतला.

Ø पाण्याच्या सध्याच्या उपलब्धतेचा आढावा  घेतला .

Ø पाणी टंचाई समस्या दूर करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांची सविस्तर माहिती मिळवली.

Ø पाणी टंचाईच्या कारणांचा शोध घेऊन त्या कारणांवर उपाययोजना माहित करून घेतल्या.

 

 

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. म्हणूनच पाणी फुकट घालवणं हा गुन्हा तर आहेच. पण निसर्गाच्या दृष्टीने पापही आहे.

 

संदर्भ


·       www.educationalmarathi.com

·       www.mazaabhyas.com

 

प्रकल्प अहवाल

 

                मानवाला त्याच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणवर पाण्याची गरज भासते. हे पाणी माणसाला निसर्गातून मिळते. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे, औद्योगिक करणामुळे मोठ्या, तसेच वाढत्या लोकसंखेमुळे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणवर होतो. आजच्या पिढीकडून पाण्याचा अपव्यय सुद्धा जास्त होत असलेले आपल्या निदर्शनास येते. उन्हाची झळ जाणवू लागली की नदी नाले सुकून जातात, पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची पातळी खालावते.आणि सर्वांसमोर एक मोठी समस्या उभी राहते.

                मी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षामध्ये पर्यावरण या विषयाचा प्रकल्प करण्यासाठी ‘पाणी टंचाई आणि उपाय’ या विषयाची निवड केली. या विषयाबाबत माहिती मिळवण्यासाठी आधीपासून आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार घेतला. परिसरातील पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून पाणी टंचाई ची कारणे कोणती आहेत. यांचा सविस्तर अभ्यास केला. आणि त्याची नोंद करून घेतली.  यामध्ये पर्जन्यछायेचा परिणाम, कमी पावसाचे प्रमाण, ग्लोबल वॉर्मिंग, सदोष सिंचन पद्धती, शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेतील गळत्या यांसारख्या पाणी टंचाईस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास केला.

                पाणी टंचाई आणि त्यावरील उपाय उपाय या विषयाची सविस्तर माहिती मिळवली. यामध्ये सध्या पृथ्वीवर पाण्याची उपलब्धता किती आहे, याचा आंतरजालावरील माहितीच्या आधरे आढावा घेतला. पाणी टंचाई वरील उपायांचा शोध घेत असताना. पुढील उपाय निदर्शनास आले- रेन हार्वेस्टिंग,वॉटर ग्रीड, नवीन तंत्रज्ञान वापरणे, शहरी पाणी पुरवठ्यामधील सुधारणा, दूषित पाण्याचा पुनर्वापर इ. मिळवलेली सर्व माहिती वहीमध्ये नोंद करून घेतली. आणि तिची योग्य रित्या मांडणी केली.

                मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाच्या निरक्षणाची नोंद केली. तसेच निष्कर्ष काढण्यात आला. अशा प्रकारे ‘पाणी टंचाई व उपाय’ या विषयावरील पर्यावरण विषयाचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला.



✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

पाणी टंचाई प्रकल्प प्रकल्प 5.0 MB .pdf

PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा

DOWNLOAD

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.



1 comment

  1. सर
    मला पर्यावरण प्रकल्प ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासून त्याकरिता उपाय सुचवीने
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.