फळ्याची आत्मकथा निबंध
फळ्याचे मनोगत मराठी निबंध / १० वी मराठी निबंध pdf / 10th Marathi nibandh / Falyachi aatmakatha Marathi nibandh
बाबा आजारी असल्यामुळे मी
आणि बाबा रुग्णालयात गेलो होतो. बाबांचा नंबर आल्यावर डॉक्टरांनी त्यांना
तपासणीसाठी आत बोलावले. मला बाहेरच बसायला सांगितले. मी बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर
जाऊन बसलो. सहजच रुग्णालयात लावलेले फलक वाचू लागलो. माझ्या समोरच्या भिंतीवर
सूचना देणारा फळा लावला गेला होता. मी तो
वाचू लागलो. तेवढ्यातच मला कोणीतरी हाक मारल्याचा आवाज आला. आजूबाजूला पहिले तर
सर्वजण आपापल्या कामांत व्यस्त होते. मी पुन्हा तो फळा वाचू लागलो. तेव्हा समजले
की तो फळाच माझ्याशी बोलत आहे. तो पुढे बोलू लागला.
अरे मित्र तुला आज मी माझ्या
जीवनाची गोष्ट सांगतो. माझ्या आजच्या या परिस्थितीवर तू दोन अश्रू ढाळले नाहीस तरी चालतील पण आज माझ्या जीवनाची गोष्ट
ऐकून जा.
या रुग्णालयाचे जेव्हा बांधकाम
करण्यात आले. तेव्हा इमारत उभी करणाऱ्या कारागिरांनी मला तयार केले आणि या
रुग्णालयाच्या भिंतीवर लावले. माझ्यावर आरोग्यमं धनसंपदा असा संदेश लिहिण्यात आला.
सुरुवातीचे दिवस अगदी आनंदात गेले. माझ्यावर रुग्णालयात येणाऱ्या लोकांसाठी सूचना
लिहिण्यात आल्या आणि मला सजवले गेले, रंगरंगोटी करण्यात आली. रुग्णालयात येणारा
प्रत्येकजण हा माझ्यावर लिहिलेल्या सूचना वाचायचा आणि त्याप्रमाणे कृती करायचा.
सागेल काही ठीक चालले होते. शांतात राख, रुग्णाला भेटायला येणाऱ्यांनी गर्दी करू
नये, रुग्नाजाव्ल एकाच व्यक्तीने थांबावे, भ्रमणध्वनी बंद ठेवावे, स्वच्छता राखा यांसारख्या सूचना मी रुग्णालयात येणाऱ्या
लोकांना देत असे. जेव्हा लोक माझ्यावर लिहिलेल्या सूचना वाचून त्यांचे पालन करीत
असत तेव्हा मला खूप आनंद होत असे; माझ्या या ठिकाणी असण्याचे सार्थक झाल्यासारखे
वाटत असे. सुरुवातीचे ते दिवस हसत- खेळत कसे निघून गेले काही कळलेच नाही.
दिवसांमागून दिवस जात होते.
वर्षे एकमओमाग एक पुढे सरकत होती. तस तसे रुग्णालयातील वातावरण बदलत चालले होते.
रुग्णालयात येणारी माणसे माझ्याकडे फारशी लक्ष देईनाशी झाली. माझ्यावर शांतता राखा
अशी सूचना लिहिलेली असून देखील लोक रुग्णालयात येताच मोठ मोठ्याने बोलणे , गप्पा
मारणे यांसारख्या कृती करत असत त्यामुळे रुग्णालयातील शांतात भंग होत असे. एवढेच
नाही तर रुग्णांना भेटण्यासाठी सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ अशी वेळ
माझ्यावर लिहिलेली पाहून देखील काही लोक त्याकडे दुर्लक्ष करून मध्येच रुग्णांना
भेटायला जातात. त्यामुळे रुग्णालयातील परिचारिकांना एकसारख्या सूचना द्याव्या
लागतात.
रुग्णाला भेटायला एका वेळी फक्त
एका व्यक्तीला परवानगी अशी सूचना असून देखील नातेवाईक रुग्णाला भेटण्यासाठी गर्दी
करतात. परंतु या गर्दीचा रुग्णांना त्रास होतो याचा विचार कोणीच करीत नाही.
मला काही लोकांचा राग येतो जेव्हा हे लोक माझ्यावर
स्वच्छता राखा अशी सूचना लिहिलेली पाहून देखील ते पान खाऊन माझ्यावर थुंकीच्या पिचकाऱ्या
मारतात, खाद्यपदार्थांच्या पिशव्या तिथेच फेकून देतात. त्यामुळे रुग्णालयाचा परिसर
अस्वच्छ होतो.
आज माझे संपूर्ण शरीर घाणीने
माखून गेले आहे. मला श्वास घ्यायला देखील त्रास होत आहे. आज माझी दुरवस्था झाली
आहे. कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही . आत्ता फक्त मी तुमच्यासाठी जळावू लाकडाच्या
रुपात उपयोगी आलो तर मी स्वतःला धन्य समजेन.
निबंध लिहिताना खालील मुद्यांचा
अवश्य वापर करा.
[मुद्दे:
प्रस्तावना
सुरुवातीचे दिवस
आनंदाचे क्षण, आठवणी
बदलेले जीवन
दुर्दशा
संदेश
शेवटची इच्छा.]