‘शेतीसाठी वापरली जाणारी कीटक नाशके आणि त्यांचा मानवी आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम पर्यावरण प्रकल्प
पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प / पर्यावरण प्रकल्प मराठी pdf / प्रोजेक्ट पर्यावरण प्रकल्प १२वी विषय pdf / Project पर्यावरण प्रकल्प pdf / पर्यावरण प्रकल्प १२वी विषय pdf २०२१ / पर्यावरण प्रकल्प ११वी / पर्यावरण कार्यपद्धती
प्रश्न:
रासायनिक कीटकनाशकांच्या
वितरकाला भेट देऊन त्या भागात नेहमी वापरल्या जाणाऱ्या कीटक नाशकांची तपशीलवार
यादी करा ती कोणत्या पिकांसाठी वापरतात ते लिहा व त्या कीटकनाशकांचे मानवी
आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम यांचा अभ्यास.
प्रकल्प प्रस्तावना
कृषिप्रधान देश म्हणून भारताला सार्या
जगात ओळखले जाते . देशाने कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे.
बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुख
करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषी क्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात
स्वावलंबी होण्याच्या देशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे.
वाढती
लोकसंख्या, वाढती अन्नधान्याची गरज आणि बदलते हवामान यांचा परिणाम शेती वर झालेला
दिसून येतो. शेतातील पिक चांगल्या प्रकारे यावे तसेच शेतावर कोणताही रोग पसरून
पिकाची नासाडी होऊ नये म्हणून शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा
वापर केला जात आहे. या रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या परमानावर वापर केल्याने त्याचे
पिकावर तसेच मानवी जीवनावर आणी पर्यायाने पर्यावरणावर घातक परिणाम घडून येतात.
मोठ्या
प्रमाणवर उत्पन्न मिळविण्यासाठी लोक मोठ्याप्रमाणावर रासायनिक कीटक नाशकांचा वापर
करतात. परंपरागत चालेल्या शेतीकडून तो आत्ता रासायनिक शेतीच्या दिशेने वळत चालला
आहे. हे ही तीतीकेच खरे आहे की वाढत्या लोकसंख्येला पूर्वापारपासून चालत आलेल्या
शेती पद्धतीने शेती केली तर ते आजच्या परिस्थितीत शक्य नाही हे जितके खरे आहे
तितकेच रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम तितकेच जास्त आहेत.
आपण
या प्रकल्पाच्या माध्यमातून रासायनिक कीटकनाशके म्हणजे काय? कीटकनाशकांचे
वर्गीकरण, कीटक नाशकांचे मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर होणारे घातक परिणाम
याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
पान नं. |
१) |
विषयाचे महत्व |
८ |
२) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
९ |
३) |
प्रकल्प कार्यपद्धती |
10 |
४) |
कीटकनाशके |
12 |
५) |
शेतात वापरली जाणारी कीटक नाशके
त्यांचे गुणधर्म आणि उपयोग |
१३ |
६) |
कीटकनाशकांचे वर्गीकरण |
१९ |
७) |
रासायनिक कीटकनाशकांच्या
वापरामुळे होणारे परिणाम |
२२ |
८) |
निरीक्षणे |
२५ |
९) |
निष्कर्ष |
२८ |
10) |
संदर्भ |
२९ |