शेततळे काळाची गरज प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी
शेततळे माहिती/ शेत तळे प्रकल्प माहिती / पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी / environmental project marathi pdf
शेततळे काळाची गरज प्रकल्प
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
१) |
विषयाचे महत्व |
२) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
३) |
प्रकल्प कार्यपद्धती |
४) |
शेततळे संकल्पना |
५) |
शेततळयाचे फायदे |
६) |
शेततळ्याचे प्रकार |
७) |
निरीक्षणे |
८) |
निष्कर्ष |
९) |
संदर्भ |
शेततळे काळाची गरज विषयाचे महत्व
आपला भारत
देश हा कृषी प्रधान देश आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी मोठ्या प्रमाणवर
लोकसंख्या ही शेती , आणि शेतीशी निगडीत व्यवसायात गुंतलेली दिसून येते. त्यामुळे
कृषी व्यवस्थेत शेतीचे वेगळे महत्व विषद करण्याची गरज नाही. भारत देशाची कृषिप्रधान
अर्थव्यवस्था असल्याने देशाच्या औद्योगीकीरणाचा आणि आर्थिक विकासाचा प्रमुख स्त्रोत शेती हाच
आहे.
पाणी हा मानवाच्या जीवनाचा आधार आहे. संपूर्ण
गावाची, राज्याची, देशाची आर्थिक आणि सामाजिक समृद्धी ही उपलब्ध असणाऱ्या
पाण्याच्या साठ्यावर अवलंबून आहे. गेल्या
काही वर्षांत पावसाची अनिश्चितता व अनियमित पणा यामुळे शेतीचे फार मोठे नुकसान होत
आहे. पाणी म्हणजे शेतीचे जीवन आहे. भारतीय शेती पाण्यावर जगते जर पुरेशा प्रमाणात
पाणी मिळाले नाही तर या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. जर शेतीला योग्य
प्रमाणात पाणीपुरवठा झाल्यास जमिनीची उत्पादकता वाढून पिक चांगल्या प्रकारे
येण्यास मदत होते.
पावसाच्या अनियमितपणामुळे होणारे शेतीचे नुकसान
टाळण्यासाठी आणि पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर शेततळे तयार
करणे हे एक उत्तम पर्याय आहे. जेव्हा पिकाला पाण्याची कमतरता भासेल तेव्हा या शेततळ्यातील
पाणी शेतीसाठी फार मोलाचे ठरते. म्हणूनच शेततळी ही आज काळाची गरज बनली आहे.
त्यामुळे शेततळ्यांबाबत अधिक माहिती करून घेणे गरजेचे आहे.
शेततळे काळाची गरज प्रकल्पाची उद्दिष्टे
Ø शेततळे म्हणजे याची संकल्पना समजून घेणे.
Ø शेततळ्यांच्या प्रकारांबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे.
Ø शेततळ्याचे शेतकऱ्याला होत असलेले फायदे माहित करून घेणे.
Ø शेततळ्यांमुळे होणाऱ्या तोट्यांचा अभ्यास करणे.
Ø आज शेततळ्याची गरज का वाढत चालली आहे याबाबत सविस्तर माहिती मिळविणे.
Ø शेततळ्यांची माहिती इतरांना ही मिळवून देणे.