वन्यजीव संवर्धन पर्यावरण प्रकल्प
वन्यजीव संवर्धन प्रकल्प प्रस्तावना / वन्यजीव संवर्धन प्रकल्प विषयाचे महत्व / पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी / पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प pdf / पर्यावरण प्रकल्प १२वी विषय २०२१ / पर्यावरण प्रकल्प १२ वी pdf / पर्यावरण प्रकल्प निरीक्षण मराठी
पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
आज आम्ही घेऊन आलो आहोत
वन्यजीव संवर्धन
या पर्यावरण प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती चला तर मग सुरुवात करूया
प्रकल्प प्रस्तावना
विसाव्या शतकातील बेसुमार वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा
वन्य जीवांच्या अस्तित्वावर मोठ्या प्रमावर परिणाम झाला आहे. मानवाची वाढत जाणारी
लालसा आणि हाव हे वन्य जीवांची संख्या घटण्याचे एक मुख्य कारण आहे. गेल्या काही वर्षांत
झालेली वन्य जीवांच्या झालेल्या बेसुमार
हत्या , प्राण्यांच्या हत्येवर बंदी असतानासुद्धा आजही मोठ्या सस्तन प्राण्यांचीही
पारधचोर हत्या करीत आहेत प्राण्यांची हत्या करून त्यातून मिळणाऱ्या वस्तूला जागतिक
बाजारपेठेत भरमसाठ किंमत मिळते. परंतु
यामुळे निसर्गाचा समतोल मोठ्या प्रमाणावर ढासळत चालला आहे.
आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या असतात.
पर्यावरणातील या साखाल्यांमुळे या सृष्टीतील प्रय्तेक सजीवाला अन्न मिळते आणि तो
आपला जीवन काळ पूर्ण करतो. जर या अन्नसाखळी मधील एक जरी दुवा नष्ट झाला तरीही
साऱ्या पर्यावरणाचा समतोल बिघडून जाईल .
आज या प्रकल्पाच्या माध्यामतून वन्यजीवांना
असलेले धोके, तसेच धोक्यात असलेल्या वन्य
जीवांच्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना याबबात
सविस्तर माहिती करून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
१) |
विषयाचे महत्व |
२) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
३) |
प्रकल्प कार्यपद्धती |
४) |
वन्यजीवांना असलेले धोके |
५) |
वन्य जीवांचे संवर्धन करण्यासाठीचे उपाय |
६) |
निरीक्षणे |
७) |
निष्कर्ष |
८) |
संदर्भ |
प्रकल्प विषयाचे महत्व.
निसर्गाचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणातील
विविधता टिकवून ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये वन्य जीवांचे रक्षण करणे हे
सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. गेल्या
कित्येक वर्षांपासून मानव हा वन्य जीवांच्या बरोबरीनेच या पृथ्वीतलावर
गुण्यागोविंदाने राहत आला आहे. परंतु
गेल्या काही दशकांची स्थिती पहिली तर गेल्या काही ३ ते ४ दशकांमध्ये मानवाने वन्य
जीवांच्या बेसुमार हत्या केल्या, वाढत्या शहरीकरणात, औद्योगिक करणात वन्य
जीवांच्या राहण्याच्या जागा उध्वस्त करण्यात आल्या. वाढत्या प्रदूषणामुळे
त्यांच्या वन्य जीवांच्या प्रजोत्पादन क्रियेवर प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज वन्य जीवांना या पर्यावरणात टिकून राहणे अवघड झाले आहे. या सर्वाचा परिणाम
म्हणजे आज अनेक प्राण्यांच्या जाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
अस्वल, माकड, हरीण, हत्ती, वाघ यांसारखे
प्राणी देखील जंगलातच राहतात. म्हणजेच घनदाट जंगल म्हणजे त्यांचा निवारा असतो.
जंगलातच त्यांच्या गरजा पूर्ण होत असतात. परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे आज वाणांचा
ऱ्हास होत चालला आहे. परिणामी वन्यजीव धोक्यात आले आहेत. जर वन्यजीवांची पातळी अशीच
कमी होत राहिली तर येणाऱ्या काळात फार गंभीर परिणाम घडून येऊ शकतात. म्हणून हे
सर्व जर थांबवायचे असेल तर वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे. म्हणून वन्यजीव
संवर्धन या विषयाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
Paryavarn prakalp Vishay in Marathi / Paryavarn prakalp iyatta 12vi / Paryavaran prakalp akravi
प्रकल्प उद्दिष्ट्ये
· वन्य जीवांच्या ऱ्हासाची करणे जाणून घेणे.
· वन्य जीवांना असलेल्या धोक्यांचा अभ्यास करणे.
· वन्य जीवांच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा अभ्यास करणे.
· आज पर्यंत वन्य जीव संवर्धनासाठी केलेल्या उपाय योजना जाणून घेणे.
· वन्यजीव संवर्धन याबाबत सर्वांना माहिती उपलब्ध करून देणे.
प्रकल्प कार्यपद्धती
‘वन्यजीव संवर्धन’ या प्रकल्प विषयाबाबत माहिती
मिळविण्यासाठी मी वर्तमान पत्रे, पर्यावरण विषयक पुस्तके यांच्या
माध्यमातून माहिती मिळविली. तसेच परिसरातील लोकांशी चर्चा करून वन्य जीव संवर्धन
या विषयाबाबत त्यांची मते जाणून घेतली. त्यांच्याशी संवाद साधून प्राप्त झालेल्या
माहितीच्या आधारे प्रकल्पाचे मुद्दे तयार करण्यात आले.
तयार झालेल्या
मुद्द्यांबाबत अधिक सविस्तर माहिती मिळवता यावी यासाठी मी आंतरजालावर
(इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. उपलब्ध
माहितीचे संकलन केले .अशा प्रकारे प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले.
संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे
समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे
निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.
पर्यावरण प्रकल्प १२वी विषय pdf २०२१ / पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती माहिती. / Paryavarn prakalp in Marathi pdf download / Paryavavarn prakalp Marathi 12th pdf download
प्रकल्प विश्लेषण
वन्यजीवांना असलेले धोके
पर्यावरणातील सगळ्या परिसंस्थांचा समतोल
राखण्यासाठी, त्या सशक्त ठेवण्यासाठी या पृथ्वीवरील सर्व
प्रकारातील प्राण्यांच्या प्रजाती अत्यंत महत्वाच्या आहेत. परंतु आज या
जैवविविधतेला पुढील कारणांमुळे धोका पोहचत आहे.
१.वन्यजीवांच्या अधिवासाचा ऱ्हास:
वन्यजीवांच्या राहण्याच्या जागेचा ऱ्हास, संसाधनांचे अतिशोषण, शेती करण्याच्या पद्धतीमध्ये
केले जाणारे बदल आणि वाढती लोकसंख्या ही जैवविविधता धोक्यात येण्यामागची प्रमुख
कारणे आहेत. अधिवासाची विविध भागांत
विभागणी झाल्याने जमिनीचे पडलेले छोटे छोटे तुकडे जैवविविधतेचा भार झेपवू शकणार
नाहीत.
वाढत्या नागरी वस्तीमुळे सस्तन प्राणी व पक्षी
यांच्यासाठी आवश्यक असणारे क्षेत्र प्रमाणापेक्षा कमी झाल्याने काही प्राणी आणि
पक्षी यांची संख्या कमी होताना दिसत आहे. परिणामी काही जीवांच्या जाती या
परिसरातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
२. पर्यावरणाचे अतिशोषण:
मोठ्या प्रमाणवर परिसरात केली जाणारी शिकार, मासेमारी तसेच पिके घेण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणवर
केलेली जंगलतोड यांमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होत असल्याचे समोर
आले आहे.
३.परिसरात परकीय जनावरांची वाढती संख्या:
एखाद्या ठिकाणी सुरुवातीपासून त्या ठिकाणी परीसंस्थेत नसणाऱ्या प्रजाती
आणल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या मूळ जनावरांच्या प्रजातींना धोका निर्माण होतो.
परिसरात नवीन प्रजातीच्या विदेशी गायी, म्हशी आणल्या
गेल्याने येथील स्थानिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
४.प्रदूषण:
दिवसेंदिवस वाढत जाणारे हवा प्रदूषण, आम्ल वर्षा झाल्याने वनांचा ऱ्हास होतो.चांगल्या जलप्रवाहात प्रदूषित पाणी
सोडल्याने पाण्यातील जलसृष्टीला धोका निर्माण होतो. प्लास्टिक च्या कचऱ्यामुळे
वन्य जीवांवर अनिष्ट परिणाम होत असलेला दिसून येतो. त्यमुळे परिसरातील प्रदूषण हा
जैवविविधतेला मोठा धोका आहे. सतत वाढत जाणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल
ढासळत चालला आहे. विविध प्रकारच्या
हानिकारक प्रदूषकांमुळे हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित झाली आहे. आजपर्यंत सस्तन प्राणी काही प्रमाणवर या
प्रदूषकांचा प्रतिकार करू शकले आहे. परंतु मासे, कीटक, पक्षी यांच्यावर प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणवर परिणाम झालेला दिसून
येतो.
५.हवामानातील बदल:
मोठ्या प्रमाणवर वाढत जाणाऱ्या कारखान्यांमुळे
तेथील हवामानात बदल घडून आला आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणवर प्रदूषणाची
पातळी वाढल्याने पर्यावरणातील कीटकांच्या, पक्षांच्या काही प्रजातींवर यांचा परिणाम दिसून येत आहे.
वन्य जीवांचे संवर्धन करण्यासाठीचे उपाय
प्राण्यांचे
त्या अधिवासाच्या जागी संवर्धन:
या प्रकारच्या संवर्धनामध्ये धोक्यात असणाऱ्या
प्राण्यांचे अधिवास संरक्षित केले जातात. जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी राखीव
ठेवलेली जमीन असते.आपली राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य यांच्याद्वारे वन्य
जीवांचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते.
Ø राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्ये
वन्यजीवांचे त्यांच्या मूळ अधिवासातच संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आज भारताच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्ये उभारण्यात आलेली आहे. उत्तरांचल येथे असणारे जीव कोर्बेट व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश येथे कान्हा आणि बांधवगड राष्ट्रीय उद्यान, गुजरात येते असणारे गिर राष्ट्रीय उद्यान, राज्यस्थान राज्यामध्ये असणारे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान इ.
v महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची यादी
अ.क्र. |
स्थान |
व्याघ्र प्रकल्प |
१. |
अमरावती |
मेळघाट |
२. |
वर्धा |
बोर |
३. |
पश्चिम घाट |
सह्याद्री |
४. |
गोंदिया |
नवेगाव नागझिरा |
५. |
चंद्रपूर |
ताडोबा-अंधारी |
६. |
नागपूर |
पेंच |
वन्य
जीवांचे मूळ स्थानाबाहेरील संवर्धन:
प्राण्यांचे त्यांच्या मूळ स्थितीतील अधिवासाच्या
बाहेरील संवर्धन. यामध्ये वनस्पती उद्यान, प्राणीसंग्रहालये
गुणसूत्रे कोश, उती इत्यादी प्रकारे संवर्धन केले जाते.
Ø प्राणी संग्रहालये:
मूळ स्थानातील संवर्धनाच्या प्रयत्नांना पूरक
म्हणून प्राणी संग्रहालयांची उभारणी करून कृत्रिम वातावरणार प्राण्याच्या संवर्धनाचे
प्रयत्न सध्या केले जात आहेत. देशामध्ये अनेक प्राणी संग्रहालये विकसित करण्यात
आली आहेत. आसाम मधील मणिपुरी थामिन हरीण आणि आसाम येथे आढळणारा लाल पांडा
यांसारख्या धोक्यात असणाऱ्या प्रजातींचे संवर्धन केले आहे.
Ø
मूळ स्थानाबाहेर संवर्धन करण्याची
उद्दिष्ट्ये:
ज्या वन्य जीवांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात
आहे अशा प्रजातींचे कृत्रिम वातावरणात संवर्धन आणि संरक्षण करणे.
पायाची हाडे, गेंड्याची शिंगे, कस्तुरी, हस्तिदंत,
कातडी ,मोरपिसे इत्यादी अवयवांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे वन्य
जीवांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. बेकायदेशीर शिकार व व्यापारावर
प्रतिबंध घालण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायद्याद्वारे दंड आणि शिक्षेच्या तरतुदी
करून काही प्रमाणवर शिकार आणि अवैध्य व्यापाराला आळा बसला आहे.
प्रकल्प निरीक्षणे
भारतातील
काही मुख्य संवर्धन आणि संरक्षण विभाग पुढीलप्रमाणे.
संरक्षित केलेल्या विभागाचे नाव |
राज्य |
संवर्धन करण्यात आलेले प्राणी |
मानस राष्ट्रीय
उद्यान |
आसाम |
जंगली म्हैस |
पेरियार राष्ट्रीय
उद्यान |
केरळ |
हत्ती, भुंकणारे हरीण, सांबर |
गीर राष्ट्रीय
उद्यान |
गुजरात |
सिंह, जंगली
अस्वले, चितळ, सांबर. |
बंदीपूर राष्ट्रीय
उद्यान |
केरळ |
वानर, वाघ, हत्ती, भारतीय गवे. |
कोल्लेरू राष्ट्रीय
उद्यान |
आंध्र प्रदेश |
पेलिकन व समुद्री
पक्षी |
जलदापद राष्ट्रीय
उद्यान |
पश्चिम बंगाल |
गेंडे |
कान्हा राष्ट्रीय
उद्यान |
मध्यप्रदेश |
वाघ, चित्ता,
बारसिंगा, रानटीकुत्रे. |
दाचीगाम राष्ट्रीय
उद्यान |
जम्मू व काश्मीर |
मेंढी, वन्य बकरी,
काश्मिरी सांबर. |
कोर्बेट राष्ट्रीय
उद्यान |
उत्तरांचल |
वाघ, भुंकणारे
हरीण, अस्वल. |
केवलदेव राष्ट्रीय
उदयन |
राज्यस्थान |
बदके, फ्लेमिंगो. |
पर्यावरण प्रकल्प निरीक्षण मराठी - पर्यावरण प्रकल्प १२वी विषय pdf २०२१ - पर्यावरण प्रकल्प कार्यपद्धती माहिती. - Paryavarn prakalp in Marathi pdf download - Paryavavarn prakalp Marathi 12th pdf download
निष्कर्ष
ü वन्य जीवांच्या ऱ्हासाची करणे जाणून घेण्यात आली.
ü वन्य जीवांना असलेल्या धोक्यांचा अभ्यास करून त्यांची नोंद घेतली.
ü वन्य जीवांच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा अभ्यास करण्यात आला.
ü आज पर्यंत वन्य जीव संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत अधिक माहिती करून घेतली आणि सदर उपाय योजनांची माहिती संकलित केली..
संदर्भ
पर्यावरण पुस्तिका
आम्ही उपलब्ध करून दिलेली प्रकल्पाची माहिती तुम्हाला
उपयुक्त ठरल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
प्रकल्प pdf कशी डाउनलोड करायची हे पाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
धन्यवाद