जंगलतोड प्रकल्प / वनांचा ऱ्हास पर्यावरण प्रकल्प
गलतोड प्रकल्प pdf - जंगलतोड प्रस्तावना - जंगलतोड प्रस्तावना मराठी - पर्यावरण शिक्षण प्रकल्प १२वी pdf - पर्यावरण शिक्षण प्रकल्प कार्य - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकाल्प pdf - जंगलतोड प्रोजेक्ट information in Marathi
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईटवर ९ वी ते १२ वी साठी उपयुक्त असणारे पर्यावरण विषयक व इतर विषयाचे प्रकल्प देत असतो. आज ही आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्रकल्प घेऊन आलो आहे.
जंगलतोड प्रकल्प / वनांचा ऱ्हास पर्यावरण प्रकल्प
' या प्रकल्पाची माहिती आम्ही प्रकल्पाच्या स्वरुपात खाली दिली आहे. तुम्हाला प्रकल्प आवडल्यास आम्हाला comment द्वारे नक्की सांगा. चला तर मग सुरु करूयात.
Free pdf file Available
पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
जंगलतोड प्रकल्प / वनांचा ऱ्हास पर्यावरण प्रकल्प
प्रकल्प प्रस्तावना
अन्न, वस्त्र, निवारा, लाकूड आणि इंधन यासाठी माणूस हा वानंवारच अवलंबून आहे. वाढलेल्या शहरीकरणामुळे तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे लाकूड, खनिजे, लाकूड, लगदा आणि इंधन यांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. माणसाच्या गरजा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी लाकूडतोड, खाणकाम इत्यादी गोष्टी या जंगलांचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत.
वर्षानुवर्षांपासून चालत आलेलेल निसर्गाचे आणि मानवाचे नाते आज माणूस विसरत चालला आहे. निसर्गाने युगानुयुगे दिलेले वैभव, सुबत्ता यंची त्याला आठवणही राहिली नाही. शुल्लक स्वार्थापायी माणूस झाडे तोडतो, जंगले उध्वस्थ करतो. आणि मग मागे उरते केवळ प्रदूषण.
आज या प्रकल्पाच्या माध्यमातून जंगलांच्या ऱ्हास होण्यामागे कोणती कारणे आहेत? मोठ्या प्रमाणवर जंगलतोड केल्याने माणसासमो कोणकोणत्या समस्या उभ्या राहतात. पर्यावरणावर जंगलतोडीचे परिणाम कशा प्रकारे होतात तसेच जंगलांचे मानवी जीवनातील उपयोग आणि महत्व काय आहे. या बाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.
अनुक्रमणिका
अ.क्र. | घटक |
१) | विषयाचे महत्व |
२) | प्रकल्पाची उद्दिष्टे |
३) | प्रकल्प कार्यपद्धती |
४) | जंगल संसाधन |
५) | जंगलांचे उपयोग |
६) | जंगलतोडीची कारणे |
७) | जंगल तोडीचे विपरीत परिणाम |
८) | निरीक्षणे |
9) | निष्कर्ष |
९) | संदर्भ |
प्रकल्प विषयाचे महत्व.
आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थानिक जंगलांचा मोठा वाट आहे. कोळसा आणि जळावू लाकडाचा अतिवापर यांमुळे जंगलांचे मोठ्या प्रमाणावर नुक्सःन होते. शहरांची वाढ आणि शेती क्षेत्राची वाढ यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड त्याच प्रमाणे मोठ मोठे कारखाने उभे करण्यासाठी भुईसपाट करण्यात येणारी वने यांमुळे वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. अतिप्रमाणात चराई , शहरीकरण यांमुळे मोठ्या प्रमाणवर जंगलाचे शोषण होते.
आजकाल पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे. त्यासाठी कायदे केले गेले आहेत. पण ते अजूनही आचरणात येत नाहीत. वाहनासाठी आवश्यक असणारी पी.यु.सी. चाचणी करणे, कारखान्यातील दुषित हवेची जबाबदारी पार पडणे, कोरडा कचरा आणि ओला कचरा यांची विभागणी करणे या लहानसहान पण फार महत्वाच्या गोष्टी करून आपणाला विशुद्ध पर्यावरण टिकवणे आवश्यक आहे. तशी निष्टा लोकमानसात रुजवली गेली पाहिजे. उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग करून पर्यावरणाचे , पर्यायाने जंगलाचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे.
जंगल तोडीचा हा प्रश्न काही प्रमाणात कमी करता येईल. किमान मर्यादित ठेवता येईल, पण त्यासाठी पृठीवरील प्रत्येक माणूस याबाबत जागरूक झाला पाहिजे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम प्रचंड प्रमाणावर फोफावली पाहिजे. पर्यावरण दृष्टीकोन लहानपणापासूनच मनावर बिंबवायला सुरुवात केली गेली पाहिजे. उद्याचा नागरिक हा प्र्र्यावर्ण-जागरूक नागरिक हवा, तरच मानवजातीची धडगत आहे आहे. म्हणून ‘जंगलतोड’ हा विषय पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे.
प्रकल्प उद्दिष्ट्ये
हा प्रकल्प करीत असताना पुढील उद्दिष्ट्ये समोर ठेऊन त्याप्रमाणे प्रकल्पाची माहिती एकत्रित करण्यात आली.
- · जंगल संसाधन संकल्पनेबाबत अधिक माहिती जाणून घेणे.
- · जंगलांमुळे होणाऱ्या फायद्यांचा अभ्यास करणे.
- · जंगल तोड होण्यामागे कोणती कारणे आहेत त्या कारणांचा शोध घेणे प्रत्येक कारणाबाबत सविस्तर माहिती एकत्रीत करणे.
- · मोठ्या प्रमाणवर जंगलतोड झाल्याने / केल्याने पर्यावरणावर कोणते परिणाम होतात याबाबत सविस्तर माहिती संकलित करणे .
- · जंगलांमुळे होणाऱ्या फायद्यांचा मुद्देसूद अभ्यास करणे.
- · जगलांचे मानवी जीवनातील स्थान काय आहे हे प्रकल्पाच्या माध्यमातून इतरांना समजावणे.
जंगलतोड प्रोजेक्ट information in Marathi - Jangal tod mahiti in Marathi - Jangal tod project information in Marathi - Jangal tod in Marathi project
प्रकल्प कार्यपद्धती/ अभ्यासपद्धती
‘जंगलतोड ’ या प्रकल्प विषयाबाबत माहिती मिळविण्यासाठी मी वर्तमान पत्रे, पर्यावरण विषयक पुस्तके यांच्या माध्यमातून माहिती मिळविली. तसेच परिसरातील लोकांशी चर्चा करून गेल्या काही वर्षांत झालेली जंगल परिसरात घट यावर प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारून माहिती एकत्रित केली. जंगलतोड मोठ्या प्रमाणवर होण्यामागे कोणती कारणे आहेत हे जाणून घेण्यासाठी परिसरातील लोकांशी संवाद साधून या विषयाबाबत त्यांची मते जाणून घेतली. त्यांच्याशी संवाद साधून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे मुद्दे तयार करण्यात आले.
तयार झालेल्या मुद्द्यांबाबत अधिक सविस्तर माहिती मिळवता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. उपलब्ध माहितीचे संकलन केले .अशा प्रकारे प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.
जंगल संसाधन
जंगल म्हणजे घनदाट वाढलेले वृक्ष आणि इतर वनस्पती यांनी मोठ्या परिसरामध्ये व्यापलेली जमीन. जंगल हा पृथ्वीवरील एक महत्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. पृथ्वीवरचे वने अनेक उपयोगी वस्तू देतातच, शिवाय आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या अनेक प्रकारच्या पर्यावरणीय सेवा देखील पुरवतात.
जंगलांचे उपयोग
· व्यावसायिक उपयोग:
मानवाला अत्यावश्यक असणाऱ्या बहुतांश गोष्टी या आपल्याला जंगले पुरवतात. जंगलांतून मिळणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला, लाकूड, जळाऊ लाकूड, फळे, कंदमुळे, डिंक, बांबू, चारा, फायबर, लेस, रबर, तेल, रेझीन, इत्यादी अनेक वस्तू जंगलांच्या माध्यमातून मिळतात. जंगलातून तोड केलेले निम्मे लाकूड हे घरगुती स्वयंपाक , आणि पाणी तापवण्यासाठी वापरले जाते. लाकूड हे घरबांधणी च्या कामासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. दैनंदिन जीवनात वापरण्यात कागद तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून लाकडाचाच उपयोग केला जातो. बऱ्याच जंगलांचा उपयोग हा खाणकाम, शेती, कुरणक्षेत्र, पर्यटन, मनोरंजनासाठी व धरणे बांधण्यासाठी केला जातो.
· ऑक्सिजन ची निर्मिती:
झाडे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ऑक्सिजन ची निर्मिती करतात आणि पर्यावरणातील कार्बनडायऑक्साईड वायू शोषून घेतात. पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी आवश्यक असणारा प्राणवायू हा जंगलांमुळेच सजीवांना मिळतो. म्हणून वनांना पृथ्वीची फुफ्फुसे म्हणतात.
· पृथ्वीचे तापमान कमी करणे:
हरितगृह वायुंपैकी प्रमुख असणारा कार्बनडायऑक्साईड हा आहे. जंगलांतील झाडे त्यांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेसाठी कच्चा माल म्हणून शोषून घेतात. अशा प्रकारे ही वने कार्बनडायऑक्साईडचा साठ म्हणून काम करतात व कार्बनडायऑक्साईड मुले होणारी जागतिक तापमानवाढ कमी करण्याचा प्रयत्न करतात. झाडे त्यांच्या प्रकाशसंश्लेशणासाठी कार्बनडायऑक्साईड हा वायू शोषून घेतात. झाडांच्या या शोषणाच्या क्रियेमुळे पृथ्वीचे तापमान कमी होण्यास मदत होते.
· वन्यजीवांचा अधिवास:
विविध प्रजातींच्या प्राण्यांचे आणि पक्षांचे तसेच वनस्पतींचे जंगल हे घर असते. एकट्या उष्ण कटिबंधातील जंगलात सुमारे ७ दशलक्ष प्रजाती आहेत.
· जलचक्राचे नियमन:
जंगलातील झाडांची मुळे व त्यांच्या आजूबाजूची माती हे एखाद्या मोठ्या स्पंजप्रमाणे काम करतात. ही मुले पावसाचे पाणी शोषून घेतात. जमिनीच्या पृष्ठभागावरून खळाळत वाहत जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी करून त्याला जमिनीत झिरपायला मदत करतात. हे जमिनीत शोषलेले पाणी हळूहळू सोडून झऱ्यांना पुरवतात.
· मृदेचे संवर्धन :
जंगलातीन झाडांची मुळे मातीचे कण घट्ट धरून ठेवतात, यामुळे मातीची जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध करतात. वनातील झाडे वाऱ्याला अडवण्याचे काम ही करतात.
प्रदूषणाचे नियंत्रण: जंगलांतील झाडे ही कार्बनडायऑक्साईड वायू शोषून घेऊन प्राणवायू सोडतात. यामुळे हवा शुद्ध व स्वच्छ राहते तसेच झाडे ध्वनी शोषून घेऊन आवाज रोधक म्हणून देखील काम क अर्तात. अशा प्रकारे वानांमुळे हवा व ध्वनी प्रदूषण रोखण्यास मदत होते.
जंगलतोडीची कारणे
Ø स्थलांतरित शेती:
सुमारे ३०० दशलक्ष लोक हे स्थलांतरित प्रकारची शेती करणारे आहेत असे अनुमान आहे. हे लोक ‘राब’ या पद्धतीने शेती करतात यासाठी दरवर्षी सुमारे ५ हेक्टर पेक्षाही जास्त जंगले तोडली जातात. भारतात ‘राब’पद्धतीत ईशान्य भारत आणि काही प्रमाणात आंध्र प्रदेश, बिहार , मध्यप्रदेश आणि पश्चिम घाट या ठिकाणी आहे. जवळजवळ निम्मी जंगलतोड या पद्धतींमुळे होते.
Ø जळावू लाकडांची आवश्यकता:
गरिबांची लोकसंख्या वाढल्यामुळे जळावू लाकडांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
Ø औद्योगिक कच्चा माल:
जंगलातील लाकडापासून नेक वस्तू बनतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्या, कागद उद्योगासाठी आवश्यक असणारा लगदा. इत्यादी सर्व बनण्यासाठी जंगलातील लाकूड लागते. या वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे जंगलावर ताण पडत आहे.
Ø विकास प्रकल्प :
जलविद्युत प्रकल्प, खाणकाम, शहरीकरण, धरणे, रस्तेबांधणी, घरे, आणि कारखाने अशा विविध विकास प्रकल्पांसाठी जंगल तोड केली जात आहे.
Ø अन्नाची वाढती गरज:
वाढत्या लोकसंख्येची अन्न धान्याची गरज पूर्ण करण्यासाठी, शेतीसाठी, घरांची गरज भागविण्यासाठी जंगले सपाट केली जातात आणि त्या ठिकाणी शेती केली जाते. त्यामुळे जंगलांचे अस्तित्व धोक्यात येते.
Ø अतिप्रमाणात चराई:
ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणत जंगले होती ती जागा चराऊ कुरणांनी घेतली. गुराधोरांनी अतिप्रमाणात चराई केल्यामुळे या जंगलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Jangaltod mrathi information - Evs project in Marathi pdf download - Evs project in Marathi 12th - 12th evs project in Marathi language pdf - 11th evs project in Marathi information
जंगल तोडीचे विपरीत परिणाम
Ø जंगलातील अनेक प्रजातींचा नैसर्गिक निवारा अधिवास नष्ट झाल्यामुळे त्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले.
Ø जंगले तोडल्यामुळे त्या ठिकाणी असणारे प्राणी आणि वनस्पती यांमधील जैवविविधता नष्ट झाली त्याच बरोबर अनुवांशिक विविधता देखील नाहीशी झाली.
Ø जलचक्राचे नियंत्रण हे जंगलांमुळेच होते व त्यामुळे पावसावरही त्याच विपरीत परिणाम होतो.
Ø जमिनीची धूप होणे , तसेच जमिनीची सुपीकता कमी होण्याची समस्या वाढली.
Ø डोंगराळ भागामध्ये जंगलतोडीचा परिणाम म्हणून दर्दी कोसळतात.
Ø जंगले तोडल्यामुळे कार्बनडायऑक्साईड शोषून घेण्याचे प्रमाण कमी झाले आणी त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढले.
प्रकल्प निरीक्षणे
मानवाचा अस्तित्वासाठी आणी विकासासाठी नैसर्गिक संसाधने ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. मानवाच्या विविध मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गात उपलब्ध असणाऱ्या विविध संसाधनांचा उपयोग मानवाला होतो. उदा: जल संसाधन, जंगल संसाधन, खनिज संसाधन आणि अन्न संसाधन. इत्यादी यापैकी काही संसाधने ही पुन्हा निर्माण करता येतात परंतु काही संसाधने ही पुन्हा पुन्हा तयार करता येत नाहीत. आज जंगल संसाधन मोठ्या झपाट्याने कमी होत आहे. मानव मोठ्या प्रमाणवर वृक्ष लागवड करून या जंगल संसाधनाची पातळी वाढवू शकतो परंतु माणूस याकडे लक्षच देत नाही असे निदर्शनास येते. आधुनिक शेती, औद्योगिकीकरण, बदलती जीवनशैली यांमुळे जंगलांवर मोठ्या प्रमाणवर ताण पडतो यांमुळे भविष्यातील जंगलाच्या अस्तित्वाबाबत प्रश्न निर्माण झाला आहेत. यावर उपाय म्हणजे सर्व संसाधनांचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर करणे आणि जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करणे.
प्रकल्प करत असताना निदर्शनास आलेली जंगल तोडीची प्रमुख कारणे.
निष्कर्ष
ज्या उद्दिष्टांच्या आधारे प्रकल्पाला सुरुवात केली होती ती उद्दिष्टे पूर्ण झाली.
o जंगल संसाधन संकल्पनेबाबत अधिक अधिक माहिती मिळविणे या प्रकल्पाच्या माध्यामतून शक्य झाले.
o जंगलांमुळे होणाऱ्या फायद्यांचा सविस्तर अभ्यास केला.
o जंगल तोड होण्यामागे कोणती कारणे आहेत त्या कारणांचा शोध घेऊन प्रत्येक कारणाबाबत सविस्तर माहिती संकलित केली.
o मोठ्या प्रमाणवर जंगलतोड झाल्याने / केल्याने पर्यावरणावर कोणते परिणाम होतात याची माहिती मिळविणे शक्य झाले.
o जंगलांमुळे होणाऱ्या फायद्यांचा मुद्देसूद अभ्यास करता आला.
संदर्भ
- www.educationalmarahti.com
- www.mazaabhyas.com
- पर्यावरण पुस्तिका
PDF PASSWAD मिळविण्यासाठी खालील Subscribe To Unlock लिंक वर क्लिक करा. Subscribe करा आणि Back Button press करा.
PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.