स्थानिक किंवा जवळच्या धरणाचा अभ्यास आणि पर्यावरण
पर्यावरण प्रकल्प प्रस्तावना - पर्यावरण प्रकल्प निरीक्षण मराठी - पर्यावरण प्रकल्प ११वी - प्रकल्प कार्य व जनरल कार्य - प्रकल्प विषय निवड प्रस्तावना
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईटवर ९ वी ते १२ वी साठी उपयुक्त असणारे पर्यावरण विषयक व इतर विषयाचे प्रकल्प देत असतो. आज ही आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्रकल्प घेऊन आलो आहे. ' स्थानिक किंवा जवळच्या धरणाचा अभ्यास आणि पर्यावरण' या प्रकल्पाची माहिती आम्ही प्रकल्पाच्या स्वरुपात खाली दिली आहे. तुम्हाला प्रकल्प आवडल्यास आम्हाला comment द्वारे नक्की सांगा. चला तर मग सुरु करूयात.
पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
स्थानिक किंवा जवळच्या धरणाचा अभ्यास आणि पर्यावरण
प्रकल्प प्रस्तावना
वाढत्या लोकसंखेला पाणी पुरवठा करण्यासाठी तसेच
दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी लहान मोठ्या नद्यांवर धरणे बांधून
पाण्याचा साठा केला जातो. शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी धरणाच्या कालव्यातून सर्व ठिकाणी
पुरवठा केला जातो. हरितक्रांती झाल्यानंतर
शेतीला भरपूर पाणी पुरविण्याचे महत्व वाढले. सुरुवातीला जेव्हा धरणांची उभारणी सुरु
झाली तेव्हा लोकांना धरणे म्हणजे विकासाला चालना देणारे साधन आहे असे वाटत होते.
परंतु नद्यांवर बांधल्या गेलेल्या धरण प्रकल्पांकडून जी अपेक्षा होती ती धरणे पूर्ण करू शकले नाहीत. ज्याप्रमाणे
एखाद्या गोष्टीला एक चांगली आणि एक वाईट बाजू असते त्याचप्रमाणे हानी/ धोका ही धरणाची
वाईट बाजू आहे.
धरणांचे ज्या प्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटेही आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्या गोष्टीचे दुष्परिणाम दिसून येतात. गेल्या काही वर्षांत धरणांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा अनुभव अनेक लोकांनी घेतला अनेक लोकांनी पहिला आहे. आज या प्रकल्पाच्या माध्यामतून जवळच्या धरणाचा अभ्यास, तसेच धरणांमुळे होणारे फायदे आणि धरणांमुळे वाढत जाणारे धोके याबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
१) |
प्रकल्प विषयाचे महत्व |
२) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
३) |
प्रकल्प कार्यपद्धती |
४) |
धरणाची माहिती |
५) |
नद्यांवर बांधलेल्या धरणांमुळे होणारे फायदे |
६) |
नद्यांवर बांधलेल्या धरणांमुळे पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम: |
७) |
प्रकल्प निरीक्षणे |
८) |
निष्कर्ष |
९) |
संदर्भ |
प्रकल्प विषयाचे महत्व.
निसर्गाचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणातील
विविधता टिकवून ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये वन्य जीवांचे रक्षण करणे हे
सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. धरणांच्या सामाजिक,
आर्थिक व पर्यावरणीय परिणामाचा अभ्यास केला तर सर्वात प्रथम पाणलोटक्षेत्र व लाभक्षेत्र
यांमुळे कोणती हानी होते याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. मोठ मोठ्या धरणामुळे मोठ्या
प्रमाणावर पाणी अडवले जाते परंतु हेच साचलेले पाणी भोवतालच्या भागामध्ये पसरते आणि
पाणलोटक्षेत्रामधील मोठ मोठी जंगले आणि जमीन पाण्याखाली जाते. या सर्वाचा परिणाम
म्हणजे आज अनेक प्राण्यांच्या जाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, कित्येक हेक्टर
जमीन क्षारयुक्त झाली आहे.
ज्या प्रमाणे धरणांचे फायदे माणसाला झाले आहेत त्याचप्रमाणे
माणसाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान देखील झाले आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या धरण
अपघातांमध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले. अचानक सोडलेला पाण्याच्या प्रवाहामुळे काही
क्षणात गावेच्या गावे उध्वस्त झाली, मोठ मोठ्या धरणांमुळे भूकंप होण्याचा धोका देखील
वाढतो.
वरील होणाऱ्या धरणांच्या फायद्याचा आणि तोट्याचा सविस्तर
अभ्यास करणे हे आज महत्वाचे ठरत आहे. म्हणून स्थानिक किंवा जवळच्या धरणाचा अभ्यास
आणि पर्यावरण या विषयाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
Dam evs project 12th - Evs project for class 12 in Marathi - Evs project for class 12 maharashtra board pdf - Evs project topics for 12th - Evs project for class 12 pdf
प्रकल्प उद्दिष्ट्ये
· धरणांमुळे होणाऱ्या फायद्यांचा अभ्यास करणे.
· धरणांमुळे वाढत जाणाऱ्या धोक्यांचा अभ्यास करणे.
· धरणांचे अपघात होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणे.
· धरण आणि पर्यावरण यांचा एकत्रित अभ्यास करणे.
· धरणे आणि पर्यावरण या विषयाबाबत अधिक माहिती इतरांना मिळवून देणे.
प्रकल्प कार्यपद्धती
‘वन्यजीव संवर्धन’ या प्रकल्प विषयाबाबत माहिती
मिळविण्यासाठी मी वर्तमान पत्रे, पर्यावरण विषयक पुस्तके यांच्या
माध्यमातून माहिती मिळविली. तसेच परिसरातील लोकांशी चर्चा करून वन्य जीव संवर्धन
या विषयाबाबत त्यांची मते जाणून घेतली. त्यांच्याशी संवाद साधून प्राप्त झालेल्या
माहितीच्या आधारे प्रकल्पाचे मुद्दे तयार करण्यात आले.
तयार झालेल्या मुद्द्यांबाबत अधिक सविस्तर माहिती मिळवता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. उपलब्ध माहितीचे संकलन केले .अशा प्रकारे प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.
धरणाची
माहिती
धरणाचे नाव :कोयना
कोयना धरणाची निर्मिती ही सिंचन आणि जलविद्युत
निर्मितीसाठी करण्यात आली. कोयना धरण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण
तालुक्यात कोयनानगर या ठिकाणी कोयना नदीवर
बांधण्यात आलेला महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा धरण प्रकल्प आहे. सुमारे ५००
मि.मी. इतका सरासरी पाऊस दरवर्षी कोयना धरण परिसरात पडतो. सदर धरणाची बांधणी ही
रबल कॉंक्रीट या प्रकारची आहे. कोयना धरणाची उंची सुमारे १०३.०२ मीटर इतकी तर
लांबी ८०७.७२ मी. इतकी आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण म्हणून कोयना धरणाची
ओळख आहे. कोयना धरणाची पाणी साठवणूक क्षमता २७९७.४ दशलक्ष घनमीटर. इतकी आहे. त्यापैकी २६७७.६
द.घ.मी. इतकेच पाणी वापरण्यायोग्य आहे. कोयना धरण प्रकल्पामुळे १२१०० हेक्टर इतके
क्षेत्र ओलिताखाली आले आहे. एकूण ९८ गावांचा ओलिताखालील क्षेत्रात समावेश होतो.
धरणाचे दरवाजे S – आकार या प्रकारातील असून त्याची लांबी ८८.७१ मी. इतकी आहे. धरणाच्या दरवाज्यातून होणारा सर्वोच्च विसर्ग हा ५४६५ घ.मी. प्रती सेकंद इतका आहे. (१२.५० X ७.६२ मी) आकाराचे एकूण ६ दरवाजे बसविण्यात आले आहेत. या धरणाच्या बांधकामाला सन १९५४साली सुरुवात झाली आणि १९६७ साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. कोयना धरणामध्ये असणारा जलसाठा हा शिवसागर या नावाने सर्वत्र ओळखला जातो. याच कोयना धरणाच्या काठावर कोयना अभयारण्य स्थित आहे .
नद्यांवर बांधलेल्या धरणांमुळे होणारे फायदे
1.
वीज उत्पादन :
औद्योगिक विकास साधत असताना ज्याप्रमाणे
उद्योगांमध्ये कच्च्या मालाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे विजही अत्यावश्यक असते.
धरणांतील पाण्याचा उपयोग करून वीज निर्मिती केली जाते. कोळशाचे साठे मर्यादित आहेत
आणि त्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला तर खूप मोठ्या प्रमाणवर प्रदूषण देखील होते.
याउलट वाहत्या पाण्यापासून वीजनिर्मिती करणे कमी खर्चिक आणि निसर्गासाठी लाभदायक
आहे. धरणे ही औद्योगिक कारणासाठी योगदानच आहेत.
2.
औद्योगिक तसेच घरगुती
वापरासाठी पाणीपुरवठा
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत जाणाऱ्या
औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. त्यामुळे वर्षाचे बारा
महिने उद्योगांना पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक असते. आणि जर उद्योगांना सतत
पाणीपुरवठा करायचा झाल्यास कृत्रिम धरणे हा एकच पर्याय शिल्लक आहे. पाण्याची ही
सोय नद्यांवर बांधलेल्या धरणांच्या माध्यमातून पूर्ण होते.
विहिरी आणि कुपनलिका यांच्या माध्यमातून
मिळणाऱ्या पाण्याचा वापर हा बागायतीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याने
पिण्याच्या पाण्यासाठी आत्ता खेड्यापाड्यांतील लोकांना भूगर्भातील पाण्यावर
अवलंबून राहता येत नाही. त्याच प्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे
शहरे ही फुगत चालली आहेत. ही पाण्याची गरज भागवण्यासाठी धारांमध्ये उपलब्ध
असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. शहरांची तहान या मोठ मोठ्या धरणातून भागवली
जाते.
3.
दुष्काळ निवारण करणे
भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती दर दोन ते तीन
वर्षांनी येतेआणि त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतीचे होणारे हे
नुकसान टाळण्यासाठी धरणातील पाणी शेतीसाठी वापरून दुष्काळाच्या परिस्थितीवर काही
प्रमाणात तोडगा काढता येतो. दुष्काळी परिस्थितीमध्ये गावांची तहान देखील धरणाच्या
सहाय्याने भागवली जाते.
4.
पूर नियंत्रण
भारतामध्ये काही भागांत दरवर्षी अतिवृष्टी होऊन
मोठे पूर आल्याने माल मात्तेचे प्रचंड नुकसान होते. गुरे ढोरे वाहून जातात मोठ्या
प्रमाणवर जीवित व वित्तहानी होते. अशा वेळी एकाच वेळी जास्त पडणाऱ्या पावसाचे पाणी
एका खाली एक साखळी पद्धतीने बांधलेल्या धरणांमध्ये साठवून त्या पाण्याचा हळूहळू
विसर्ग करून पुराचा धोका टाळता येतो.
5.अन्न
धान्याची गरज
प्रचंड वेगाने वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त जमीन ही सिंचनाखाली आणणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्यासाठी शेतीसाठी सिंचन व्यवस्था असणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. धरणामुळे सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने शेतकऱ्याला अधिकाधिक उत्पन्न घेणे शक्य होते. तसेच विविध प्रकारचे पिक लागवड एकामागोमाग एक लाऊन योग्य उत्पन्न मिळवणे शक्य होते. पाण्यामुळे शेतीची उत्पादकता वाढते . यासाठी नद्यांमधून समुद्राला वाहत जाणारे पाणी अडवून त्या पाण्याचा वापर हा शेतीसाठी केल्याने उत्पादनात वाढ होऊन फायदाच पाहायला मिळतो.
नद्यांवर बांधलेल्या धरणांमुळे पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम:
Ø भूकंपाचा धोका
धरणामध्ये साठलेल्या प्रचंड पाण्यामुळे भूकंपाचा
धोका आजूबाजूच्या परिसराला बसतो हे आता नेहमीचे झाले आहे. जेथे भूकंपप्रवण क्षेत्र
नाही त्या ठिकाणी धरणामुळे भूकंप होणार नाही असा पूर्वी गैरसमज होता. परंतु गेल्या
काही वर्षांत ही समजूत चुकीची ठरली आहे. जलाशयांमुळे देखील भूकंप होऊ शकतो हे
सिद्ध झाले आहे.
१९६२ पासून कोयना धरण प्रकल्प भरण्यास सुरुवात
झाली. यानंतर सन १९६३ पासून कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवू
लागले. मात्र हे धक्के काही कालावधीनंतर कमी झाले त्यामुळे भूकंपाचा धोका टळला असा
सर्वांचा समज झाला. परंतु यानंतर १९७६ साली बसलेल्या भूकंपाच्या दोन तीव्र
धक्क्यांमध्ये ७७ लोकांनी आपले प्राण गमावले, हजारो लोक बेघर झाले,
मोठ्या प्रमाणवर जीवित व वित्तहानी झाली आणि कोयना नगरचा परिसर उजाड
झाला. या धक्क्यांमुळे धरणाच्या भिंतीला देखील हादरा बसला. त्यामुळे मोठी धरणे ही
भूकंपाच्या परिस्थितीला कारणीभूत ठरतात.
Ø
जंगलांचा नाश
डोंगराळ भागातील जागा ही धरण बांधण्यासाठी निवडली
जाते. डोंगराळ भागात मानवी वस्ती नसल्याने त्याच ठिकाणी मोठ मोठी जंगले असतात.
त्या ठिकाणी मोठी जंगले बांधल्यामुळे पाण्याचा फुगवटा मारल्याने धरणक्षेत्रातील
जंगलेच्या जंगले पाण्याखाली जातात आणी जंगलांचा नाश होतो. एकदा का धरण उभारले की
त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते, त्या ठिकाणी चालणारे कामकाज
पाहण्यासाठी कार्यालये, त्या त्या धरणाच्या ठिकाणी तयार
होणारी वीज तसेच धरणातील पाणी मानवी वस्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी , विजेचे खांब उभे करण्यासाठी जंगलांची अनिर्बंध तोड केली जाते. जंगलाचा नाश
झाला की त्या ठिकाणी असलेली वनस्पतीसृष्टी, औषधी वनस्पती
देखील लुप्त होतात.
Ø
शेतजमिनीचा ऱ्हास :
धरणात जस जशी पाण्याची पातळी वाढत जाते तस तशी
धरणाच्या आजूबाजूला असलेली सुपीक जमीन सुद्धा पाण्यात बुडते. काही वेळेला धरणातील
पाण्याच्या विसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीवर पसरल्याने तेथील जमीन
क्षारयुक्त बनते.
Ø
वन्य जीवनाचा ऱ्हास :
मोठ मोठ्या धरणांमुळे मोठ्या प्रमाणवर वन्य
जीवनाचा नाश होते. जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी वास्तव्य करीत असतात. जंगलाशी
त्यांचे अस्तित्वच निगडीत झालेले असते. माणसाच्या भौतिक विकासापायी शेकडो वन्य
प्राणी,
पक्षी आणि जीवजंतू यांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. धरण उभारणीच्या
कामात जंगल कापावे लागते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या प्राण्यांना दुसऱ्या
जंगलात स्थलांतर करावे लागते परंतु काही प्राण्यांच्या जाती दुसरे सुरक्षित ठिकाण
शोधू न शकल्याने त्या ठिकाणीच अडकून पडतात. काही वेळेला हेच प्राणी मानवी
वस्तीमध्ये शिरकाव करतात.
पर्यावरण प्रकल्प pdf - पर्यावरण प्रकल्प १२वी pdf - पर्यावरण प्रकल्प प्रस्तावना
Ø
अपघातांचा संभव :
अलीकडच्या काळामध्ये सर्वत्र अजस्त्र धरणे
बांधण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी १ % इतक्या धरणांचे अपघात होतात. धरणे बांधण्यासाठी
आवश्यक असणाऱ्या सुरक्षित जगही संपुष्टात येऊ लागल्या आहेत. धरण उभारणी करण्यासाठी
योग्य जागा कोणती हे तांत्रिकदृष्ट्या न ठरवता राजकीय व अन्य स्वरूपाच्या
दबावाखाली ठरवण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. भारतातील ४१ धरणांचे अपघात होता होता वाचले. १४ धरणे फुटली. भारतातील सर्वात मोठा
धरण अपघात हा गुजरात येथी मछु-२ धरणाच्या भिंतीवरून वाहून जाईल इतक्या प्रमाणात
पाणी भरल्याने ते फुटले या अपघातामध्ये सुमारे दीड हजार लोक प्राणास मुकले. धरण
बांधताना होणाऱ्या तांत्रिक चुका, देखरेखीतील हलगर्जीपणा, बांधकामातील भ्रष्टाचार यांसारखी अनेक करणे धरणांच्या अपघाताला कारणीभूत
ठरतात.
निरीक्षणे
महाराष्ट्रातील धरणे
Ø प्रमुख
धरणे
• जायकवाडी धरण • मुळा धरण •इटियाडोह धरण • सूर्या धरण • उजनी धरण • उरमोडी
धरण • पानशेत धरण • ओझरखेड धरण • कण्हेर धरण • कालिसरार धरण • कोयना धरण • खडकवासला
धरण • चासकमान धरण • डिंभे धरण • राधानगरी धरण • दूधगंगा धरण • वर्धा धरण • नीरा देवघर
धरण • पवना धरण • बलकवडी धरण • भंडारदरा धरण • भाटघर धरण • माजलगाव धरण • मुळशी धरण
•लॉईड्स डॅम • वारणा धरण • वीर धरण • सिद्धेश्वर धरण •
Ø मध्यम
धरणे
• हातपूर धरण • हूमण धरण •अंजानसारा धरण • अस्खेडा
धरण • काटेपूर्णा धरण • खडकपूर्णा धरण • गंगापूर धरण • भातसा धरण • मांजरा धरण • भाम धरण • भीमकुंड धरण • जयगांव धरण • जामदा धरण
• टेमघर धरण • दुधना धरण • देवगड धरण • धोम धरण • नलगंगा धरण • पुजारीटोळा धरण • पूस
धरण • बोरी धरण • माणिकडोह धरण • सती धरण • सापली धरण • पेच धरण • पैनगंगा धरण
Ø छोटी
धरणे
• वैतरणा धरण • आढळा प्रकल्प •कठाणी धरण • कडवा धरण • करंजवन धरण • गिरणा धरण • गोसीखुर्द धरण • पिंजल धरण • पुनंद धरण • घोड धरण • चणकापूर धरण • चांदोली धरण • येडगांव धरण • येलदरी धरण • वाघड धरण • तानसा तेरणा धरण • दरणा धरण • दहीगाव धरण • नाथसंग्रह धरण • निळवंडे धरण • बाभळी, बंधारा • बारवी धरण • बेंबला धरण • मांडओहळ धरण • वाघूर धरण • वाण धरण धरण • तारळी धरण• तिल्लारी धरण •तुलतूल धरण
Evs project for class 12 maharashtra board pdf - Evs project topics for 12th - Evs project for class 12 pdf
निष्कर्ष
· जवळच्या
धरणाबाबत माहिती घेणे शक्य झाले.
· धरणांमुळे
होणाऱ्या फायद्यांचा अभ्यास करून त्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
· धरणांमुळे
वाढत जाणाऱ्या धोके जाणून घेतले आणि त्या
धोक्यांबाबत अधिक माहिती मिळविणे शक्य झाले.
· धरणांचे
अपघात होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कारणांचा अभ्यास केला.
· धरण
आणि पर्यावरण यांचा एकत्रित अभ्यास करून सविस्तर माहिती जाणून घेतली.
संदर्भ
पर्यावरण पुस्तिका