अपारंपरिक उर्जा वापर
आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत.अपारंपरिक उर्जा
स्त्रोत वापर ११वी,१२ वी पर्यावरण विषयक प्रकल्प. या
प्रकल्पांची पुढील मुद्यांच्या आधारे संपूर्ण प्रकल्पाची माहिती माहिती उपलब्ध
करून देण्यात आली आहे. प्रकल्प प्रस्तावना, प्रकल्पाची उद्दिष्ट्ये,
प्रकल्प विषयाचेमहत्व, प्रकल्पकार्यपद्धती,
विश्लेषण, निरीक्षणे, निष्कर्ष इत्यादी मुद्द्यांच्या आधारे
संपूर्ण प्रकल्पाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रकल्प प्रस्तावना
मानवी
समाजासमोर अनेक आव्हाने उभी राहात आहेत . त्यापैकी उर्जा संसाधनांचे मर्यादित साठे
आणि पारंपारिक उर्जा संसाधनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नव नवीन समस्या निर्माण
होऊ लगल्या आहेत. अपारंपरिक आणि पारंपारिक ऊर्जा संसाधने ऊर्जेचा स्त्रोत हा विविध
उपयोगासाठी वापरात येणारी ऊर्जा बरेच काळापर्यंत पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देत
असतो . अपारंपरिक ऊर्जासंसाधने ही निसर्गामध्ये सतत निर्माण केली जातात आणि अशी
ऊर्जा संसाधने अक्षय ऊर्जासंसाधने समजली जातात . सौर ऊर्जा , पवन ऊर्जा , समुद्री लाटांपासून तयार होणारी ऊर्जा ,
जैव ऊर्जा , भू - औष्णिक ऊर्जा आणि
हायड्रोजनपासून तयार होणारी ऊर्जा यांचा यामध्ये समावेश होतो . ही ऊर्जासंसाधने
पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतात .
अपूर्णनिर्मितीक्षम
ऊर्जासंसाधने ही लाखो वर्षीच्या घडामोडीद्वारे निसर्गामध्ये तयार झालेली आहेत आणि
त्यांचा क्षय झाल्यास निसर्गामध्ये ही ऊर्जासंसाधने त्वरित उपलब्ध होऊ शकत नाहीत .
कोळसा ,
पेट्रोलियम , नैसर्गिक वायू आणि आण्विक ऊर्जा
यांचा यामध्ये समावेश होतो .
या
प्रकल्पाच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कोण कोणते आहेत? त्यांच्या वापराचे फायदे काय आहेत? याबाबत सविस्तर
माहिती मी या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्याची प्रयत्न केला आहे.
Aparamparik urja strot project pdf download - Aparamparik urja strot project in Marathi - Aparamparik uraja stot in mhnaje kaay - Aparamparik urja strot in Marathi
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
१) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
२) |
विषयाचे महत्व |
३) |
प्रकल्प कार्य पद्धती / अभ्यास पद्धती |
४) |
प्रकल्प निरीक्षणे |
६) |
प्रकल्प विश्लेषण |
७) |
निष्कर्ष |
८) |
संदर्भ |
प्रकल्प उद्दिष्टे
Ø अपारंपरिक उर्जा स्त्रोत संकल्पना जाणून घेणे .
Ø अपारंपरिक उर्जा स्त्रोत वापरण्याची गरज का निर्माण झाली आहे याबाबत अधिक माहिती मिळविणे.
Ø अपारंपरिक उर्जा स्त्रोत कोण कोणते आहेत ते जाणून घेणे.
Ø अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचे महत्व जाणून घेणे.
Ø अपारंपरिक उर्जा स्त्रोतांबाबत सविस्तर माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे.
Aparamparik urja strot mahatwa - Aparamparik urja strot information in Marathi - Evs project in Marathi pdf download - Evs project in Marathi for 12th std
प्रकल्प विषयाचे महत्व
विविध
प्रकारच्या पारंपारिक उर्जा संसाधानांपासून मिळणाऱ्या उर्जेपासून प्रत्यक्ष रित्या
जरी प्रदूषण होत नसले तरिही पारंपारिक उर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्यामुळे
तसेच अनेक औद्योगिक प्रक्रियांमुळे अनेक प्रकारचे टाकावू पदार्थ आणि प्रदूषके
निर्माण होतात.
अपारंपरिक
उर्जा स्त्रोतांपासून उर्जा निर्मिती करीत असताना पर्यावरणाचे प्रदूषण होत नाही.
अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा एक फायदा असा आहे की याच्या वापरामुळे पारंपारिक
उर्जा स्त्रोतांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. पवन चक्कीपासून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे
पर्यावरणास सर्वात कमी नुकसान होते . याद्वारे कमीतकमी जागेत जास्तीत जास्त ऊर्जा
आपणास मिळू शकते . हवा प्रदूषण अत्यंत कमी प्रमाणात घडून येते. अत्याधुनिक
टर्बाइन्स कमीत कमी वेळात तसेच कमी आवाज करतील अशा पद्धतीने बनविण्यात येत आहेत .
याशिवाय त्यांच्यामुळे पक्ष्यांनाही कमीत कमी इजा पोहचेल अशा रीतीने त्याची रचना
केली जात आहे. याच्या उलट पारंपारिक उर्जा स्त्रोतांमुळे पक्षांचे अस्तित्व
धोक्यात येत आहे. आम्ल पर्जन्य , तसेच खाणकाम आणि जड धातूंमुळे
होणारे रोग ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत .
वाढत्या
प्रदूषण आणि पारंपारिक उर्जा स्त्रोतांचे असलेले मर्यादित साठे यांचा विचार केला
तर आज अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा अभ्यास करून त्यांचा उर्जा निर्मित्साठी उपयोग
करणे हे खूप गरजेचे आहे.
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती
‘अपारंपरिक
उर्जा वापर’ या प्रकल्प विषयाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी मी प्रश्नावली, आणि
मुलाखत या कार्यपद्धती चा अवलंब केला. परिसरात राहणाऱ्या लोकांना प्रश्नावली
द्वारे प्रश्न विचारण्यात आले व त्यांच्याकडून पारंपारिक उर्जा स्त्रोत
वापरल्यामुळे होणाऱ्या पर्यावरण हानीबाबत माहिती मिळविण्यात आली. त्याच प्रमाणे
पारंपारिक उर्जा स्त्रोतांना पर्याय म्हणून आपण अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा कशा
प्रकारे वापर करू शकतो याबाबत प्रत्येकाच्या कल्पना जाणून घेतल्या . त्यांच्याकडून
मिळालेल्या माहितीमध्ये भर घालण्यासाठी वर्तमानपत्रे, पर्यावरण विषयक पुस्तके
यांच्या माध्यमातून अधिक माहिती मिळविली.
प्रश्नावली
, मुलाखत यांच्या माध्यमातून मुद्दे तयार करून प्रकल्पांच्या मुद्द्यांची मांडणी
करण्यात आली आणि तयार झालेल्या मुद्यांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करण्यात आला. संकलित केलेल्या माहितीची
योग्य प्रकारे मांडणी करून ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली
आहे. सदर उपलब्ध झालेल्या माहितीच या आधारे प्रकल्पाची निरीक्षणे नोंदवण्यात आली
आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष नोंद केली.
निरीक्षणे
अपारंपरिक उर्जा स्त्रोतwww.educationalmarathi.com |
|
१. |
पवनउर्जा |
२. |
जलविद्युत |
३. |
सागरी लाटांपासून मिळणारी
ऊर्जा |
४. |
सौर ऊर्जा www.educationalmarathi.com |
५. |
द्रव इंधने |
६. |
भू-औष्णिक उर्जा |
विविध स्त्रोतांचा एकूण उर्जा वापर
पर्यावरण प्रकल १२ वी विषय मराठी - अपारंपरिक उर्जा स्त्रोत प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये - Aparamparik urja strot mahatwa - Aparamparik urja strot information in Marathi - Evs project in Marathi pdf download
विश्लेषण
अपारंपारिक उर्जा स्त्रोत
१ ) पवन ऊर्जा :
पवनचक्कीच्या
मदतीने पवनऊर्जा निर्माण केली जाते. पवनचक्कीला बसवलेल्या पात्यांना वाऱ्यामुळे
गती मिळते. आणी त्या पात्यांच्या गोल फिरण्यामुळे टर्बाईन द्वारे विद्युत उर्जेची निर्मिती केली जाते.
यातून निर्माण केलेल्या विजेचा वापर पाण्याचा उपसा करण्यासठी , गिरणी चालवण्यासाठी
आणि लाईट मिळविण्यासाठी केला जातो. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जेव्हा पवनचक्क्यांची
उभारणी केली जाते तेव्हा त्याला विंड फार्म असे म्हणतात. पवनचाक्कीद्वारे उर्जा
निर्मिती होण्यासाठी वाऱ्याचा वेग हा प्रतितास किमान १५ कि.मी. प्रतितास इतका असणे
गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले सध्याचे विद्युत टर्बाइन्स हे
६०० किलोवॅटस्पासून ५ मेगॅवॅटस् इतक्या क्षमतेपर्यंत विद्युत ऊर्जेचे उत्पादन करू
शकतात . पवन चक्कीद्वारे मिळणारी विद्युत उर्जा ही वाऱ्याच्या वेगावर अवलंबून
असते., त्यामुळे ज्या वेळी वाऱ्याचा वेग जास्त असतो तेव्हा उर्जा निर्मिती ही
जास्त होते. पवनचक्की च्या उभारणीसाठी मोकळे गवताळ प्रदेश, समुद्रकिनाऱ्यालगतचा
भाग ,
उंच डोंगररांगा व पठार तसेच ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त व नियमित
असतो अशी ठिकाणे निवडली जातात. पवनऊर्जा निर्मितीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण
होत नाही तसेच ही खूप उपयुक्त आहे.
२ ) जलविद्युत :
पाण्यामध्ये
असणाऱ्या ऊर्जेद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. वाहणाऱ्या नद्यांवर मोठी धरणे
बांधून पाणी अडविले जाते आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा केला जातो. आणि हे
पाणी मोठ्या उंचीवरून खाली सोडून त्याद्वारे टर्बाइन्स फिरवल्या जातात. हवेच्या
वस्तुमानापेक्षा पाण्याचे वस्तुमान हे ८०० पटींनी जास्त असल्यामुळे हळू वाहणाऱ्या पाण्यामुळे
ही जास्त वीजनिर्मिती करणे शक्य होते. कमी क्षमतेचे जलविद्युत
प्रकल्प हे १००किलोवॅटस इतकी विद्युतनिर्मिती करू शकतात. जंगल भाग तसेच अतिदूर
डोंगराळ भाग असणाऱ्या ठिकाणी मुख्यत्वे करून कमी जलविद्युत क्षमतेचे प्रकल्प उभारले जातात.
३ ) सागरी लाटांपासून मिळणारी ऊर्जा :
समुद्रामध्ये
निर्माण होणाऱ्या लाटांपासून उर्जा निर्मिती केली जाते. यासाठी भरती आणि ओहोटी
यांच्या लाटांची उंची ही काही मीटर्सपर्यंत असावी लागते. त्याद्वारे टर्बाइन्स
फिरविले जातात. अनेक ठिकाणी व्यावसायिक तत्वावर आज समुद्राच्या लाटांपासून उर्जा
निर्मिती केली जात आहे. उंच लाटांच्या उभ्या दिशेतील असणारी शक्तीचे रूपांतर
विद्युत ऊर्जत केले जाते . लाटांच्या शक्तीवर फिरणारे टर्बाइन्स हे लहान आकाराचे
असतात . साधारणतः पवनचक्कीमध्ये असणान्या टबॉइन्स इतकाच त्यांचा आकार असतो . या
लाटा उंच रूपात मजबूत बांधणी असलेल्या रचनेत येतात व पुन्हा मागे जाताना टर्बाइन्स
फिरवतात त्यातूनच विद्युत निर्मिती होते.
४) सागरी जलातील उष्मांकाचे रूपांतरण :
तंत्रज्ञानाच्या
सहाय्याने समुद्राच्या पाण्याचे असणारे पृष्ठभागावरील तापमान आणि समुद्राच्या तळाशी
असणाऱ्या तापमानातील फरकाचा वापर हा उर्जा निर्मितीसाठी केला जातो. समुद्राच्या
पृष्ठभागावरील पाणी आणि समुद्राच्या तळाशी असणाऱ्या पाण्याचे तापमान यांमध्ये २०
अंश सेल्सिअस इतका फरक असतो हा फरक या पेक्षाही जास्त प्रमाणात असेल तर त्यांपासून
मिळणारी उर्जा ही अखंडित आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. तापमानातील या
फरकाचा वापर करून अमोनिया या उत्ककलन्नांक कमी असणाऱ्या द्रवाची वाफ करून ही वाफ टर्बाइन्स
फिरविण्यासाठी वापरली जाते . आणि उर्जा निर्मिती केली जाते.
५ ) सौर ऊर्जा :
सूर्यापासून
मिळणाऱ्या उर्जेला सौर उर्जा असे म्हणतात. या सौर उर्जेचा वापर विविध प्रकारे केला
जाऊ शकतो. १) घरगुती वापरासाठी आवश्यक असणारे पाणी तापवणे.२) अवकाशात असणाऱ्या उपग्रहांना
सौर ऊर्जेद्वारे विद्युत उर्जा पुरविणे. ३) सौर उर्जेचे रुपांतर उष्णता उर्जेत
करून त्याच्या सहाय्याने अन्न शिजविणे. ४) फोटोव्होल्टाईक सौर सेल्सचा वापर करून
विद्युत ऊर्जा निर्माण करणे .इत्यादी.
६ ) द्रव जैवइंधने :
द्रव
जैवइंधनात ईथेनॉल , जैविक डिझेल किंवा वनस्पतींपासून
काढलेले तेल यांचा समावेश होतो . थोड्या किंवा कोणत्याही बदलाशिवाय आजकालच्या
आधुनिक वाहनांत जैव डिझेलचा वापर केला जाऊ शकतो . वनस्पतींद्वारे मिळविलेल्या
तेलाचा वापरसुद्धा काही स्वरूपात बदललेल्या डिझेल इंजिनमध्ये करता येऊ शकतो .
जैविक डिझेलद्वारे कमीत कमी प्रमाणात प्रदुषके हवेत सोडली जातात . जैविक डिझेलच्या
वापराने कार्बन मोनॉक्साईड व इतर हायड्रोकार्बन्स यांचे प्रमाण २० ते ४०
टक्क्यांपर्यंत कमी केले जाते . आजकाल कित्येक प्रदेशात ऊस , बीट , ज्वारी इत्यादींचे उत्पादन इथनॉलच्या निर्मितीसाठी
घेतले जाते . द्रव इंधने ही एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे वाहून नेता येतात
अथवा कित्येक किलोमीटर्सपर्यंत त्यांनी तत्काळ उपलब्धता होऊ शकते . याशिवाय द्रव इंधनाची
उष्णता निर्माण करण्याची शक्तीही जास्त असते . त्यामुळेच जास्तीत जास्त दळणवळणाच्या
वाहनामध्ये द्रव इंधनांचा वापर दिसून येतो .
७) भू - औष्णिक ऊर्जा :
पृथ्वीच्या
अंतर्भागातील उष्णतेचा वापर भू - औष्णिक ऊर्जा म्हणून केला जातो. भू - औष्णिक उष्णतेचा
वापर तीन प्रकारेकेला जातो. पहिल्या प्रकारामध्ये पृथ्वीच्या अंतर्भागातील कोरड्या
वाफेचा वापर हा टर्बाइन्स फिरवण्यासाठी केला जातो. दुसऱ्या टप्प्यामध्ये
पृथ्वीच्या अंतर्भागातील अति उष्ण असलेल्या पाण्याचा की जायचे तापमान २०० अंश
सेल्सिअस पेक्षा जास्त असते. अशा पाण्याचा वापर हा रासायनिक पदार्थांना उकळवण्यासाठी
केला जातो. आणि तयार होणाऱ्या वाफेद्वारे टर्बाइन्स फिरवल्या जातात. काही ठिकाणी
भू - औष्णिक ऊर्जा ही भूपृष्ठ भागापासून काही किलोमीटर्सवर आढळून येते . आयलँड , न्यूझीलंड , अमेरिका , फिलीपाईन्स
आणि इटलीतील भौगोलिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या काही भागात भू - औष्णिक ऊर्जेचे साठे
भरपूर प्रमाणात आढळतात . अतिजास्त तापमान असणाऱ्या दगडापासून देखील भू - औष्णिक
ऊर्जा निर्माण केली जाते .
प्रकल्प निष्कर्ष
अपारंपारिक
उर्जा संसाधनांमध्ये नैसर्गिकरीत्या पुनर्निर्माण होणान्या सौर ऊर्जा , पर्जन्य जल ऊर्जा , पवन ऊर्जा , समुद्री लाटांपासून तयार होणारी ऊर्जा आणि भू - औष्णिक ऊर्जा यांचा
यामध्ये समावेश होता . अपारंपारिक उर्जा तंत्रज्ञानामध्ये सौरशक्ती , पवनशक्ती , जलविद्युत , जैवऊर्जा
आणि त्यापासून जैवइंधन उत्पादन यांचा समावेश होतो . सन २००६ मध्ये एकूण १८ टक्के
जागतिक ऊर्जा ही पुनर्निर्मितीक्षम संसाधनापासून झाली . त्यातील १३ टक्के ऊर्जा ही
पारंपारिक जैवऊर्जा यापासून प्राप्त झाली . तर जलविद्युतद्वारे ३ टक्के इतकी ऊर्जा
वापरली गेली . फक्त ०.८ टक्के इतकीच ऊर्जा भू - औष्णिक , पवन
, सौर आणि सागरी ऊर्जातंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण जगभर वापरली
गेली . भविष्यात मोठ्या प्रमाणात अशा ऊर्जासाधनांचा वापर केला जाऊ शकतो . या
पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा , संसाधनाचा सध्याचे उपलब्ध
तंत्रज्ञान पुरेपूर वापर करण्यास अल्प ठरत आहे . पुरेशा ऊर्जेचा नियमित पुरवठा आणि
जागेचा अभाव तसेच नागरी व औद्योगिक ठिकाणांपासून खूप दूरवर होणारी निर्मिती हे या
ऊर्जासंसाधनांचे मुख्य आव्हानात्मक मुद्दे आहेत
संदर्भ
Ø पर्यावरण पुस्तिका
महत्वाचे : |
या प्रकल्पाची फ्री pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील Subscribe to Unlock लिंक वर क्लिक करा. subcribe करा आणि back button press करा. |
वरील pdf फाईल चा पासवर्ड मिळविण्यासाठी
खालील video लिंक वर क्लिक करा . video मध्ये तुम्हांला १० character आणि number असेलेला पासवर्ड मिळेल. |
|