BUY PROJECT PDF Click Here!

परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | evs project 11th and 12th Trees information in marathi

Evs project topics Marathi languages Evs project prastavana in Marathi Evs project 12th commers, science, format Marathi पर्यावरण शिक्षण प्रकल्प
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती पर्यावरण प्रकल्प सविस्तर माहिती 


                पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प विषयांबाबत मराठी मध्ये सविस्तर माहिती Educationalमराठी तुमच्यासाठी कायमच उपलब्ध करून देण्यात येते. आजही आपण अशाच एका पर्यावरण प्रकल्पाबाबत सविस्तर महिती पाहणार आहोत. या प्रकल्पामध्ये प्रकल्प प्रस्तावना, प्रकल्प अभ्यास पद्धती\ कार्यपद्धती, प्रकल्प विषयाचे महत्व, प्रकल्पाची उद्दिष्ट्ये, विश्लेषण निष्कर्ष आणि संदर्भ इत्यादी पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. आज आपण खालील 

Evs project in Marathi pdf download  - Evs project in Marathi for 12th std - Evs project in Marathi  information - Environmental project topics for college students pdf


प्रश्न

तुमच्या सभोवतालच्या, नैसर्गिक अधिवासाचा अभ्यास करून वनस्पतींची माहिती मिळावा आणि कोणत्याही १० प्रजातींची माहिती लिहा. 

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती प्रकल्प परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी Paryavarn jalsuraksha prakalp parisarat aadhalnarya vanaspatinchi mahtiti Trees information in Marathi language Vanaspatinchi mahiti


प्रकल्प प्रस्तावना/ प्रकल्प विषय निवड


वनसंपदा ही मानवाने वापरलेले सर्वात जुने नैसर्गिक संसाधन आहे. अगदी प्राचीन काळापासून माणूस स्वतःचे असतीत्व टिकवून ठेवण्यासाठी वृक्षांवरच अवलंबून आहे. झाडे ही भूगर्भातील पाणी धरून ठेवतात. जमिनीची धूप थांबवून अन्न, इंधन, चारा तेथील स्थानिक लोकांना पुरवतात.

लाखो लोकांचे रोजचे जीवन किरकोळ वन उत्पादनावर अवलंबून असते, ही उत्पादने झाडे न तोडता किंवा लाकडावर प्रक्रिया न करता सहजासहजी उपलब्ध होऊ शकतात. औद्योगिक जगतामध्ये वृक्षांना अजूनही महत्वाची संपत्ती मानण्यात येते. अशाच या पदोपदी आपल्याला उपयुक्त ठरणाऱ्या आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींबाबत अधिक माहिती असणे गरजेचे आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरामध्ये आढळणाऱ्या वनस्पतींबाबत  सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण काय आहे? त्या वनस्पतींचा उपयोग कशासाठी केला जातो? तसेच या वनस्पतींचे औषधी गुणधर्म कोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत

प्रकल्प pdf लिंक खाली दिली आहे. 

अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

२)

विषयाचे महत्व

३)

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती

४)

निरीक्षणे

६)

विश्लेषण

८)

निष्कर्ष

९)

संदर्भ



प्रकल्प उद्दिष्टे


Ø  परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींबाबत  माहिती मिळविणे.


Ø  परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण जाणून घेणे.

Ø  वनस्पतींचे औषधी गुणधर्मांचा अभ्यास करणे.

Ø  परिसरातील वनस्पतींचे कोण कोणते उपयोग होतात याबाबत माहिती मिळवणे.

Ø  परिसरात आढळणाऱ्या फुलझाडांची माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे.

 

 

प्रकल्प विषयाचे महत्व


आपल्या पृथ्वीतलावर वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता पाहायला मिळते. त्याचबरोबर विषमता देखील आढळते. आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी सुमारे ४० लाख इतक्या वनस्पतींची नोंद केली आहे. या वनस्पतींमध्ये अगदी सूक्ष्म वनस्पतींपासून ते अगदी महाकाय वृक्षांपर्यतच्या वनस्पतींचा समावेश आहे. आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींचा विचार केला तर त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणवर विविधता आढळते.

आपल्या परिसरामध्ये विविध झाडे आढळतात. रोजच्या जीवनामध्ये आपल्याला विविध प्रकारची झाडे उपयोगी ठरत असतात. परंतु त्या झाडांबाबत आपल्याला पूर्णपणे माहिती नसते. आपल्याला फक्त माहिती असते ते म्हणजे त्या झाडाचे स्थानिक नाव आणि त्याला येणारी फळे आणि फुले , क्वचितच आपल्याला त्या झाडाचे उपयोग आणि औषधी गुणधर्म माहिती असतात. आपल्याला कधी कधी छोटे – छोटे आजार होतात त्या वेळी त्या आजारांवरील औषधे ही आपल्या पर्यावरणात वृक्षांच्या स्वरुपात उपलब्ध असतात परंतु आपल्याला पुरेशी माहिती नसल्याने आपण त्यांचा वापर करत नाही.

आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध वनस्पतींबाबत आपल्याला अधिक माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून हा प्रकल्प विषय खूप महत्वाचा आहे.

 

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यास पद्धती


परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती’ या प्रकल्प विषयाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी मी सर्वेक्षण, प्रश्नावली, आणि मुलाखत या कार्यपद्धती चा अवलंब केला. परिसरात राहणाऱ्या लोकांना प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले व त्यांच्याकडून परिसरात असणाऱ्या वनस्पतींबाबत माहिती मिळविण्यात आली. परिसरात असलेल्या वनस्पतींचे औषधी गुणधर्म जाणून घेण्यासाठी परिसरातील वयस्कर व्यक्तींची मदत घेतली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये भर घालण्यासाठी वर्तमानपत्रे, पर्यावरण विषयक पुस्तके यांच्या माध्यमातून अधिक माहिती मिळविली.

प्रश्नावली , मुलाखत यांच्या माध्यमातून मुद्दे तयार करून प्रकल्पांच्या मुद्द्यांची मांडणी करण्यात आली आणि तयार झालेल्या मुद्यांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करण्यात आला. संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करून ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर उपलब्ध झालेल्या माहितीच या आधारे प्रकल्पाची निरीक्षणे नोंदवण्यात आली आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष नोंद केली.

 

परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती प्रकल्प - परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी

प्रकल्प  निरीक्षणे


परिसरात आधाणाऱ्या वनस्पती आणि त्यांचा जगण्याचा कालावधी 


अ.क्र.

फुलांची नावे

वनस्पतीचे आयुष्य

१.

आंबा

100 वर्षे

२.

पिंपळ

900 -1,500 वर्षे

३.

नारळ

60-70 वर्षे

४.

फणस

100 वर्षांहून अधिक

५.

काजू

60वर्षे

६.

वड

200 ते 300 वर्षे

७.

अशोक

50 वर्षे

८.

गुलमोहर

20-25 वर्षे

९.

कोकम

70 वर्षांपेक्षा जास्त

१०.

शेवगा

30-40 वर्षे


Paryavarn jalsuraksha prakalp parisarat aadhalnarya vanaspatinchi mahtiti - Trees information in Marathi language - Vanaspatinchi mahiti 


परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची सविस्तर माहिती.


1.   आंबा


शास्त्रीय वर्गीकरण

सृष्टी :

वनस्पती

वंश:

Magnoliophyta

जात:

Magnoliopsida

वर्ग:

Sapindales

कुळ:

Anacardiaceae

जातकुळी:

Mangifera


परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी | evs project 11th and 12th Trees information in marathi

 आंबा  (image credit: Pixabay.com)


  • आंब्याचे झाड


आंब्याचे झाड (Mangifera Indica) या झाडाची उंची साधारणतः ३५ ते ४० मीटर उंच असते. आंब्याच्या झाडाचा घेर हा १० मीटर इतका असतो. आंब्याची पाने डहाळीला एकामागोमाग एक अशी येतात आणि ती सदाबहार असतात.

आंब्याच्या एका पानाची लांबी १५-३५ इतकी असून त्याची रुंदी ५ ते १६ सेमी इतकी असते. आंब्याच्या झाडाची पाने ही कोवळी असताना त्या पानांचा रंग काही प्रमाणावर केशरी आणि गुलाबी असतो. आणि तो जलदपणे गडद लाल होतो. पाने जशी जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा दिसू लागतो. आंब्याच्या झाडाला येणाऱ्या फुलांना मोहर असे म्हटले जाते. या फुलांना मंद सुवास असतो. या फुलांची लांबी ५ ते १० मिमी इतकी असते. ही फुले एकत्र गुच्छामध्ये येतात. आंबा हे फळ वनस्पती शास्त्रातील अश्मगर्भी फळ या प्रकारातील असते. आंबा या फळाच्या बाहेरील भागामध्ये गर असतो तर आतील भागात कवच असते. या कवचाच्या आतमध्ये फळाची बी असते. यालाच आंब्याची कोय असे म्हटले जाते.  आंब्याच्या जातींप्रमाणे आंब्याच्या आकारामध्ये  वेगळेपण दिसून येते. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार हा १० ते २५ सेमी. लांब  आणि त्याचा व्यास ७ ते १२ सेमी इतका असतो.


  • आंब्याचे उपयोग

ü आंब्याच्या कैरी पासून चविष्ट लोणचे बनवले जाते.

ü पूर्णपणे पिकलेल्या आंब्याचा आमरस केला जातो.

ü आमच्या हिरव्या कैऱ्या किसतात वाळवतात आणि आमचूर तयार करतात.

ü कैरीपासून आंबट आणी तिखट कैरी बनवली जाते.

ü आंब्याचा रस घालून आंबापोळी तयार केली जाते.

 

 

2.  पिंपळ


शास्त्रीय वर्गीकरण

सृष्टी

वनस्पती

उपसृष्टी

Viridiplantae (विरिडिप्लांटा)

वर्ग :

ट्रॅकोफायटा

उपवर्ग

Spermatophytina

ऑर्डर:

मोरेसी

कुटुंब :

Moraceae (मोरेसी)

वंश :

फायकस

प्रजाती :

फायकस रिलिजिओसा



Evs project in Marathi pdf download Evs project in Marathi for 12th std Evs project in Marathi  information Environmental project topics for college students pdf Environmental project in Marathi project for college students

 पिंपळ (image credit: Pixabay.com)

  • पिंपळ वृक्ष

पिंपळ हे भारतीय उपखंडात आढळणारे वृक्ष आहे. पिंपळाचे झाड खडकावर, जमिनीवर ज्या ठिकाणी जागा मिळेल तेथे वाढतो. पिंपळ हा वृक्ष ‘वट’ ( मोरेसी) या कुळातील आहे. पिंपळाचे वनस्पती शास्त्रातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ असे आहे. पिंपळ हा वृक्ष भारतामध्ये सर्वत्र आढळतो. पंजाब, ओरिसा, कोलकता आणि हिमालयाच्या उतारावरील भागांमध्ये पिंपळ हा वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतो. पिंपळ हा वृक्ष जास्त वर्षे जगत असल्याने त्याला ‘अक्षय वृक्ष’ असे देखील संबोधले जाते.

पिंपळ हा वृक्ष १० ते १५ मीटर इतका उंच वाढतो. याचे खोड पांढरट, लाल, गुलाबी आणि गुळगुळीत असते. पिंपळाची पाने हृदयआकाराची असतात, त्यांचा देठ लांब असतो कोवळी असताना पानांचा रंग गुलाबी तांबूस आणि नंतर हळूहळू हिरव्या रंगाची होतात. पिंपळाची पाने ही सतत हलणारी असतात.

पिंपळ हा वृक्ष सभोवतालचे वातारवण शुद्ध ठेवतो. यामुळे पिंपळ या झाडाला पवित्र मानले जाते. पिंपळ हा वृक्ष कोठेही आणि कसाही वाढणारा असल्यामुळे त्याला मोकळ्या असणाऱ्या जागेतच लावले जाते.  

 

  • पिंपळाचे फायदे


ü खूप जणांचा श्वासाच्या समस्या असतात. या समस्या दूर करण्यासाठी पिंपळाच्या सुक्या फळांचा वापर केला जातो. यामुळे श्वासाचा आजाराबरोबर खोकला देखील कमी होऊन जातो.

ü पिंपळ वृक्षाची साल पाण्यात उकळून घेऊन त्या पाण्याने चूळ भरल्यास दातांचे आजार बरे होतात.

ü पिंपळाच्या काडीने रोज दात घासले तर दात मजबूत होतात आणि दातदुखी थांबते.

ü तापावर गुणकारी

ü तापावर औषध म्हणून पिंपळाच्या पानांचा वापर केला जातो. पिंपळ थंडावा देत असल्यामुळे ताप लवकर उतरण्यास मदत होते.

ü क्षयरोगा सारख्या गंभीर आजार बरा करण्यासाठी पिंपळाच्या मुळाचा वापर केला जातो

ü पोटदुखी ही समस्या प्रत्येकाला कधी न कधी तरी होतेच . पोट दुखी बरी व्हावी यासाठी पिंपळाच्या पानाचा काढा  गुणकारी ठरतो. यामुळे जर एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ती सुद्धा दूर होते.

ü आज काळ बिघडत चाललेली लाइफस्टाइल आणि वाढते प्रदूषण यांमुळे अनेक जणांना हृदयरोगाची समस्या जाणवते. पिंपळाचा उपयोग हृदयरोग बरे करण्यासाठी देखील केला जातो.

 


3.  नारळ.


वैज्ञानिक वर्गीकरण

सृष्टी.

वनस्पती

क्लेड:

मोनोकोट्स

ऑर्डर:

Arecales

कुटुंब:

Arecaceae

उपकुटुंब:

Arecoideae

जमात:

कोकोसी

वंश:

कोकोस

प्रजाती:

कोकोस नुसिफेरा



Environmental project topics for college students pdf Environmental project in Marathi project for college students Evs project topics Marathi languages Evs project prastavana in Marathi Evs project 12th commers, science, format Marathi
नारळ  (image credit: Pixabay.com)


  • नारळाचे झाड

 

नारळाच्या झाडाला  'माड किंवा ' श्रीफळअसे म्हटले जाते याचे शास्त्रीय नाव: कोकोस नुसिफेरा असे आहे. इंग्रजी म्हध्ये coconut म्हटले जाते. नारळ हे झाड विषुववृत्तीय व उष्णकटिबंधीय भागांत प्रामुख्याने समुद्रकिनारी भागांत जास्त आढळतो. नारळ हा ताड कुळातील वृक्ष आहे. याचे फळ हे नारळ म्हणून ओळखले जाते. नारळाच्या झाडाची उंची सुमारे ३० मीटर इतकी उंच असते आणि त्याच्या झावळ्यांची लांबी ५ ते ६ मीटर इतकी असते. या झावळ्या म्हणजे त्या नारळाच्या झाडाची पाने होत. योग्य पाणी आणि माती मिळाल्यास या झाडापासून वर्षभर नारळ मिळतात. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भाग हा मानवाला कोणत्या न कोणत्या कारणासाठी उपयुक्त ठरतो म्हणून या नारळाच्या झाडाला कोंकणात कल्पवृक्ष मानले जाते. 

 

  • नारळाचे फायदे


ü त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी चेहऱ्यावर नारळाच्या दुधाचा मसाज केला जातो त्यामुळे त्वचेवर चकाकी येते. त्वचा तुकतुकीत दिसायला लागते.

ü आपले हृदय हा आपल्या शरीराचा एक महत्वपूर्ण भाग आहे. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपले हृदय निरोग असणे खूप गरजेचे असते. नारळामध्ये खूप पौष्टिक घटक असतात त्यामुळे नारळाचे पाणी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

ü नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला लावल्याने केस मुलायम होतात आणि केस गळण्याचे प्रमाण कमी होते. नारळाच्या पाण्याने केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळते.

ü वजन कमी करण्यास उपयुक्त: नारळाच्या दुधामध्ये फॅट्स अधिक प्रमाणात असतात तरीही हे

ü मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते

ü नारळामध्ये ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात . नारळामध्ये असणारी पौष्टिक तत्वे मेंदूच्या सेल्स सक्रीय करतात. त्यामुळे मेंदू अधिक चांगल्या प्रकारे कार्य करायला लागतो.

 

Environmental project in Marathi project for college students - Evs project topics Marathi languages - Evs project prastavana in Marathi - Evs project 12th commers, science, format Marathi

4. फणस

 

शास्त्रीय वर्गीकरण

सृष्टी

वनस्पती

 

क्लेड

युडिकोट्स

क्लेड

रोसिड्स

ऑर्डर:

Rosales

कुटुंब :

Moraceae (मोरेसी)

वंश :

आर्टोकार्पस

प्रजाती :

A. हेटरोफिलस


पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती प्रकल्प परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी Paryavarn jalsuraksha prakalp parisarat aadhalnarya vanaspatinchi mahtiti Trees information in Marathi language Vanaspatinchi mahiti
फणस  (image credit: Pixabay.com)


  • फणस माहिती

फणस हे फणस हे फळ लंब गोलाकार आकराचे मोठे असते . फणसाला बाहेरून काटेरी आवरण असते. काटेरी आवरणामुळे फणस हा बाहेरच्या बाजूने काटेरी आणि खडबडीत दिसतो. फणसाच्या आतील भागात मध्याभगी मऊ भाग असतो त्याला पाव असे म्हटले जाते. या पावेलाच फणसाचे गरे लागलेले असतात. कोवळ्या फणसाला कुईरी असे म्हटले जाते. इंग्रजी भाषेमध्ये फणसाला Jack Fruit, Jack-orange Woodअसे म्हटले जाते. हिंदीमध्ये कटहर,चक्की, कटहल  अश्या विविध नावांनी ओळखले जाते. तर संस्कृत भाषेमध्ये  कंटकाल, पनस, पलस इत्यादी नावाने ओळखले जाते. फणसाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात १) बरका फणस आणि २) कापा फणस . बरका फणस या जातीमढील फणस हा रसाळ आणि अधिक मधुर असतो. या जातीचे फणस मोठ्या प्रमाणावर कोकणात आढळून येतात. या जातीच्या फणसाचे गरे हे थोड्या प्रमाणवर जास्त चिकट असतात. कापा फणस हा कमी रसाळ आणि कमी गोड असतो. या जातीचे फणस कोकणात कमी प्रमाणात आढळतात.

 

  • फणसाचे उपयोग


ü फणसाच्या कच्च्या गरयांची भाजी केली जाते.

ü कच्चे गरे तळले जातात आणि वर्षभर साठवले जातात. 

ü फणसाच्या रसापासून फणस पोळ्या तयार केल्या जातात.

ü फणसाच्या बिया (आठळ्या) शिजवून त्यांची भाजी केली जाते.

ü फणसाच्या लकडापासून विविध प्रकारची खेळणी तयार केली जातात.

ü तंबोरा आणि वीणा यांसारखी वाद्ये ही फणसाच्या लाकडापासून बनवली जातात.

ü उत्तम प्रतीचे फर्निचर , शोभिवंत वासू , लाकडी पिंजरे कोरीव काम इत्यादींसाठी या झाडाच्या लाकडादाचा वापर केला जातो.



प्रकल्प निष्कर्ष


Ø  परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींबाबत अधिक माहिती  माहिती मिळविणे.


Ø  परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण काय आहे याबाबत माहिती करून घेतली.  


Ø  वनस्पतींचे औषधी गुणधर्मांचा अभ्यास करता येणे शक्य झाले.  


Ø  परिसरातील वनस्पतींचे कोण कोणते उपयोग होतात याबाबत सविस्तर माहिती मिळविली.


संदर्भ


Ø www.educationalmarathi.com

Ø www.mazaabhyas.com

Ø पर्यावरण पुस्तिका



  • प्रकल्प आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
  • तुमच्या काही प्र्काल्पाबत सूचना असतील तर त्या सुद्धा कमेंट करा. 


प्रकल्प PDF PASSWORD:



प्रकल्प PDF  

PDF download

1 comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.