BUY PROJECT PDF Click Here!

परिसरातील फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प | Fulanchi mahiti project evs information in marathi

Evs project topics for 12th std Evs project pdf free download पर्यावरण प्रकल्प कार्य पद्धती माहिती पर्यावरण प्रकल्प निरीक्षण मराठी
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास


project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय\ - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा - पर्यावरण प्रकल्प pdf - Evs pdf - Evs project for class 12 in Marathi


पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा पुस्तक pdf जल सुरक्षा माहिती मराठी प्रस्तावना project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा पर्यावरण प्रकल्प pdf Evs pdf Evs project for class 12 in Marathi Evs project topics for 12th std Evs project pdf free download पर्यावरण प्रकल्प कार्य पद्धती माहिती पर्यावरण प्रकल्प निरीक्षण मराठी

पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी  पहाण्यासाठी खालील लिंक  वर क्लिक करा.

अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


आज आपण परिसरात आढळणाऱ्या फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूया आपला प्रकल्प 


प्रकल्प प्रस्तावना


आपल्या पृथ्वीतलावर वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता पाहायला मिळते. त्याचबरोबर विषमता देखील आढळते. आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी सुमारे ४० लाख इतक्या वनस्पतींची नोंद केली आहे. या वनस्पतींमध्ये अगदी सूक्ष्म वनस्पतींपासून ते अगदी महाकाय वृक्षांपर्यतच्या वनस्पतींचा समावेश आहे. जर फुले येणाऱ्या म्हणजेच सपुष्प वनस्पतींचा विचार केला तर त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणवर विविधता आढळते.

या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरामध्ये आढळणाऱ्या फुलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊन. या फुलांचे शास्त्रीय वर्गीकरण काय आहे? त्या फुलाचे सामाजिक उपयोग आणि धार्मिक उपयोग कोणते आहेत? या फुलांचा वापर कशा कशा साठी केला जातो याबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.



अनुक्रमणिका

अ.क्र.

घटक

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

२)

विषयाचे महत्व

३)

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती

४)

निरीक्षणे

६)

विश्लेषण

८)

निष्कर्ष

९)

संदर्भ






















प्रकल्प उद्दिष्टे


Ø परिसरात आढळणाऱ्या फुलांबाबत माहिती मिळविणे.

Ø  परिसरात आढळणाऱ्या फुलांचे धार्मिक उपयोग कोण कोणते आहेत ते माहिती करून घेणे.

Ø  फुलांचा सामाजिक दृष्टीकोनातून अभ्यास करणे.

Ø  फुलझाडांचे औषधी गुणधर्म जाणून घेणे.

Ø  परिसरात आढळणाऱ्या फुलझाडांची माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे.

 

प्रकल्प विषयाचे महत्व

 

आपल्या परिसरामध्ये विविध प्रकारची फुले आढळतात.  आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या फुलांचा वापर देखील करतो. परंतु या फुलांबाबत संपूर्ण माहिती आपल्याला नसते. आपल्याला फक्त माहिती असतो तो त्या फुलाचा रंग, सुवास आणि त्या फुलाचे स्थानिक नाव. आपण रोज जे फुल वापरतो त्या फुलाचे शास्त्रीय वर्गीकरण काय आहे. त्या फुलाचा सामाजिक उपयोग आणि धार्मिक उपयोग कोणता आहे. याबाबत आपल्याला माहितीच नसते.

आपल्या परिसरात आढळणाऱ्या फुलांच्या प्रजातींबाबत आपल्याला अधिक माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून हा प्रकल्प विषय खूप महत्वाचा आहे.

 

 

प्रकल्प निरीक्षणे 

परिसरात आढळणारी फुले आणि फुले येण्याचा कालावधी

अ.क्र.

फुलांची नावे

कालावधी

१.

शेवंती

डिसेंबर, जानेवारी

२.

गुलाब

वर्षभर

३.

जास्वंद

वर्षभर

४.

झेंडू

वर्षभर

५.

कमळ

मार्च ते सप्टेंबर

६.

मोगरा

मार्च ते ऑक्टोबर

७.

कुंद

वर्षभर

८.

सायली

ऑक्टोबर ते जानेवारी




































 माहितीचे विश्लेषण 


परिसरात आढळणाऱ्या फुलांची माहिती

 

1. गुलाब


वैज्ञानिक वर्गीकरण

क्लेड:

ट्रॅकोफाइट्स

क्लेड:

एंजियोस्पर्म्स

क्लेड:

रोसिड्स

ऑर्डर:

Rosales

जमात:

रोझी

वंश:

रोजा

 

परिसरातील फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प | Fulanchi mahiti project evs information in marathi
गुलाब 

फुलांचा राजा म्हणून गुलाबाला ओळखले जाते. गुलाब ही रोझेसी या कुळातील वनस्पती आहे. जगभर गुलाबाच्या १५० हून अधिक जाती असून या गुलाबांच्या जाती विविध रंगामध्ये आढळतात. गुलाबांच्या काही जाती या वेलींच्या स्वरुपात असतात. रानटी प्रकारच्या गुलाबामध्ये गुलाबाला पाच पाकळ्या असतात. २०००० पेक्षा जास्त गुलाबांचे प्रकार हे आतापर्यंत संकर व कलम करून निर्माण केले आहेत.

गुलाबाचे झाड हे झुडूप या प्रकारातील आहे याची उंची १ ते २ मीटर इतकी आहे. खोडावर आणि फांद्यांवर तीक्ष्ण काटे असतात. हे काटे म्हणजेचे वाकलेली शुके होय. गुलाबाची पाने ही संयुक्त एकाआड एक पिसंसारखी असतात. याच्या पर्णिका ३ ते ७ अंडाकार व दातेरी असतात. गुलाबाच्या रंगांमध्ये विविधता आढळते.

गुलाब ही वनस्पती तिच्या फुलांसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी, बागांची शोभा वाढविण्यासाठी , फुलदाणी तयार करण्यासाठी या गुलाबांचा वापर केला जातो. गुलाबांच्या पाकळ्यांतून निघणाऱ्या तेलापासून अत्तर तयार केले जाते. भारत सरकारने १२ फेब्रुवारी हा दिवस ‘गुलाब –दिवस’ म्हणून घोषित केला आहे. गुलाबाचे फुल हे कोमलता आणि सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे.

 

Ø    सामाजिक उपयोग


1.    ग्रामीण भागातील शेतकरी गुलाबाची शेती करून गुलाबाचे उत्पन्न घेतात.

2.    भारतात गुलाबाची शेती कित्येक वर्षांपासून केली जाते.

3.    सुवासिक गुलाबांचा वापर गुलाबाचे तेल बनवण्यासाठी केला जातो.

4.    हजारो ग्रामीण नागरिक फुलांची शेती करून आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून वापर करतात.

5.    गुलाबांच्या पाकळ्यांचा उपयोग गुलकंद बनवण्यासाठी केला जातो. गुलाब पाणी आणि गुलाब अत्तर यांमुळे अनेक कुटीरउद्योग चालतात.

6.    दक्षिण भारतामध्ये गुलाबावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आहेत.

 

Ø    धार्मिक उपयोग


1.   मंदिर, समारंभ, पूजा स्थाने इत्यादी ठिकाणी गुलाबाच्या फुलांना खूप मागणी असते. त्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळते.

 

Evs project topics for 12th std - Evs project pdf free download - पर्यावरण प्रकल्प कार्य पद्धती माहिती - पर्यावरण प्रकल्प निरीक्षण मराठी 

2. जास्वंद

 

शास्त्रीय वर्गीकरण

जातकुळी:

हिबिसकस

जीव:

रोजा-सायनांसिस

नाव:

हिबिस्कस रोजा सायनेन्सिस

 

परिसरातील फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प | Fulanchi mahiti project evs information in marathi
जास्वंद (image credit: dreamstime)


जास्वंदी ही बहुवार्षिक वनस्पती आहे. जास्वंद ही बहुधा झुडूपस्वरुपात आढळते. या फुलांना सुंगंध नसला तरीही जास्वंद या फुलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. जास्वंदाचे फुल हे पांढऱ्या, लाल,  पितारंगी, गुलाबी आणि जांभळ्या रंगाचे असते. या फुलाचा काळ हा सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत असतो.

 

Ø    सामाजिक उपयोग


1.    केस धुण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर केला जातो.

2.    जबाकुसुम हे केशतेल जास्वंदीचा अर्कापासून बनलेले आहे.

3.    जास्वंदीच्या पाना फुलांचा अर्क हा शाम्पुमध्ये देखील वापरला जातो.

4.    रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी इराणमधील वैद्य जास्वंदीचे घटक वापरतात.

 

Ø    धार्मिक महत्व


1.    ज्योतिषशास्त्रामध्ये अशी अनेक रोपे सांगितली आहे की ज्यांची लागवड घरात केल्यामुळे लाभ होतो. या रोपांमध्ये जास्वंद या रोपाचा समावेश होतो.

2.    गणेश चतुर्थीला गणपतील दुर्वांबारोबारच जास्वंदीचे फुल देखील प्रामुख्याने वापरले जाते.

3.    एखाद्या माणसाच्या कुंडलीत जर मंगळ दोष असेल तर त्याला जास्वंदीचे रोप लावण्याचा सल्ला दिला जातो.

4.    जास्वंदाच्या रोपाचे लागवड केल्यावर त्याची योग्य प्रकारे देखभाल करणे, स्वच्छता राखणे महत्वाचे मानले जाते.

 


3. झेंडू

 

शास्त्रीय वर्गीकरण

साम्राज्य

Plantae

विभाग

Tracheophyta

ऑर्डर

ऍस्टरलेस

कुळ

ऍस्टरॅसी

वंश

टॅगेट्स

शास्त्रीय नाव

टॅगेट्स एरेटा

 

परिसरातील फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प | Fulanchi mahiti project evs information in marathi
झेंडू 

शोभेची फुले देणारी झेंडू ही एक औषधी वनस्पती आहे. या फुलांचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. झेंडूच्या झाडांची लागवड संपूर्ण भारतात केली जाते. झेंडूच्या झाडाची उंची अर्धा ते एक मीटर इतके उंच असते. नारिंगी झेंडू, पिवळा झेंडू असे झेंडूच्या फुलांचे दोन मुख्य प्रकार पडतात. झेंडूच्या फुलांच्या काही जाती या मेक्सिको मधून भारतात आल्या आहेत.


विविध भाषेत झेंडूला विविध नावांनी ओळखले जाते. मराठीमध्ये झेंडू किंवा मखमल, इंग्रजीमध्ये मारीगोल्ड, गेंदा, कालगा, मखमली, आणि गुतोरा ही नावे हिंदी भाषेत वापरली जातात. गुजरातीमध्ये झेंडूच्या फुलाला गुलहिरो किंवा मखमला असे म्हटले जाते. संस्कृत भाषेत याचे नाव स्थूलपुष्प,संदू, झंडु आहे. तर झेंडू या फुलाचे शास्त्रीय नाव टागेट्स एरेक्ता (Tagetes erecta) असे आहे


Ø धार्मिक उपयोग


1.    महाराष्ट्रामध्ये झेंडूच्या फुलांच्या माळा वाहनांना तसेच दरवाज्याला दसऱ्याच्या दिवशी लावण्याची प्रथा आहे.

2.    नवरात्री मधील सातव्या दिवशी देवीला झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

3.    पूजेच्या वेळी झेंडूचे फूल अनेक देवी देवतांना अर्पण केले जाते.

4.    अशी मान्यता आहे की हे फूल अनेक देवी-देवतांना खूप प्रिय आहे.

5.    घराच्या मुख्य दरवाज्यावर झेंडूच्या फुलांचा हार टांगणे किंवा फुल टांगणे हे शुभ मानले जाते.

Ø सामाजिक उपयोग / औषधी उपयोग

1.      झेंडूच्या फुलांची चव ही तुरट, तिखट आणि कडू असते.

2.    झेंडूची फुले अपस्मार आकाडीत उपयोगी ठरतात.

3.  झेंडूच्या पानांचा उपयोग मुळव्याध, मुत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूंच्या दुखण्यासाठी वापरली जातात.

4.     कानदुखी असल्यास झेंडूच्या फुलांचा रस कानात टाकला जातो.

5.    छोट्या झेंडूच्या पुष्पात पुष्कळ पाकळ्या असतात. ज्याला बियाणे जोडून ठेवा. अशा प्रकारे, हे फूल ऐक्य देखील दर्शवते.

 

 

4. कमळ

 

शास्त्रीय वर्गीकरण

वंश:

सपुष्प वनस्पती

गण:

प्रोटिआलिस

कुळ:

निलंबियासी

जातकुळी:

निलुंबो ॲडान्स

जीव:

नुसिफेरा

 

परिसरातील फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प | Fulanchi mahiti project evs information in marathi
कमळ 

कमळ ही एक जलीय वनस्पती असून तिचे कुळ निलंबियासी आहे. कमळ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे.

ज्या दलदलीच्या ठिकाणी ऑक्सिजन ची कमी मात्रा असते त्याठिकाणी कमळ या वनस्पतीची वाढ चांगल्या प्रकारे होते. कमळा चे पान आणि फुल हे पाण्याच्या वर किमान २ ते ३ फुट इतके उंच वाढते. या वनस्पतीला मार्च ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत फुले येतातात.

कमळ हे फुल भारत आणि व्हिएतनाम या देशांचे राष्ट्रीय फुल आहे. कमळाची ही प्रजाती प्रामुख्याने भारतात हिमालय ते अगदी खाली श्रीलंकेपर्यत उगवते. या प्रजातीचे फुल हे गुलाबी रंगाचे असून त्याला इंग्रजीमध्ये इंडिअन लोटस किंवा सेक्रेड लोटस असे म्हटले जाते. 


Ø धार्मिक महत्व:


1.   परागीभवन झाल्यानंतर त्याच्यावर सुरुवातीला शेंगदाण्याच्या आकाराच्या हिरव्या रंगाच्या बिया येतात. कमळाच्या या बियांना कमळगठ्ठ्याचे मणी किंवा कमळगठ्ठा या नावाने देखील ओळखले जाते.

2.    या कमळगठ्ठ्याच्या मण्यांचा वापर जपाच्या माळा तयार करण्यासाठी हिंदू धर्मात केला जातो.

3.    त्याचप्रमाणे या मण्यांना लक्ष्मीचे म्हणून देखील मान्यता आहे.

4.    लक्ष्मीपूजन , धनत्रयोदशी  तसेच नवरात्र या  या दिवसांत कमळाचे फूल आणले जाते.

5.    देवीची पूजा करत असताना देवीला कमळाचे फुल वाहणे हे धार्मिक दृष्ट्या विशेष मानले जाते.


Ø सामाजिक महत्व:


1.    कमळ या वनस्पतीचे सर्व भाग खाण्यायोग्य आहेत.

2.    कमळाच्या भागांचा वापर हा आयुर्वेदिक औषधनिर्मितीसाठी केला जातो

 

 

प्रकल्प निष्कर्ष


Ø  परिसरात आढळणाऱ्या फुलांबाबत माहिती मिळविली .

Ø  परिसरात आढळणाऱ्या फुलांचे धार्मिक उपयोग कोण कोणते आहेत ते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

Ø  फुलांचा सामाजिक दृष्टीकोनातून अभ्यास करणे शक्य झाले.

Ø  फुलझाडांचे औषधी गुणधर्म माहित झाले.


प्रकल्प  संदर्भ

 

Ø www.educationalmarathi.com

Ø www.mazaabhyas.com

Ø पर्यावरण पुस्तिका

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील DOWNLOAD BUTTON वर क्लिक करा.

PDF PASSWORD DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

PDF Password पर्यावरण प्रकल्प

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free


1 comment

  1. Gunjan Modi
    Very nice info.and also it's very helpful
निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.