जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट
जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट मराठी माहिती प्रकल्प pdf - जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट मराठी - जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट निष्कर्ष - जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट प्रकल्प प्रस्तावना - जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट प्रकल्प कार्य उद्दिष्टे
पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
प्रकल्प प्रस्तावना
दरवर्षी नवनवीन
रोगांची निर्मिती होत असते आणि या रोगांमुळे अनेक लोक आपला जीव गमावतात तर अनेक जण
या रोगांवर मात करतात. या रोगांमधील काही रोग हे संसर्गजन्य रोग असतात तर काही रोग
संसर्गजन्य नसतात. फ्लू, डोळे येणे अशा रोगांचे रोग जंतू हवेमार्फत झपाट्याने
पसरतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक लोक या एकाच रोगाने ग्रस्त होऊ शकतात. एखाद्या
साम्मैक स्त्रोताचे पाणी कॉलरा सारख्या रोगाच्या जन्तुने दुषित झाले, तर ते पाणी
पिणाऱ्या सर्व लोकांना कॉलरा होण्याचा संभव असतो. एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणवर
डासांची पैदास असेल त्या ठिकाणी अनेकांना एकाच वेळी हिवताप म्हणजेच मलेरिया होऊ
शकतो.
जर या
रोगांबाबत आधीच अधिक माहिती आपल्याजवळ नसेल तर एखाद्या रोगाची आपल्याला किंवा
आपल्या घरातल्या व्यक्तीला लागण झाली असेल तर आपल्याला त्या रोगाची लक्षणे माहिती
नसल्याने आपण साधा आजार समजून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तो आजार अधिक बळावतो आणि
यामुळे काही वेळेला रुग्णावर मृत्यू देखील ओढवू शकतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून
विविध रोगांची माहिती ते रोग होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे, विविध
रोगांची लक्षणे, उपाय, आणि तो रोग होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली गेली पाहिजे. याबाबत
सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
१) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
२) |
विषयाचे महत्व |
३) |
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती |
४) |
रोगांबाबत माहिती |
६) |
रोग प्रसार होण्याचे मार्ग |
७) |
निरीक्षण |
८) |
निष्कर्ष |
९) |
संदर्भ |
पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प - विषय माहिती मराठी - जल सुरक्षा प्रकल्प pdf - जल सुरक्षा माहिती मराठी प्रकल्प - जल संरक्षण प्रकल्प - जल सुरक्षा प्रस्तावना
प्रकल्प उद्दिष्टे
Ø रुग्णालयाला भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती जाणून घेणे.
Ø रुग्णालयात गेल्या एका महिन्यात आलेय पेशंट ची संख्या जाणून घेणे.
Ø गेल्या काही दिवसांत पेशंट च्या संख्येत वाढ झाली का घट याबाबत माहिती मिळविणे.
Ø महिन्याभराच्या या कालावधीत कोणते आजार नोंदवले गेले याबाबत माहिती मिळविणे.
Ø ज्या आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणावर रुग्णालयात आले त्या आजाराची कारणे हे जाणून घेणे.
Ø सदर आजार प्रतिबंधासाठी कोणते उपाय करता येतील.
Ø मलेरिया आणि डेंग्यू या रोगांबाबत अधिक माहिती जाणून घेणे.
Ø सदर रोगांबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवणे.
प्रकल्प विषयाचे महत्व
समाजात एकाच
ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या अनेक लोकांना एकाच वेळी एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण
होते आणि त्या परिसरात रोगाची साथ पसरते. हवा, अन्न, पाणी आणि कीटक इत्यादी रोगप्रसार
होण्याची माध्यमे आहेत. एखाद्या रोगाची लागण आपल्याला होऊ नये म्हणून प्रत्येकाने
प्रयत्न केले पाहिजेत.तसेच रोगप्रसार करणाऱ्या कीटकांची पैदास रोखली तर रोगप्रसार
टाळता येतो. एखाद्या रोगाची साथ टाळणे शक्य असते.म्हणून एखाद्या रोगाबाबत आपल्याला
आधीच माहिती असणे गरजेचे आहे.
जर आपल्याला
एखाद्या रोगाबाबत आधीपासूनच माहिती असेल तर , ज्या वेळी आपल्याला किंवा आपल्या
घरातील व्यक्तीला जर कोणत्या रोगाची लागण होत असेल तर त्याची लक्षणे आपल्याला लगेच
ओळखता येऊ शकतात. आणि त्वरित योग्य तो औषधोपचार घेऊन जीवाचा धोका टाळता येतो.तसेच
तो रोग होऊ नये म्हणून आधीपासूनच काळजी घेता येते. म्हणून आपल्याला रोगांबाबत अधिक
माहिती असणे गरजेचे आहे. विविध रोगांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा प्रकल्प
विषय खूप महत्वाचा आहे.
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यास पद्धती
सर्वेक्षण ठिकाण: रत्नागिरी
नमुना: जवळच्या दवाखान्यात भेट
देऊन तेथील डॉक्टरांना विचारलेली प्रश्नावली.
या प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी मी सर्वेक्षण, मुलाखत, प्रश्नावली या अभ्यास पद्धतीचा अवलंब केला . परिसरात असणाऱ्या दवाखान्यात भेट देऊन त्या ठिकाणी कोणत्या रोगाचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत? त्या रोगाची लक्षणे, उपाय कोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाच्या माध्यमातून स्पष्ट होईल.
डॉक्टरांना विचारलेली प्रश्नावली खालील प्रमाणे:
§ दिवसाला किती रुग्ण रुग्णालयात येत असतात?
§ गेल्या एक महिन्याच्या कालावधीत कोणत्या रोगाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे?
§ सदर रोगाचे किती रुग्ण दिवसाला उपचार घेण्यासाठी येतात?
§ या रोगाची कारणे कोणती आहेत?
§ सदर रोगाची लक्षणे कोणती आहेत?
§ हा रोग होऊ नये म्हणून सर्व लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?
§ या रोगावर औषधोपचार उपलब्ध आहे का?
§ या रोगातून रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण किती आहे?
§ हा रोग होऊ नये म्हणून लोकांनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट मराठी माहिती प्रकल्प pdf - जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट मराठी - जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट निष्कर्ष - जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट प्रकल्प प्रस्तावना - जवळच्या रुग्णालय/डॉक्टर च्या दवाखान्यात भेट प्रकल्प कार्य उद्दिष्टे
प्रकल्प माहिती कशी वाटली आम्हांला कमेंट करून नक्की कळवा.