पाणी जतन करण्याच्या पद्धती व फायदे प्रकल्प
Evs project topics - Evs project in Marathi - Evs project topics for 12th std - Evs project for class 12 - Evs project pdf - Evs project for class 12 maharashtra board
पर्यावरण प्रकल्प लेखन कसे करावे हे पाहण्यासाठी तसेच विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
प्रकल्प प्रस्तावना
मानवाच्या
पृथ्वीवरील अस्तित्वासाठी पाणी हा एक सर्वात महत्वाचा घातक
आहे. पाण्यामुळे पृथ्वीला निळा
ग्रह असे म्हणतात. पृथ्वीचा जवळजवळ तीन चतुर्थाश भाग हा पाण्याने व्यापलेला आहे.
सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठीच नव्हे तर पाणी या संसाधनावर अनेक आर्थिक बाबीही
अवलंबून असतात. शेती, उत्पादनासाठी, औद्योगिक उत्पादनासाठी आणि मानवाच्या विविध
गरजा पूर्ण करण्यासाठी पाण्याची गरज भासते. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाणी या
अत्य्नात मौल्यवान संसाधनला पाणी प्रदूषण आणि पाण्याची कमतरता या दोन महत्वाच्या
समस्या भेडसावत आहेत. वाढते औद्योगिकरण , वसाहतीकरण आणि लोकसंख्यावाढ यांमुळे जलसंपदेचा
ऱ्हास होत आहे.
या
प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी जतन करण्याच्या विविध पद्धतींबाबत सविस्तर माहिती
देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
१) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
२) |
विषयाचे महत्व |
३) |
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यास पद्धती |
४) |
पाण्याचे जतन करणे का महत्वाचे
आहे? |
६) |
पाणी जतन करण्याच्या पद्धती |
७) |
पाणी जतन केल्याने होणारे फायदे |
८) |
निरीक्षण |
9) |
निष्कर्ष |
९) |
संदर्भ |
प्रकल्प विषयाचे महत्व.
निसर्गात
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र कायम चालूच असते. जीवनासाठी आवश्यक असणारे
पाणी आपल्याला पावसाच्या कालावधीत उपलब्ध होते. अलीकडे काही वर्षांत पाऊस पडण्याचा
कालावधी बदलताना दिसतोय. एकावेळी पडणाऱ्या पावसाचे प्रमाणदेखील अनियमित झाले आहे.
चार महिने कमी जास्त प्रमणात पण सातत्यपूर्ण पडणारा पाउस आत्ता वातावरणीय बदलामुळे
लहरी बनला आहे. कधी तो कमी कालावधीत जास्तीत जास्त पडतो तर कधी दोन पावसातला कोरडा
काल्खद दीर्घकाळ लांबतो अशी स्थिती आजकाल वारंवार दिसत आहे. परिणामी पावसाचे पाणी
वेगानी जमिनीवरून वाहून ते जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी होत आहे.
आज पाण्याची
मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवू लागली आहे. म्हणूनच पावसाचे पाणी , तसेच पाण्याच्या
स्त्रोतांमधून आलेले पाणी मानवनिर्मीत उपाय योजना करून अडवले आणि साठवले पाहिजे.
तरच पाण्याचा साठा हा पावसाळ्यानंतर पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी उपलब्ध राहील.
म्हणून पाण्याचे जतन करणे खूप महत्वाचे आहे.
प्रकल्प उद्दिष्ट्ये
१)
या प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा
सुज्ञपणे वापर करण्याचे महत्व समजेल.
२)
आपण पाण्याचे जतन कोणकोणत्या मार्गांनी
करू शकतो त्या मार्गांबाबत अधिक माहिती जाणून घेता येईल.
३)
विविध राज्यांतील पाणी जतन करण्याच्या
पद्धतींबाबत माहिती मिळविणे.
४)
या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांना
पाणी जतन करण्याचे महत्व समजेल.
५)
पाण्याची बचत केल्याने उर्जा कशी वाचते
याबाबत अधिक माहिती मिळविणे.
६)
पाणी जतन करण्याच्या विविध पद्धतींची
माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे.
प्रकल्प कार्यपद्धती/ अभ्यास पद्धती
‘‘पाणी
जतन करण्याच्या पद्धती व फायदे’’ या प्रकल्प विषयाबाबत माहिती मिळविण्यासाठी मी
वर्तमान पत्रे, पर्यावरण विषयक पुस्तके यांच्या माध्यमातून माहिती
मिळविली. तसेच परिसरातील लोकांशी चर्चा करून गेल्या काही वर्षांत पाणी जतन
करण्याच्या दृष्टीने परिसरात केल्या गेलेल्या उपाय योजना यावर प्रश्नावली द्वारे
प्रश्न विचारून माहिती एकत्रित केली. पाण्याचे जतन करणे का गरजेचे आहे हे जाणून
घेण्यासाठी घेण्यासाठी परिसरातील लोकांशी
संवाद साधून या विषयाबाबत त्यांची मते जाणून घेतली. आणि पाण्याचे जतन केल्याने कोण
कोणते फायदे होऊ शकतात / झाले आहेत याबाबत परिसरातील लोकांशी संवाद साधून प्राप्त
झालेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे मुद्दे तयार करण्यात आले.
तयार
झालेल्या मुद्द्यांबाबत अधिक सविस्तर
माहिती मिळवता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक
संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. उपलब्ध माहितीचे संकलन केले .अशा प्रकारे
प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद
मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद
केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद
केली.
हे सुद्धा पहा: परिसरातील पाण्याचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीचा अभ्यास प्रकल्प
पाण्याचे जतन करणे का महत्वाचे आहे?
१)
पाण्याचे वितरण देशातील सर्व भागांमध्ये
असमान आहे.
२)
देशभरातील पाण्याच्या असमान वितरणामुळे
बहुतांश लोकसंख्येला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
३)
शहरी भागांमध्ये पाण्याची गरज ही
उपलब्ध पाण्यापेक्षा जास्त असेलेली दिसून येते.
४)
भारतामध्ये पावसाचे प्रमाण जास्त
असल्याने पिकांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असते. पावसानंतर पिकासाठी पाणी
उपलब्ध व्हावे म्हणून पाण्याचे जतन / साठवणूक करणे गरजेचे आहे.
५)
दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये
म्हणून पाण्याचे जतन करणे गरजेचे आहे.
६)
नद्या आणि आर्द्र प्रदेशांचे आरोग्य
अबाधित ठेवण्यासाठी हे पाणी अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळेच त्यांच्यवर अवलंबून
असलेल्या परीसंस्थांना आधार मिळतो .
Evs project topivs Marathi languages / Evs project prastavana in Marathi / Evs project 12th commers, science, format Marathi / पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf / पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf / पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी
पाणी जतन करण्याच्या पद्धती
Ø रेनवॉटर हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग :
रेनवॉटर
हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता त्याचे संकलन आणि साठवण करणे
होय. पावसाच्या दिवसांत घराच्या किंवा इमारतीच्या छतावर पडणारे पाणी एकत्र केले
जाते आणि ते टाकी, खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोरहोल) यांमध्ये साठविले जाते. रेनवॉटर हार्वेस्टिंग ही
घरांसाठी पाण्याचा स्वयं-पुरवठ्याची सर्वात सोपी आणि जुनी पद्धत आहे.
रेनवॉटर
हार्वेस्टिंग द्वारे उपलब्ध झालेल्या पाण्याचा वापर पिण्याचे पाणी, घरगुती पाणी, पशुधनासाठी पाणी, लहान सिंचनासाठी पाणी आणि निचरा रोखण्याचा मार्ग आणि दैनंदिन वापरासाठी
वापरण्यासाठी केला जातो.
Ø वॉटर मीटरिंग:
वॉटर मीटरिंग
या पद्धतीमध्ये निवासी घरे आणि व्यावसायिक इमारतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या
पाण्याचे प्रमाण मोजले जाते. आणि जेवढा पाणी वापर होईल त्यानुसार कर आकाराला जातो.
वॉटर मीटरिंग हा एक पाण्याचा अपव्यय कमी करण्याचा आणखी एक कार्यक्षम मार्ग आहे.
यामुळे पाण्याची होणारी नासाडी कमी होऊन आपोआप पाण्याची बचत होते.
पर्यावरण प्रकल्प pdf - पर्यावरण प्रकल्प pdf १२ वी - पर्यावरण प्रकल्प १२वी विषय pdf २०२२ - Environmental project in Marathi project for college students - Evs project topivs Marathi languages - Evs project prastavana in Marathi - Evs project 12th commers, science, format Marathi - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf
Ø
ग्रे वॉटर रिसायकलिंग :
ग्रे वॉटर
रिसायकलिंग ही स्वयंपाकघरातील सिंक, वॉशिंग मशीन आणि शॉवर द्वारे वापरलेले आणि
वाया जाणारे पाणी वाचवण्याची एक पद्धत आहे. या पद्धतीद्वारे वाचवलेले पाणी हे नंतर
शौचालयात वापरण्यासाठी, बागेला देण्यासाठी तसेच इतर कामांसाठी वापरले जाते.
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पावसाच्या पाण्याच्या साठवणीच्या पाण्या
पेक्षा या पाण्याचे प्रमाण जास्त असते. या पाण्याचा पुनर्वापर केल्याने घरगुती
पाणी वापर जवळपास ७०% पर्यंत कमी झाला आहे. असे एका सर्वेक्षणानुसार निदर्शनास
आले.
Ø वॉटर प्रेशर रेग्युलेटर
हे सुद्धा पहा: जल पुनर्भरण प्रकल्प
पाणी जतन केल्याने होणारे फायदे
१)
अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या
स्त्रोताचे बळकटीकरण केले जाते.
२)
पाण्याचा दर्जा सुधारतो.
३)
विहीर किंवा बोअरवेल यांचे आयुष्य
आवडते.
४)
परिसरात पाणी तुंबणे, पूर परिस्थिती
निर्माण होणे, इत्यादी गोष्टी टाळता येतात.
५)
पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण
होण्याच्या दिशेने वाटचाल चालू राहते.
६)
सरकारी यंत्रणेवर पाण्यासाठी पूर्णपणे
अवलंबून राहावे लागत नाही.
७)
पाण्यासाठी केल्या जाणाऱ्या खर्चात बचत
होईल.
८)
पुढील पिढीला सुरक्षित पाणीसाठी शिल्लक
राहील.
९)
पाणी जतन केल्याने त्या पाण्याचा
दुष्काळी परिस्थितीमध्ये फायदा होईल.
१०)
पाण्याचा वापर जपून केल्याने भूजल उपसा
कमी होऊन पाण्याची भूजल पातळी टिकून राहील.
भारतातील जल संधारांच्या विविध पारंपारिक पद्धती.
वेगाने
वाढणारे शहरीकरण आणि जलप्रदूषण हे भारताच्या अनेक भागांमध्ये भूपृष्ठजल आणि
भूजलाच्या उपलब्धतेवर आणि गुणवत्तेवर गम्भी परिणाम करत आहेत. आपल्या देशाची कृषी
व्यवस्था अजून देखील पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. बदलत चाललेल्या पर्जन्याचा
विचार करता सरकार आत्ता पारंपारिक जलसंधारण पद्धतींची पुनरुज्जीवन करण्याचा विचार करत
आहे. त्यातील काही पद्धती खाली सूचीबद्ध आहेत.
१) विहीर :
पावसाचे पाणी
जमिनीत मुरते आणि जानिमित मुरलेले पाणी मिळवण्यासाठी विहीर खणली जाते. विहिरीतले
पाणी कायम टिकून राहते.
२) आड:
पिण्याचे पाणी
मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे. त्यांचा घेर कमी असतो. दोरीला बांधलेले भांडे
(पोहरा) टाकून त्यातून पाणी बाहेर काढले जाते.
पूर्वीच्या काळी प्रत्येक गावांमध्ये ‘आड’
असायचे. या आडांना वर्षभर पाणी असायचे. पुढे गावाला नळाने पाणी पुरवेल जाऊ लागले.
त्यानंतर आडांचा वापर काम होऊ लागला. आत्ता फार थोड्या प्रमाणावर माणसे आडांचा
वापर करतात.
३) नदी व बंधारा:
नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध/बंधारे बांधले जातात. आणि मोठ्या प्रमाणावर पाणी अडवले जाते. आणि ते शेती तसेच इतर कामांसाठी वापरले जाते.
४)जुने तलाव :
कमी पावसाच्या
भागात किंवा मोठी नसलेल्या भागात पूर्वी तलाव बांधलेले आढळतात. बहुतांश तलाव
बांधण्यासाठी दगड चुना वापरला जातो. आजही काही ठिकाणी तलाव वापरात असलेले आपल्याला
पाहाला मिळतात.
हे सुद्धा पहा: मृदा प्रदूषण प्रकल्प
५) धरण :
पाणी
साठवण्याच्या व्यावस्थांपैकी आणखी एक म्हणजे धारण. या धरणांमुळे खूप जास्त पणी
साठावता येऊ लागले. जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त शेती पिकवता येऊ लागली. शहरे
वाढू शकली. कारखाने उभे राहू शकले. वीजनिर्मिती करणे शक्य झाले. महाराष्ट्रात
जायकवाडी,
कोयना, उजनी, येलदरी
यांसारखी अनेक मोठी धरणे आहेत त्याचबरोबर छोट्या शहरांना पाणी पुरवठा करणारी छोटी
धरणेसुद्धा मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याला पाहायला मिळतात.
प्रकल्प निरीक्षणे
· पाणी जतन करण्याच्या / साठविण्याच्या पद्धती
(हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल tilt आडवा करा.)
अ.क्र. |
राज्य |
जल संवर्धन करण्याच्या पारंपारिक पद्धती |
वर्णन |
१ |
राज्यस्थान |
जोहाड |
मातीचे बंधारे |
२ |
राज्यस्थान |
कुंड |
जमिनीखालील तलाव |
३ |
गुजरात |
खादिन |
वाहते पाणी अडवणारा मातीचा बांध |
४ |
आंध्र प्रदेश |
चेरुवा |
जलसाठा |
५ |
आसाम |
डोंग |
आदिवासींची तळी |
६ |
कर्नाटक |
केरे |
पाझर तलाव |
७ |
पश्चिम बंगाल |
बिल, रवाल |
तळी |
८ |
महाराष्ट्र |
कुंड |
तलाव |
· स्वयंपाकघरातील पाणी वाचवण्यासाठी सोप्या पद्धती
ü भाज्या स्वच्छ करण्यासाठी वाहणारे पाणी वापरणे टाळा. भाज्या एका भांड्यात काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर धुवा.
ü डिशवॉशर खरेदी करताना, 'लाइट-वॉश' पर्यायासह एक निवडा.
ü जर तुम्हाला काही भांडी हाताने धुवायची असतील, तर तुम्ही धुत नसताना पाणी बंद करा.
ü RO वॉटर प्युरिफायरमधील सांडपाणी कार धुण्यासाठी किंवा तुमच्या झाडांना पाणी देण्यासाठी पुन्हा वापरा. तुम्ही हे पाणी मॉपिंगसाठी किंवा प्री-रिन्स लॉन्ड्रीसाठी देखील वापरू शकता.
ü पाण्याच्या बाटल्यांमध्ये उरलेले पाणी काढून टाकू नका. हे झाडांना पाणी देण्यासाठी किंवा पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे भरण्यासाठी वापरले जाऊ शकते.
प्रकल्प निष्कर्ष
· पाण्याचे जतन करण्यासाठी खालील गोष्टी करा.
· पाणी जतन करण्यासाठी खालील गोष्टी करू नका.
१)स्नान
करत असताना, दात घासताना तसेच भांडी धुताना पाण्याचा नळ सुरु ठेवू नका.
२)
बाग किंवा व्हरांडा पाईप सुरु ठेवून धुवू नका.
३)
कपडे आणि भांडी शुद्ध पाण्याच्या स्त्रोतात धुवू नका.
४)
फुले, मिठाई, पूजा साहित्य इत्यादी नदीत टाकू नका . कारण त्यामुळे पाण्याची
गुणवत्ता कमी होते.
५)
रासायनिक कीटक नाशकांचा वापर टाळा.
संदर्भ
ü Environmental study book
PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील DOWNLOAD BUTTON वर क्लिक करा.
PDF PASSWORD DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.
नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.
Evs project topics
Evs project in Marathi
Evs project topics for 12th std
Evs project for class 12
Evs project pdf
Evs project for class 12 maharashtra board
पर्यावरण प्रकल्प pdf
पर्यावरण प्रकल्प pdf १२ वी
पर्यावरण प्रकल्प १२वी विषय pdf २०२२
Environmental project in Marathi project for college students
Evs project topivs Marathi languages
Evs project prastavana in Marathi
Evs project 12th commers, science, format Marathi
पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf
पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा १२th pdf
पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प विषय माहिती मराठी