शेतकऱ्यांचे मित्र मानले जाणारे पशु, पक्षी, कीटक, प्राणी इ. ची माहिती व त्यांच्या संवर्धनाचे महत्व प्रकल्प
Environmental project in Marathi project for college students - Evs project topics Marathi languages
प्रकल्प प्रस्तावना, प्रकल्प उद्दिष्टे, प्रकल्प विषयाची निवड, प्रकल्प अभ्यासपद्धती कार्यपद्धती, प्रकल्प निरीक्षणे, प्रकल्प निष्कर्ष , कसे लिहावेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
येथे क्लिक करा.
शेतकऱ्यांचे मित्र मानले जाणारे पशु, पक्षी, कीटक, प्राणी इ. ची माहिती व त्यांच्या संवर्धनाचे महत्व प्रकल्प
प्रकल्प प्रस्तावना/ प्रकल्प विषय निवड
शेतकऱ्याचे अनेक मित्र आहेत. त्यापैकी अनेक जणांची नावेही आपल्याला माहिती आहेत. शेतकऱ्याच्या मित्रांमध्ये गाय, म्हैस, रेडा, साप, फुलपाखरे, मधमाश्या, विविध प्रकारचे कीटक, शेळ्या, गांडूळ असे अनेक प्रकारचे प्राणी शेतकऱ्याचे मित्र आहेत. सर्वाचा असा गैरसमज आहे कि सर्वच पक्षी हे शेतीची नासधूस करतात परंतु काही पक्षी हे शेतातील धान्य खात नाहीत तर शेतातील पिके काढून झाल्यावर शेतामध्ये पडलेले दाणे टिपतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम काही पक्षी करीत असतात.
या प्रकल्पाच्या माध्यामतून शेतकऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या त्याच्या पर्यावरणातील मित्रांबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या प्रकल्पामध्ये शेकऱ्याला शेतीसाठी उपयुक्त ठरणारे प्राणी त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहे? हे प्राणी, कीटक कोठे आढळतात व शेतीसाठी शेतकऱ्याला कशा प्रकारे उपयुक्त ठरतात याबाबत सविस्तर माहिती या प्रकल्पाद्वारे देण्याचा प्रयत्न मी केला आहे.
हे सुद्धा पहा: परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची माहिती पर्यावरण प्रकल्प
अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
१) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
२) |
विषयाचे महत्व |
३) |
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती |
४) |
निरीक्षणे |
६) |
विश्लेषण |
८) |
निष्कर्ष |
९) |
संदर्भ |
हा प्रकल्प सुद्धा पहा: जंगलतोड प्रकल्प / वनांचा ऱ्हास पर्यावरण प्रकल्प | jangaltod paryavarn prakalp
प्रकल्प उद्दिष्टे
- शेतकऱ्याला शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्राणी, पक्षी आणि कीटकांच्या प्रजातींचा शोध घेणे. शेतकऱ्याला शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्यावरणातील मित्रांबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे.
- शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कीटकांचे महत्व जाणून घेणे.
- हे प्राणी, पक्षी, कीटक शेतकऱ्याला कशा प्रकारे उपयुक्त ठरतात त्यांच्यामुळे कोण कोणते फायदे होतात याबाबत सविस्तर माहिती मिळविणे.
- शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या शेतकऱ्याच्या पर्यावरणातील मित्रांबाबत सविस्तर अधिक माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे.
हा प्रकल्प सुद्धा पहा: परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास पर्यावरण प्रकल्प | Parisaratil jaivvividhatecha abhyas paryavarn prakalp
प्रकल्प विषयाचे महत्व
शेतीसाठी उपयुक्त ठरणारे कीटक, पक्षी, प्राणी हे
निसर्गातच उपलब्ध असतात ते पिकाला कोणतेही नुकसान पोहचवत नाही तर पिकाचे नुकसान
होण्यापासून संरक्षण करतात. पिकांवर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केल्याशिवाय
देखील पिकांवर पडलेल्या रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. परंतु शेतकऱ्यांमध्ये
असलेल्या माहितीच्या अभावामुळे आणि गैरसमजामुळे आपण शेतीवर पडलेल्या किडीवर
नियंत्रण मिळवताना रासायनिक कीटक नाशकांचा वापर केल्याने नकळत पणे शेतीसाठी
उपयुक्त ठरणारे सजीव देखील नष्ट होतात.
पिकांचे नुकसान करतात असा गैर समज होऊन अमेरिकेतील शेतकरी
लोकांनी 'कॅरोलविना पॅराकीट' या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा
वंशच संपवून टाकला. चीनमध्ये चिनी नागरिकांनी चिमण्या पिकांची नासाडी करतात म्हणून
लाखो चिमण्यांची कत्तल केली, परंतु त्याचा परिणाम शेतीवर
झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पिकाचे उत्पादनच हव्या त्या
प्रमाणात न झाल्याने अन्नधान्याच्या
तुटवड्यामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात
कराव्या लागल्या. यांसारख्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आपल्याला शेतकऱ्यासाठी
उपयुक्त ठरणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींबाबत अधिक माहिती जाणून घेणे महत्वाचे
आहे.
आज शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्राण्यांच्या काही
प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्याबाबत वेळीच माहिती घेऊन
त्यांचे संवर्धन करणे हे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्याचे मित्र कोण कोण आहेत हे
जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणून हा प्रकल्प विषय खूप महत्वाचा आहे.
PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील DOWNLOAD BUTTON वर क्लिक करा.
नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.
PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.