महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उद्यानाची माहिती मिळवून त्याला
नाव, विभाग, स्थळ, जिल्हा,
सर्वसाधारण पशु, प्राणी, फुले आणि त्यांची वैशिष्ट्ये सारणीबद्ध मांडणी करा.
पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प pdf महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने | Maharashtratil Rashtriy Udyane paryavarn jalsuraksha prakalp
Maharashtratil rashtriy udyane project | paryavarn jlsuraksha va jalsuraksha 12th project | evs project subject in Marathi | प्रकल्प कार्य व जर्नल कार्य / सेमिनार अहवाल | पर्यावरण प्रकल्प मराठी pdf
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प प्रस्तावना
आपल्या महाराष्ट्रात एकूण ५८ वन्यजीव
संरक्षित क्षेत्रे आहेत. त्यापैकी ६ राष्ट्रीय उद्याने, ५०
अभयारण्ये, ४ संवर्धन राखीव क्षेत्र अशी त्यांची विभागणी
केली आहे. ते राज्याच्या एकूण
क्षेत्रफळाच्या ३.२६ टक्के इतक्या क्षेत्रफळावर म्हणजेच १००५४.१३ चौ.कि.मी. इतक्या
क्षेत्रफळावर विस्तारलेले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील १९ संरक्षित क्षेत्रांचा समावेश केला तर (६ राष्ट्रीय
उद्याने आणि १४ अभयारण्ये) यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच
व्याघ्र प्रकल्प (नागपूर), मेळघाट व्याघ्र प्रकल्प (अमरावती),
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नवेगाव-नागझिराचा व्याघ्र प्रकल्प
(कोल्हापूर) आणि बोरचा व्याघ्र प्रकल्प इत्यादी सहा व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्र
म्हणून तयार करण्यात आले आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील पाच राष्ट्रीय उद्यानांची
सविस्तर माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प उद्दिष्टे
1. राष्ट्रीय उद्यानांची संकल्पना समजून घेणे.
2. राष्ट्रीय उद्यानांचे महत्त्व काय आहे त्याबाबत माहिती मिळविणे.
3. राष्ट्रीय उद्यानांचे कार्य जाणून घेणे.
4. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे.
5. महाराष्ट्रीय राष्ट्रीय उद्याने व प्रत्येक उद्यानाचे वैशिष्ट्य जाणून घेणे.
6. राष्ट्रीय उद्याने पर्यावरण संरक्षण व संवर्धन कार्यात कशी महत्वाची भूमिका पार पडतात. याबाबत अधिक माहिती जाणून घेणे.
7. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची माहीती लोकांना करून देणे.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प विषयाचे महत्व
निसर्गाचा समतोल राखून ठेवण्यासाठी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणातील
विविधता टिकवून ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये वन्य जीवांचे संरक्षण करणे हे
सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. गेल्या
कित्येक वर्षांपासून मानव हा वन्य जीवांच्या बरोबरीनेच या पृथ्वीतलावर
गुण्यागोविंदाने राहत आला आहे. परंतु
गेल्या काही दशकांची स्थिती पहिली तर गेल्या काही ३ ते ४ दशकांमध्ये मानवाने वन्य
जीवांच्या बेसुमार हत्या केल्या, वाढत्या शहरीकरणात, औद्योगिक करणात वन्य
जीवांच्या राहण्याच्या जागा उध्वस्त करण्यात आल्या. वाढत्या प्रदूषणामुळे
त्यांच्या वन्य जीवांच्या प्रजोत्पादन क्रियेवर प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज वन्य जीवांना या पर्यावरणात टिकून राहणे अवघड झाले आहे. या सर्वाचा परिणाम
म्हणजे आज अनेक प्राण्यांच्या जाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
अस्वल, माकड, हरीण, हत्ती, वाघ यांसारखे
प्राणी देखील जंगलातच राहतात. म्हणजेच घनदाट जंगल म्हणजे त्यांचा निवारा असतो.
जंगलातच त्यांच्या गरजा पूर्ण होत असतात. परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे आज वनांचा
ऱ्हास होत चालला आहे. परिणामी जैवविविधता
धोक्यात आली आहे. . जर वन्यजीवांची पातळी अशीच कमी होत राहिली तर येणाऱ्या काळात
फार गंभीर परिणाम घडून येऊ शकतात. म्हणूनच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व नैसर्गिक
साधनसंपत्तीचे संवर्धन होण्यासाठी राष्ट्रीय उद्याने असणे आवश्यक आहे. म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने या विषयाचा अभ्यास करणे
गरजेचे आहे.
Evs project prastavana in Marathi | Evs project 12th commers, science, format Marathi | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf | Paryavarn prakalp Marathi 12th pdf | paryavarn aani jal suraksha project | पर्यावरण प्रकल्प pdf फाईल डाउनलोड
प्रकल्प
कार्य पद्धती
‘महाराष्ट्रातील
राष्ट्रीय उद्याने’ या प्रकल्प विषयाची निवड केल्यानंतर सदर विषयाची माहिती
मिळविण्यासाठी मी राष्ट्रीय उद्यानांची माहिती असणारी पुस्तके, वर्तमान पत्रातून
आलेले पर्यावरण विषयक लेख, तसेच इंटरनेट वर उपलब्ध असेलेली माहिती. इत्यादी
माहितीच्या स्त्रोतांच्या माध्यमातून मी या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी माहिती
मिळवली. मिळवलेल्या माहितीची मुद्देसूद
मांडणी करता यावी यासाठी मुद्दे तयार करण्यात आले.
तयार
केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी
आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर
केला. त्यांच्या सहाय्याने प्रकल्पाबाबत अधिक सविस्तर माहिती मिळवणे शक्य झाले.
संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे
समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे
निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प निरीक्षणे
Ø महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
नाव |
स्थापना |
क्षेत्र चौ.कि.मी. |
चांदोली राष्ट्रीय उद्यान |
इ.स. २००४ |
३०९ |
गुगामल राष्ट्रीय उद्यान |
इ.स. १९८७ |
३६१.२८ |
नवेगाव राष्ट्रीय उद्यान |
इ.स. १९७५ |
१३३.८८ |
पेंच राष्ट्रीय उद्यान |
इ.स. १९७५ |
२५७.२६ |
संजय गांधी
राष्ट्रीय उद्यान |
इ.स. १९८३ |
८६.९६ |
ताडोबा राष्ट्रीय उद्यान |
इ.स. १९५५ |
११६.५५ |
Ø राष्ट्रीय उद्यानांत आढळणारे प्राणी, पक्षी, वनस्पती, प्रमुख वैशिष्ट्ये तक्ता.
( खालील दिलेला table पूर्ण पाहण्यासाठी मोबाईल Tilt (आडवा) करा..)
नाव |
प्राणी |
पक्षी |
वनस्पती |
प्रमुख वैशिष्ट्य |
चांदोली
राष्ट्रीय उद्यान |
वाघ,
बिबट्या, गवा , अस्वल, शेकरू |
घुबड, चंडोल,
पिंगळा,पावश्या चातक, मैना,
होले, मोर, कोकीळ,
भारद्वाज, महाधनेश, रातवा,
सुभग |
हिरडा, आपटा, अर्जुन सादडा, वारंग,
पांगारा, धायटी, फणस,
गेळा, करंज, पीसा,
चांदाडा, जांभूळ, आवळा,
वाघाटी, उंबर, हिरडा,
ऐन, बेहडा, पांगारा,
आंबा, खरसिंग, सर्पगंधा,
धायटी, आंबाडा |
चांदोली
धरणाच्या तलावात नावेतून प्रवास करून देखील हे जंगल फिरता येते. |
नवेगाव
राष्ट्रीय उद्यान |
अस्वल, तरस, वाघ, बिबट्या, सांबर, नीलगाय,
माकडे , रानगवा, रानडुक्कर,
साप. |
बदके, करकोचे , बगळे,
पाणकोंबडया, पाणकावळे, हंस, क्रौंच, करकोचे |
कलाम धावडा, बिजा, साग |
विविध प्रकारचे पक्षी |
पेंच
राष्ट्रीय उद्यान |
वाघ |
पाणकोंबड्या, |
आवळा, धौरा,
बांबू, सलाई, झुडपे. |
हिवाळ्याच्या
दिवसांमध्ये युरोपातून स्थलांतरित पक्षी येथे येतात. |
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान |
रानमांजर, मुंगुस लंगुर,
उदरमांजर , अस्वल |
किंगफिशर, फुलपाखरे , शिंजीर पक्षी, वटवाघूळ. |
साग, बाभूळ,
शिसव, निवडुंग, बांबूची
बेटे, करंज |
लायन सफारी |
ताडोबा
राष्ट्रीय उद्यान |
वाघ, रानगवे, बिबट्या, तरस , जंगली कुत्री, अस्वल, चितळ, भेकर, नीलगाय, सांबर,
कोल्हे , ससे |
गरुड, ससाणे
भृंगराज, करकोचे, मच्छिमार, घनेश, रानकोंबड्या, भारद्वाज,मोर |
साग, ऐन, बांबू,
हलई, बिबळा, धावडा,
तेंदू, खैर, मोहा |
मगर-सुसरी |
Evs project in Marathi information | Environmental project topics for college students pdf | Environmental project in | Marathi project for college students | पर्यावरण प्रकल्प मराठी
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने प्रकल्प विश्लेषण
राष्ट्रीय उद्यानांचे महत्त्व
राष्ट्रीय
उद्याने ही प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या विविध प्रजातींचे त्यांच्या निवासस्थानांचे
आणि परीसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतात. निसर्गाचा समतोल
तसेच जैविक समतोल राखण्यात राष्ट्रीय उद्याने महत्वाचे योगदान देतात. राष्ट्रीय
उद्यानांच्या माध्यमातून ज्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती लुप्त होत
चालल्या आहेत त्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन केले जाते. तसेच राष्ट्रीय
उद्यानाच्या परिसराचा विकास होण्यास देखील मदत होते. इकोटूरिझम च्या माध्यमातून
सदर परिसराचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. राष्ट्रीय उद्याने संरक्षित करून
ठेवल्यामुळे काही प्रमाणावर अस्थिर होत असलेले हवामान काही प्रमाणावर स्थिर
होण्यास मदत होते. ज्यामुळे हवामान, माती आणि संभाव्य
नैसर्गिक आपत्तींचे काही परिणाम कमी होण्यास मदत होते.
नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि संवर्धन संवर्धन करणे हे आज खूप महत्वाचे आहे. संरक्षिक नैसर्गिक उद्यानाच्या मदतीने नैसर्गिक जैवविविधतेचे संरक्षण करणे शक्य होते.
राष्ट्रीय उद्यानांचे कार्य
1. जैवविविधता आणि परिसंस्थांचे रक्षण करणे.
2. धोक्यात असलेल्या प्राणी तसेच वनस्पतींच्या अधिवासांचे रक्षण करणे.
3. संकटात सापडलेल्या वनस्पती आणि जीवजंतूंचे संरक्षण उद्यानांच्या मदतीने संरक्षण करणे.
4. जीवाश्मशास्त्रीय क्षेत्रांचे संरक्षण आणि संवर्धन
5. प्रजातींची अवैध होणारी तस्करी टाळणे.
6. नैसर्गिक स्थाने आणि त्यांच्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थानांची अखंडता आणि विशिष्टता जतन करणे.
7. पर्यटन आणि नागरिकांच्या सांस्कृतिक मनोरंजनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे.
8. पर्यावरण शिक्षणासाठी राष्ट्रीय उद्याने महत्वाची ठरतात.
हे प्रकल्प सुद्धा पहा:
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
( खाली दिलेल्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील उद्यानांच्या नावावर क्लिक करा.)
२) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
5) पंडित जवाहरलाला नेहरू राष्ट्रीय उद्यान
प्रकल्प निष्कर्ष
1. राष्ट्रीय उद्यानांची संकल्पना समजून घेतली.
2. राष्ट्रीय उद्यानांचे महत्त्व काय आहे त्याबाबत सविस्तर माहिती मिळवली.
3. राष्ट्रीय उद्यानांचे कार्य जाणून घेतले.
4. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांबाबत सविस्तर माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन केले.
5. महाराष्ट्रीय राष्ट्रीय उद्याने व प्रत्येक उद्यानाचे वैशिष्ट्य माहित करून घेतले.
6. राष्ट्रीय उद्याने पर्यावरण संरक्षण व संवर्धन कार्यात कशी महत्वाची भूमिका पार पडतात. याबाबत अधिक माहिती मिळवली.
प्रकल्प संदर्भ
1. Educationalमराठी (www.educationalmarathi.com)
2. Educationalमराठी ( You Tube )
3. माझा अभ्यास (www.mazaabhyas.com)
4. पर्यावरण पुस्तिका
आपण आजच्या लेखामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने या पर्यावरण जलसुरक्षा विषयाबद्दल खालील मुद्यांनुसार माहिती घेतली.