BUY PROJECT PDF Click Here!

ऊर्जा बचत काळाची गरज पर्यावरण प्रकल्प कार्य व जनरल कार्य | Environment project in marathi Urja bachat kalachi garjaj

project पर्यावरण प्रकल्प pdf paryavarn prakalp educational Marathiurja bachat kalachi garj project in Marathi language urja sanvardhan kalachi garaj
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

ऊर्जा बचत काळाची गरज आणि उर्जा निर्मितीचे नवनवीन मार्ग पर्यावरण प्रकल्प

Environment project pdf in Marathi | 11th class environment project in Marathi | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf | प्रकल्प कार्य व जनरल कार्य सेमिनार अहवाल कार्यपुस्तिका | project पर्यावरण प्रकल्प pdf 

educational Marathi - www.educationalmarathi.com - evs project 


Environment project pdf in Marathi 11th class environment project in Marathi 12th class environment project in marathi पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf 11th paryavaran project in Marathi language पर्यावरण प्रकल्प 11वी विषय pdf प्रकल्प कार्य व जनरल कार्य 11th प्रकल्प कार्य व जनरल कार्य सेमिनार अहवाल कार्यपुस्तिका project पर्यावरण प्रकल्प pdf paryavarn prakalp educational Marathi www.educationalmarathi.com


ऊर्जा बचत काळाची गरज प्रकल्प प्रस्तावना


उर्जेचे संवर्धन करणे म्हणजेच उर्जा वाया जाण्यापासून रोखणे. उर्जेचे संवर्धन म्हणजे संपूर्ण समाजामध्ये उर्जा वापराची कार्यक्षमता वाढवणे.उर्जा वाया न घालवता तिचा पुरेपूर वापर करणे म्हणजे उर्जा संवर्धन होय.उर्जेचा अधिक कार्यक्षमतेचे वापर करून उर्जा संवर्धन करणे शक्य होते. उर्जेचे संवर्धन केल्यामुळे उर्जा स्त्रोतांची गरज कमी होते आणि परिणामी पर्यावरणाची गुणवत्ता टिकून राहते, पर्यावरणाची हानी कमी होते.

येणाऱ्या पिढ्यांसह आपले भविष्य अधिक सुखकर होण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जा संवर्धन आवश्यक आहे. उर्जा संवर्धनाचा अर्थ पैशांची बचत असा होत नाही , परंतु पैशाच्या बचतीपेक्षा उर्जा संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे आहे; कारण आपल्या चांगल्या राहणीमानासाठी उर्जेचे आत्तापासून संवर्धन करणे आवश्यक आहे.

उर्जेचे विविध प्रकारे संवर्धन केले जाऊ शकते. आज ज्या वेगाने उर्जेचा वापर वाढत चालला आहे त्याचा विचार केला तर येणाऱ्या भविष्यात उर्जा स्त्रोतांचा तुटवडा जाणवेल यात काही शंका नाही. उर्जा संवर्धन करण्याची सुरुवात आपल्या घरापासून करता येते. घरामध्ये दिवे बंद करणे, संगणक किंवा दूरदर्शन संच चालू न ठेवता तो बंद करणे. यांसारख्या साध्या कृतींच्या माध्यमातून आपल्याला उर्जेचा वापर कमी करण्यास आणि उर्जा संवर्धन करण्यास मदत होते.

आज प्रत्येकाने उर्जा संवर्धनात आपले योगदान दिले पाहिजे. आज उर्जेचे संवर्धन केले तर येणाऱ्या काळात उर्जेचा तुटवडा आपल्याला भासणार नाही. उर्जा संवर्धन न केल्यास येणाऱ्या काळात फार मोठ्या उर्जा संकटाला सामोरे जावे लागेल.

म्हणून उर्जा संवर्धन या विषयाबाबत अधिक माहिती सर्वांना मिळावी म्हणून मी या उर्जा संवर्धन या प्रकल्प विषयाची निवड केली आहे.    


ऊर्जा बचत काळाची गरज अनुक्रमणिका

अ.क्र.

घटक

पान नं

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

२)

विषयाचे महत्व

 

३)

प्रकल्प कार्यपद्धती

 

४)

प्रकल्प निरीक्षणे

 

६)

प्रकल्प विश्लेषण

 

 

1)    उर्जेचे स्त्रोत

2)    ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व

3)    आपण कशा प्रकार उर्जा वाचवू शकतो.

4)    ऊर्जा वाचवण्याचे दुय्यम मार्ग

5)    उर्जा संवर्धनामध्ये समाजाची भूमिका

6)    उर्जा निर्मितीचे नवनवीन मार्ग

 

७)

प्रकल्प निष्कर्ष

 

८)

संदर्भ

 
















urja bachat kalachi garj project in Marathi language | urja sanvardhan kalachi garaj pakalp | Urja bachat kalachi garaj prakalp pdf

उर्जा बचत काळाची गरज प्रकल्प माहिती pdf | पर्यावरण प्रकल्प उर्जा बचत काळाची गरज | उर्जा निर्मितीचे नवनवीन मार्ग'



ऊर्जा बचत काळाची गरज प्रकल्प उद्दिष्टे


Ø उर्जा संवर्धनाचा अर्थ समजावून घेणे.

Ø उर्जा कशी वाचवायची याबाबत अधिक माहिती मिळविणे.

Ø उर्जा का वाचवायची याबाबत अधिक माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन करणे.

Ø उर्जेच्या विविध स्त्रोतांबाबत अधिक माहिती मिळविणे.

Ø आपण उर्जा कशा प्रकारे वाचवू शकतो याबाबत माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे

Ø ऊर्जा संवर्धन करण्यात समाजाची भूमिका जाणून घेणे.

Ø उर्जा संवर्धन या विषयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणे आणि त्या माहितीचे संकलन करणे.


हे प्रकल्प सुद्धा पहा: 


ऊर्जा बचत काळाची गरज प्रकल्प विषयाचे महत्व


वाढती लोकसंख्या व उर्जा स्त्रोतांचा वाढता वापर लक्षात घेता कोळसा, पेट्रोल, डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचे साठे मर्यादित असल्याने ते संपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

विजेची बचत हे एका अर्थाने विद्युत निर्मितीच आहे. गरज नसताना दिवे बंद करणे, सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे असे उर्जा बचतीचे अनेक मार्ग आहेत. उर्जा बचत करणे काळाची गरज आहे. अन्यथा जागतिक तापमानवाधीसारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागेल.

ज्या उर्जा स्त्रोतांच्या वापरामधून कार्बन, धूर व त्याची विविध घातक जसे, कार्बन डायऑक्साईड  व कार्बन मोनोऑक्साईड निर्माण होत नाहीत अशा उर्जा स्त्रोतांना हरित उर्जा स्त्रोत म्हणतात. अशा स्त्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे. तरच पर्यावरण संवर्धन पर्यायाने उर्जा संवर्धन करण्यास मदत होईल.

आज उर्जेचे संवर्धन केले तर येणाऱ्या काळात उर्जेचा तुटवडा भासणार नाही. उर्जा संवर्धन न केल्यास येणाऱ्या काळात फार मोठ्या उर्जा संकटाला सामोरे जावे लागेल.

म्हणून उर्जा संवर्धन हा प्रकल्प विषय अधिक महत्वाचा आहे.

 

 

Environment project pdf in Marathi / 11th class environment project in Marathi / 12th classenvironment project in marathi / पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf / 11th paryavaran project in Marathi language

ऊर्जा बचत काळाची गरज प्रकल्प  कार्यपद्धती / अभ्यासपद्धती

 

ऊर्जा बचत काळाची गरज आणि उर्जा निर्मितीचे नवनवीन मार्ग’ या प्रकल्प विषयाबाबत माहिती मिळविण्यासाठी मी वर्तमान पत्रे, पर्यावरण विषयक पुस्तके यांच्या माध्यमातून माहिती मिळविली. तसेच परिसरातील लोकांशी चर्चा करून गेल्या काही वर्षांत उर्जा वापरात झालेली वाढ यावर प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारून माहिती एकत्रित केली. उर्जेचे संवर्धन कशा प्रकारे आपण करू शकतो  हे जाणून घेण्यासाठी परिसरातील लोकांशी संवाद साधून या विषयाबाबत त्यांची मते जाणून घेतली. आणि उर्जेचे संवर्धन केल्यास कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात याबाबत त्यांच्याशी संवाद साधून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे मुद्दे तयार करण्यात आले.

तयार झालेल्या  मुद्द्यांबाबत अधिक सविस्तर माहिती मिळवता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. उपलब्ध माहितीचे संकलन केले .अशा प्रकारे प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.

 

ऊर्जा बचत काळाची गरज प्रकल्प निरीक्षणे


विविध स्तरांवर ऊर्जेचे संवर्धन:

 

1) घरगुती स्तरावर ऊर्जा संवर्धन

·     रेफ्रिजरेटरमध्ये संवर्धन

·     मायक्रोवेव्ह मध्ये संवर्धन

·     स्वयंपाक करताना संवर्धन

·     दिवे, पंखे आवश्यक नसल्यास बंद करणे.

·     LED सारखे ऊर्जा कार्यक्षम दिवे वापरणे.

 

२) सामुदायिक स्तरावर ऊर्जा संवर्धन

·     संगणक, मॉनिटर्स, फोटोकॉपी आणि इतर व्यवसाय उपकरणे त्यांच्या एनर्जी सेव्हिंग मोड वर वापरली पाहिजेत.

·     गोदामांसाठी स्कायलाइटचा वापर करावा.

·     कार्यालांमध्ये एअर कंडिशनर चा वापर सुरु असताना कार्यालयाच्या खिडक्या, दरवाजे व्यवस्थित बंद आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी.

 

3) अक्षय ऊर्जा संसाधनांचा वापर:

·     पर्यायी संसाधने म्हणजे; नूतनीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या जागी करावा, उदा. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा.

·     समुदाय आणि महानगरपालिकेच्या गरजांसाठी सौर उर्जा तसेच पवन ऊर्जेचा समावेश असलेले प्रकल्प असावेत.

 

ऊर्जा बचत काळाची गरज प्रकल्प विश्लेषण

 

उर्जेचे स्त्रोत

 

उर्जा मिळवण्याची साधने म्हणजेच उर्जा स्त्रोत होय. उर्जा स्त्रोतांचे दोन प्रकारांममध्ये वर्गीकरण केले जाते.


·       पारंपारिक उर्जा स्त्रोत किंवा अनवीकरणीय उर्जा स्त्रोत


शतकानुशतके मानव ज्या उर्जा स्त्रोतांचा वापर करतो आहे, त्या उर्जा स्त्रोतांना पारंपारिक उर्जा स्त्रोत असे म्हणतात.

पारंपारिक उर्जा स्त्रोतामध्ये गाई-म्हशींच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या, वनस्पतींचा पालापाचोळा तसेच लाकूड, कोळसा व अलीकडील काळातील जीवष्य इंधने जसे, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. हे उर्जा स्त्रोत आपल्याला पुन्हा पुन्हा निर्माण करता येत नाहीत. उदा. पेट्रोल, डिझेल, रॉकेल तेल.


·       अपारंपरिक उर्जा स्त्रोत किंवा नवीकरणीय उर्जा स्त्रोत


अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर पूर्वपरंपरेने करण्यात येत नव्हता. हे उर्जा स्त्रोत अक्षय व अखंड आहेत व विविद स्वरूपांत पुन्हा पुन्हा वापरले जातात.

§  अणुइंधन जसे की युरेनियम.

§  जल ऊर्जा

§  सौर ऊर्जा.

§  पवन ऊर्जा.

§  समुद्रातील ऊर्जा जसे की भरती-ओहोटी ऊर्जा, लहरी ऊर्जा.

§  हायड्रोजन ऊर्जा.


ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व

              

१)    ज्या वेगाने उर्जेचा वापर केला जात आहे. तो कमालीचा उच्च आणि अनियंत्रित झाला आहे. आजकाल , लोक ३० मिनिटे पायी किंवा १५ मिनिटे सायकलवर लागतील एवढे अंतर पार करण्यासाठी मोटारीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करताना दिसतात. आणखी एक उदाहरण म्हणजे टीव्ही कोणी पाहत नसेल तरीही तासनतास तसाच चालू ठेवला जातो.

२)   पृथ्वीवर मर्यादित संसाधने उपलब्ध आहेत. परंतु उर्जेच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत आहे. हे जर असेच चालू राहीले तर एक वेळ अशी येईल की सर्व पारंपारिक उर्जा स्त्रोत संपून जातील आणि आपल्याला पर्यायी उर्जा स्त्रोतांकडे वळावे लागेल.

३)   उर्जा वाचवल्याने पर्यावरणाचे प्रदूषण कमी होते.

४) उर्जेचे संवर्धन केल्याने उर्जा मिळविण्यासाठी लागणारा खर्च देखील कमी होतो.

५)  कमी विजेचा वापर करणे म्हणजे कमी जीवाश्म इंधने जाळणे. हे खरे आहे की आपण सौर उर्जा , पवन उर्जा यांसारख्या नूतनीकरण स्त्रोतांचा वापर करून वीज मिळवू शकतो, परंतु आज आपण वापरत असलेली बरीचशी वीज ही अजूनही तेल-खनिजे आणि कोळसा यांसारख्या स्त्रोतांपासून मिळवली जाते. जीवाश्म इंधने हे नूतनीकरणीय स्त्रोत नाहीत आणि आपण जितकी जास्त वीज वापर करू तितक्या वेगाने ही संसाधने नष्ट होतील.

६)   जेव्हा आपण उर्जा बचत करतो तेव्हा आपण देशाचा पैसा वाचवतो. आपल्या आवश्यक असणऱ्या उर्जेपैकी सुमारे ७५% उर्जा ही कच्चा तेलाच्या आयातीतून भागवली जाते. हे कच्चे तेल आयात करण्यासाठी दरवर्षी सुमारे रु.1,50,000 करोड खर्च होतो.

७) वाचवलेली उर्जा ही निर्माण होणारी उर्जा आहे. जेव्हा आपण उर्जेचे १ युनिट वाचवतो तेव्हा ते नवीन उत्पादित केलेल्या २ युनिट च्या समतुल्य असते. आपण अजूनही उर्जा निर्मिती करण्यास सक्षम नसल्याने  जी उर्जा आहे ती स्वतःच्या कल्याणासाठी बचत केली पाहिजे.

८)  उर्जेची बचत केल्यावर प्रदूषणात देखील आपोआप घट होते. उर्जा उत्पादन आणि वापर यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण तर होतेच पण त्याचबरोबर 83% पेक्षा जास्त हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते.

९)   पर्यावरणावर होणारा परिणाम : उर्जा संवर्धनाची गरज असण्यामागील प्रमुख कारण आपल्या पर्यावरणाशी संबंधित आहे. जितके जास्त जीवाश्म इंधन जाळले जाते तितकेच आपल्या पर्यावरणाला प्रदूषणाचा फटका बसतो. वापरात नसताना बल्ब बंद करणे,  ही सवय काही इंधन स्त्रोतांचा वापर कमी करण्यास मदत करते.आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पंखे, रेफ्रिजरेटर आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे काही प्रमाणावर उर्जा वाचवतात पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण करतात.

१०)   भावी पिढीवर परिणाम: जर आपण वरील सर्व मुद्दे बाजूला ठेवले तर आपण आपल्या उर्जा स्त्रोतांचा सुज्ञपणे वापर केला पाहिजे याचे सर्वात महत्त्वाचे कारण आपल्या भावी पिढ्यांशी संबंधित आहे. उर्जेचे संरक्षण करणे हे आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पिढ्यांसाठी खूप चांगले आहे. तंत्रज्ञान आणि वाढत्या लोकसंख्येमुळे ,ऊर्जेचा वापर अपरिहार्य आहे. पण उर्जेचा वापर तेवढाच व्हायला हवा जेवढा आवश्यक आहे.


पर्यावरण प्रकल्प 11वी विषय pdf | प्रकल्प कार्य व जनरल कार्य 11th | प्रकल्प कार्य व जनरल कार्य सेमिनार अहवाल कार्यपुस्तिका
project पर्यावरण प्रकल्प pdf | paryavarn prakalp | educational Marathi | www.educationalmarathi.com


आपण उर्जा कशा प्रकारे वाचवू शकतो.

 

v स्वयंपाकघरात उर्जासंवर्धन

१)   मायक्रोवेव्ह ओव्हन चा वापर :

                    मायक्रोवेव्ह ओव्हन पारंपारिक इलेक्ट्रिक/गॅस स्टोव्हपेक्षा 50% कमी ऊर्जा वापरतात. याशिवाय ऊर्जा कार्यक्षम असल्याने, मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करणे किंवा गरम करणे 45% पर्यंत स्वयंपाक करण्यासाठी लागणारा वेळ वाचू शकतो.स्वयंपाक करत असताना आवश्यकतेपेक्षा जास्त ओव्हन चा दरवाजा उघड झाप करू नका, त्यामुळे ओव्हन मधील उष्णता बाहेर टाकली जाते, परिणामी अन्न शिजण्यासाठी लागणारा कालावधी वाढतो.


२)  रेफ्रिजरेटर योग्य तापमानावर सेट करा:

                    ज्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणापासून रेफ्रिजरेटरला दूर ठेवा. थेट सूर्यप्रकाश रेफ्रिजरेटरवर पडल्याने. रेफ्रिजरेटरचे आतील तापमान वाढेल परिणामी तापमान थंड करण्यासाठी अधिक उर्जेची आवश्यकता भासेल.

                रेफ्रिजरेटरमध्ये समान ठेवल्यावर व बाहेर काढल्यावर रेफ्रिजरेटर चा दरवाजा नीट बंद झाला आहे की नाही हे तपासून पहा.


३)  रेफ्रिजरेटर योग्य तापमानावर सेट करा

                        ताज्या खाण्याच्या वस्तू ज्या भागात ठेवल्या जातात त्याचे तापमान 38 अंश फॅरेनहाइट आणि आपले फ्रीजर 0 ते 5 अंश फॅरेनहाइटवर सेट करा. तुमच्या फ्रीजरला वारंवार डीफ्रॉस्ट करा जेणेकरून त्यात दंव जमा होणार नाही. फ्रॉस्टमुळे रेफ्रिजरेटरच्या आत तापमान राखण्यासाठी ऊर्जेचा वापर वाढतो. तसेच, आपला फ्रीज नियमितपणे स्वच्छ करा. रेफ्रिजरेटरच्या मागील कॉइल व्हॅक्यूम किंवा डस्टरने स्वच्छ करा. हे केल्याने उर्जा बचत होण्यास मदत होईल.


v घराच्या उर्वरित भागात उर्जेची बचत


१)   एअर कंडिशनर्सची नियमित देखभाल करा

                    एअर फिल्टर नियमितपणे साफ करून आणि बदलून एअर कंडिशनिंग युनिट्सची कार्यक्षमता सुधारा. घाणेरडे फिल्टर हवेचा प्रवाह प्रतिबंधित करतात, ज्यामुळे उपकरण जास्त काळ चालते आणि उर्जेचा वापर वाढतो.


२)  वॉशिंग मशीन कार्यक्षमतेने वापरा

                        मशीनमध्ये अर्धा लोड असतानाही वॉशिंग सायकल पूर्ण करण्यासाठी सुमारे 80% ऊर्जा वापरली जाते. म्हणून, मशीन पूर्णपणे लोड झाल्यावरच वापरा. जोपर्यंत कपडे खूप घाण होत नाहीत तोपर्यंत कपडे गरम पाण्याऐवजी थंड किंवा कोमट पाण्यात धुवा. यामुळे ऊर्जा आणि पैसा दोन्हींची बचत होते. कपडे धुताना सर्वाधिक स्पिन स्पीड निवडा. यामुळे कपडे सुकविण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी करण्यास मदत होते. फ्रंट-लोडिंग वॉशिंग मशीन ही टॉप-लोडिंग मशीनच्या तुलनेत जास्त पाणी आणि उर्जेची बचत करते.


३)  CFL बल्ब चा वापर करा:

                    CFL बल्ब चा वापर केल्याने उर्जेच्या बिलामध्ये काही प्रमाणवर बचत होते. हे बल्ब नेहमी च्या लाईट बल्ब पेक्षा 70-90% कमी ऊर्जा वापरतात.


४) गिझर वापर आवश्यकतेनुसार करा:

                    गिझर मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर करतात.म्हणून गिझर चा वापर आवश्यक तेवढेच पाणी गरम करण्यासाठी करा.


५) स्टँड-बाय मोड वर न ठेवता बटन बंद करा:

                        तुमचा संगणक 24X7 मोड वर न ठेवता त्याऐवजी संगणक बंद किंवा स्टँड-बाय मोडमध्ये ठेवा जो कार्यरत मोडपेक्षा 70% कमी उर्जेचा वापर करतो. तुमच्या इतर इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल उपकरणांसाठीही असेच करू शकतात.


 हे प्रकल्प सुद्धा पहा: 



v घराबाहेर उर्जेचे संवर्धन असे करा:


1)          सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा:


                    सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केल्यास रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल. परिणामी कमी संख्येमुळे इंधनाची मागणी कमी होऊन, हानिकारक वायूंचे उत्सर्जन कमी होईल.


2)          योग्य वेगात वाहन चालवा :

इष्टतम वेगाने चालवा उच्च वेगाने वाहन चालवून इंधन वाया घालवू नका. असे आढळून आले आहे की, तुम्ही जितक्या वेगाने गाडी चालवता तितके पेट्रोल जास्त वापरले जाते. 55 kmph ऐवजी 65 kmph वेगाने गाडी चालवल्याने, इंधनाची आवश्यकता अधिक भासते.

 

3)          टायरमधील हवेचा दाब नियमितपणे तपासा:

इंधन आणि त्यानंतर उर्जा वाचवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे गाडीच्या टायरमधील हवेच्या दाबाचे योग्य प्रमाण कायम राखले पहिले. आवश्यक दाबापेक्षा कमी किंवा जास्त दाब टायर मध्ये असेल तर वाहनाचे मायलेज कमी होऊ शकते, ज्यामुळे इंधनाचा अपव्यय होतो, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी.

 

Urja bachat kalachi garaj prakalp pdf | उर्जा बचत काळाची गरज प्रकल्प माहिती pdf | पर्यावरण प्रकल्प उर्जा बचत काळाची गरज | उर्जा निर्मितीचे नवनवीन मार्ग

 

ऊर्जा वाचवण्याचे दुय्यम मार्ग

 

१)          झाडे लावा:

जर तुम्ही एक झाड लावले तर ते आयुष्यभर एक टन एवढा कार्बन डायऑक्साइड शोषून घेईल. झाडामुळे सावली मिळते ज्यामुळे तुमचे युटिलिटी बिल सुमारे 15% कमी होऊ शकते.

 

२)         एनर्जी स्टार उपकरणे निवडा:

नवीन उपकरणे खरेदी करत असताना, उर्जेचा वापर कमी करण्यासाठी एनर्जी स्टार लेबल असलेली, ऊर्जा बचत करणारी उपकरणे खरेदी करा. एनर्जी स्टार लेबल उपकरणांची किंमत नियमित उपकरणांपेक्षा जास्त असू शकते, परंतु त्यांचा वापर केल्याने उर्जेची बचत होऊन उर्जेच्या बिलांची रक्कम कमी होते.

 

३)         नूतनीकरण योग्य स्त्रोतांचा वापर करा:

ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी, नियमित उपकरणांद्वारे अतिरिक्त उर्जेचा वापर कमी करण्यासाठी आपल्याला पवन आणि सौर ऊर्जा यांसारख्या अक्षय स्त्रोतांच्या दिशेने वळणे गरजेचे आहे.

 

४)        कचरा पुनर्वापर

मानवी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती संसाधनांची मागणी पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक संसाधने पुरेशी आहेत की नाही याबाबत मोठी चिंता आहे. यावर उपाय म्हणून वस्तूंचा पुनर्वापर ही संकल्पना आपण अंमलात आणू शकतो. नैसर्गिक संसाधनांची मागणी कमी करण्यासाठी कागद, पुठ्ठा आणि प्लॅस्टिकसारख्या अनेक वस्तूंचा पुनर्वापर केला जाऊ शकतो.

या वरील सर्व उर्जेची बचत करण्याच्या मार्गांबरोबरच, आपण सौर उर्जेसारख्या पर्यायी स्त्रोतांचा वापर केला पाहिजे.

 

ऊर्जा संवर्धनामध्ये समाजाची भूमिका


Ø नवीन उत्पादनांमध्ये मिश्रित टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर केल्याने संभाव्य कचरा टाळता येऊ शकतो.
Ø जी इलेक्ट्रोनिक उपकरणे वापरात नाहीत ती बंद करा. केवळ बंदच नाही तर त्यांना अनप्लग करा. तुम्ही या सोप्या कृतीतून देखील विजेची बचत करू शकता.
Ø जुने लाईट बल्ब हे उर्जा बचत करणाऱ्या नवीन  फ्लूरोसंट बल्बने बदला. ज्यामुळे उर्जेची बचत होण्यास मदत होईल.

1)       घरी:

·       घरात विनाकारण दिवे चालू ठेवू नयेत.
·       स्टार रेटिंगचे विश्लेषण करून तुमची उपकरणे वापरत असलेली ऊर्जा कमी करा.

2)       सार्वजनिक ठिकाणी:
·         जेव्हा गरज नसेल तेव्हा बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशन यांसारख्या ठिकाणी पंखे आणि दिवे बंद करा.
·         आवश्यकता नसताना पथदिवे बंद करा.
·         मोठमोठे होर्डींग्स , जे संपूर्ण संध्याकाळ आणि रात्रभर चालू असतात त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणवर उर्जेचा अपव्यय होतो.


educational Marathi | www.educationalmarathi.com
 urja bachat kalachi garj project in Marathi languageurja sanvardhan kalachi garaj pakalp | Urja bachat kalachi garaj prakalp pdf 


उर्जा निर्मितीचे नवनवीन मार्ग

            या मुद्द्यामध्ये माहिती लिहिण्यासाठी खालील दिलेल्या लिंक मधील प्रकल्पामधील उर्जा स्त्रोतांबाबत माहिती लिहा. 


ऊर्जा बचत काळाची गरज प्रकल्प निष्कर्ष

 

जगण्यासाठी धावपळ चाललेल्या या युगात, उर्जा संवर्धनाची नितांत गरज आहे. जग ऊर्जा स्थिरतेकडे वाटचाल करत आहे ज्यामुळे शाश्वत विकास होतो. ऊर्जा कार्यक्षम घर हे अक्षय ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने एक वैयक्तिक पाऊल आहे.

हा प्रकल्प करून मी बऱ्याच गोष्टींचा निष्कर्ष काढू शकलो. माझे गृहीतक बरोबर होते. वापर कमी करणे आणि काही वापर कमी तासांवर बदल केल्याने फरक पडतो. जे दिवे वापरले जात नव्हते ते बंद करून आपण विजेच्या वापरत बचत केली पाहिजे. फ्लोरोसेंट बल्ब वापरून आणि उपकरणे बंद करून उर्जेची आणखी बचत करू शकतो. हा प्रकल्प करीत असताना मला खूप काही शिकायला मिळाले. उर्जा संवर्धनाचा अर्थ, उर्जा कशी वाचवायची आणि उर्जा का वाचवायची याबाबत अधिक माहिती मला मिळाली.

दैनंदिन जीवनात, उर्जा संवर्धनाची मोठी भूमिका आहे. उर्जा संवर्धन केल्याने पर्यावरणीय प्रदूषणात घट होऊ शकते. त्यामुळे चांगले वातावरणही निर्माण होते. जीवाश्म इंधने मर्यादित असल्यामुळे भावीपिढीसाठी त्यांचे जतन करणे यामध्ये उर्जा संवर्धनाचा मोठा वाटा आहे.

उर्जा संवार्धानामुळे अनेक उर्जा प्रकल्प आणि इंधन आयातीची गरज कमी होऊ शकते. यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि पर्यावरणीय प्रदूषण देखील कमी होऊ शकते. जेव्हा आपण उर्जेची बचत करतो तेव्हा आपण आपले पैसेही वाचवत असतो. उर्जा बचत केल्याने कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायुंसारख्या जीवाश्म इंधनाची मागणी कमी होते.

भारतामध्ये उर्जेचा पुरवठा कमी आहे आणि विशेषतः उद्योगांसाठी उर्जा ही महाग आहे. उर्जा स्त्रोतांचे व्यवस्थापन हा उर्जा प्रणालीचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवायची असेल तर उर्जेचे संवर्धन वेगवेगळ्यापातळ्यांवर करणे आवश्यक आहे. उर्जा संवर्धन करण्यासाठी सामान्य जनतेला उर्जा संवर्धनाचे शिक्षण देणे अधिक महत्वाचे आहे.

अशा प्रकारे, आपण घरात, शाळेत, कामावर आणि शेजारी कुठेहि असलो तरीही उर्जेची बचत करायला आपण सुरुवात केली पाहिजे. अशा प्रकारे, पृथ्वी ही एक अशी जागा आहे जी आपल्या भावी पिढीसाठी एक सोयीस्कर आणि टिकावू राहील.

म्हणून, आपण असे म्हणू शकतो की उर्जा संवर्धन केल्यामुळे उर्जेच्या पूर्ततेच्या शक्यता सुधारू शकतात.


ऊर्जा बचत काळाची गरज प्रकल्प संदर्भ


Ø www.educationalmarathi.com

Ø Educationalमराठी (You Tube)

Ø www.mazaabhyas.com

Ø पर्यावरण पुस्तिका 


                                ************

Environment project pdf in Marathi | 11th class environment project in Marathi | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf | प्रकल्प कार्य व जनरल कार्य सेमिनार अहवाल कार्यपुस्तिका | project पर्यावरण प्रकल्प pdf  educational Marathi - www.educationalmarathi.com - evs project

Environment project pdf in Marathi | 11th class environment project in Marathi | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf | प्रकल्प कार्य व जनरल कार्य सेमिनार अहवाल कार्यपुस्तिका | project पर्यावरण प्रकल्प pdf  educational Marathi - www.educationalmarathi.com - evs project

Environment project pdf in Marathi | 11th class environment project in Marathi | पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प pdf | प्रकल्प कार्य व जनरल कार्य सेमिनार अहवाल कार्यपुस्तिका | project पर्यावरण प्रकल्प pdf  educational Marathi - www.educationalmarathi.com - evs project

 



हे सुद्धा पहा:



PDF PASSWAD मिळविण्यासाठी खालील Subscribe To Unlock लिंक वर क्लिक करा. Subscribe करा आणि Back Button press करा.

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

ऊर्जा बचत काळाची गरज पर्यावरण प्रकल्प.pdf प्रकल्प 2.5 MB .pdf

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.