Paryatan aani Paryavarn Prakalp PDF | पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी
Evs project class 11 and 12 | Evs project topic | Paryatn project pdf | evs project for college in Marathi pdf
1} प्रकल्प प्रस्तावना
मानव
हा असा प्राणी आहे की ज्याला जन्मापासूनच फिरण्याची खूप आवड असते. विविध ठिकाणांना
भेटी देणे आणि सतत प्रवास करण्याची त्याला आवड असते. निसर्गानेही माणसाला वेळोवेळी
स्वतःकडे आकर्षित केले आहे आणि त्याला भटकंती करण्यास परावृत्त केले आहे. आपले
जीवन सुखी आणि समृद्ध करण्याच्या उद्देशाने मानव हा प्रवास करत असतो. मानवाच्या या प्रवास करण्याच्या आवडीतूनच नवीन
उद्योग उदयास आला तो म्हणजे पर्यटन. पर्यटन उद्योग शेती व्यवसायाच्या मागोमाग भारतातील
प्रमुख व्यवसाय म्हणून झपाट्याने उदयास येत आहे.
पर्यटन व्यवसायाशी, लोकांना पर्यटन स्थळांकडे आकर्षित करणे, त्यांना पर्यटन
स्थळापर्यंत पोहचवणे, पर्यटकांची निवास व्यवस्था, मनोरंजन, जेवणाची व्यवस्था यांसारख्या
सेवा निगडीत आहेत.
आज झपाट्याने वाढत चाललेल्या पर्यटनामुळे
मानवाला विकासाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत यात काही शंकाच नाही; परंतु याचबरोबर
समस्याही निर्माण झाल्या आहेत. ज्या ठिकाणी पर्यटकांची संख्या जास्त असते अशा
ठिकाणी मग तो अविकसित देश असो वा विकसित देश असो या दोन्ही देशांमध्ये समस्या
उद्भवू लागल्या आहेत. योग्य नियोजन न झाल्यामुळे पर्यटनस्थळांची आकर्षणे लोप
पावतील आणि काही काळानंतर त्या पर्यटन स्थळांचे आकर्षण कमी झाल्याने पर्यटक दुसऱ्या
पर्यटन स्थळाकडे आकर्षित होतील. ही बाब आत्ता सर्वांच्या लक्षात येऊ लागली आहे.
पर्यटन विकासाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय समस्या उभ्या राहू नयेत याची
काळजी घेणे आवश्यक आहे.
पर्यटन हा प्रदूषणविरहीत उद्योग मानला
गेला असला तरीही, आज आधुनिक पर्यटणामुळे इतर उद्योगांप्रमाणे अनेक प्रकारच्या
समस्या मानवासमोर उभ्या ठाकल्या आहेत.
यामध्ये जलप्रदूषण, वायूप्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यांसारख्या प्रदूषण
समस्यांची निर्मिती होते. रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक जल वाहतूक, लोहमार्ग वाहतूक या
दळणवळणाच्या साधनांमुळे जागतिक प्रदूषणामध्ये सातत्याने भर पडत राहते.
ज्या निसर्गाच्या सानिध्यात आपण राहतो,
त्या निसर्गाकडून आपण आपल्या जगण्यासाठी आवश्यक्त त्या गोष्टी भरभरून घेतो . कधी
विकासाच्या तर कधी सुधारणा करण्याच्या नावाखाली आपल्याकडून पर्यावरणाच्या ऱ्हास
होतो.
या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण पर्यटन आणि
त्याचे पर्यावरणावर होणारे चांगले तसेच वाईट परिणाम यांची माहिती घेणार आहोत.
2} प्रकल्प अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
पान नं. |
१) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
|
२) |
विषयाचे महत्व |
|
३) |
प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती |
|
४) |
निरीक्षणे |
|
५) |
निष्कर्ष |
|
६) |
संदर्भ |
|
3} प्रकल्प विषयाचे महत्व
पर्यटन उद्योग हा अतिशय वेगाने विकसित होणारा जागतिक स्तरावरील अत्यंत महत्वाचा उद्योग आहे. विकसनशील देशांना परकीय चलन मिळवून देण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी पर्यटन उद्योग हा अत्यंत महत्वाचा उद्योग मनाला जातो. पर्यटन व्यवसायाने लाखो लोकांना रोजगार आणि नोकऱ्या उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे, म्हणून सामाजिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये पर्यटन उद्योगाचे मोलाचे योगदान आहे. नोकरी आणि रोजगार उपलब्ध उपलब्ध झाल्यामुळे विकास साधता येतो. जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये पर्यटनामुळे सामंजस्याचे वातावरण निर्माण होते.
पर्यटनात टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी
निसर्गाचे शोषण केले जाते. सुरुंगाच्या मदतीने मोठ मोठे डोंगर फोडले जातात, विविध सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या
प्रमाणावर जंगलाची तोड केली जाते. निसर्ग आहोत म्हणून आज आपण आहोत आणि निसर्गामुळेच पर्यटन आहे हे भान
सर्वांनी फिरायला जात असताना कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एखादी ठिकाणी भ्रमंती
करीत असताना तेथील निसर्गाबद्दल तसेच तेथील स्थानिक लोकांबद्दल आदरची भावना आपल्या
मनात असली पाहिजे. पर्यटन करीत असताना आपण जर बेफिकीरपणे, उद्दामपणे वागलो,
निसर्गाच्या विरुद्ध जाऊन कोणती गोष्ट केली तर आपल्या त्या कृतीच्या वाईट
परिणामांचा आपल्याला आपल्या भविष्यात तसेच आपल्या भावी पिढीला सामना करावा लागेल.
पर्यटनामुळे फक्त आर्थिक विकास होत नाही
तर त्यातून साधनसंपत्तीचा वापर , परदेशी चलनाची प्राप्ती, राष्ट्रीय एकात्मतेत
वाढ, पर्यटन स्थळांचा विकास, स्थानिक लोकांना रोजगार अशा अनेक गोष्टी साध्य होतात.
पर्यटन हे क्षेत्र अनेक क्षेत्रांवर परिणाम करते. प्रामुख्याने आर्थिक , सामाजिक
सांस्कृतिक आणि पर्यावरण या घटकांवर पर्यटन परिणाम करते. या घटकांवर होणारे हे
परिणाम अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात.
म्हणून, पर्यटन व पर्यावरण हा प्रकल्प
अतिशय महत्वाचा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या विषयाबद्दल सविस्तर माहिती
घेणार आहोत.
4} प्रकल्पाची उद्दिष्ट्ये
- पर्यटन संकल्पना जाणून घेणे.
- भारतातील पर्यटन विकासाबाबत माहिती मिळविणे.
- पर्यटनामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत माहिती मिळवणे.
- पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.
- पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे.
5} प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यास पद्धती
‘पर्यटन
आणि पर्यावरण’ हा प्रकल्प करीत असताना प्रकाशित व अप्रकाशित
झालेले लेख, संदर्भग्रंथ, साप्ताहिके, मासिके, वर्तमानपत्रे तसेच अंतरजालावर
उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करण्यात आला आहे. प्रकल्पाची माहिती संकलित करण्याच्या सुरुवातील पर्यटन
आणि पर्यावरण या विषयाबाबत महत्वाचे मुद्दे एकत्र केले आणि तयार झालेल्या
मुद्द्यांची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. या प्रकल्पाची माहिती मिविण्यासाठी मी
पुस्तके, तसेच इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे या प्रकल्पाची माहिती
मिळवून त्या माहितीचे संकलन केले. मिळवलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी करता यावी
यासाठी मुद्दे तयार करण्यात आले.
तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.
पर्यटन प्रकल्प प्रस्तावना मराठी | पर्यटन प्रकल्प विषयाचे महत्व
पर्यटन प्रकल्प निरीक्षण मराठी pdf | पर्यटन पर्यावरण प्रकल्प
6 } प्रकल्प निरीक्षणे
भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या (१९९७-२०१८)
वर्ष |
आवक (लाखांमध्ये ) |
%झालेला बदल |
1997 |
२.३७ |
३.८ |
1998 |
२.३६ |
−०.७ |
1999 |
२.४८ |
५.२ |
2000 |
२.६५ |
६.७ |
2001 |
२.५४ |
−४.२ |
2002 |
२.३८ |
−६.० |
2003 |
२.७३ |
१४.३ |
2004 |
३.४६ |
२६.८ |
2005 |
३.९२ |
१३.३ |
2006 |
४.४५ |
१३.५ |
2007 |
५.०८ |
१४.३ |
वर्ष |
आवक (लाखांमध्ये ) |
%झालेला बदल |
2008 |
५.२८ |
४.० |
2009 |
५.१७ |
−२.२ |
2010 |
५.७८ |
११.८ |
2011 |
६.३१ |
९.२ |
2012 |
६.५८ |
४.३ |
2013 |
६.९७ |
५.९ |
2014 |
७.६८ |
१०.२ |
2015 |
८.०३ |
४.५ |
2016 |
८.८० |
९.७ |
2017 |
१०.०४ |
१४.२ |
2018 |
१०.५६ |
५.२ |
विविध प्रदेशांमधून परदेशी
पर्यटकांचे भारतात आगमन.
गेल्या तीन
वर्षात जगातील विविध प्रदेशातून भारतात आलेल्या पर्यटकांच्या संख्येवरून हे
स्पष्टपणे दिसून येते की विविध प्रदेशांमधून भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची
संख्या वाढतच चालली आहे.
भारतात
येणाऱ्या पर्यटकांपैकी सर्वाधिक पर्यटक हे आफ्रिकेतून येतात ( १०.४ %) . त्यानंतर मध्य
आणि दक्षिण अमेरिकेतून (९.८%) , पूर्व आशिया मधून (९.२%) तर दक्षिण पूर्व आशियातून
(७.६%), ऑस्ट्रेलिया (६.९%), उत्तर अमेरिका (५.६%), दक्षिण आशिया (५.२%) आणि पश्चिम युरोप (५.२%).
मागील तीन वर्षांतील जगाच्या विविध भागांतून भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या (२०१६-२०१८)
7} प्रकल्प विश्लेषण
पर्यटन म्हणजे काय?
निसर्गाचे
सौंदर्य त्याच्या विविधतेमध्ये आहे. विविधतेने नटलेले निसर्गसौंदर्य न्याहाळण्याची
आवड मानवाला प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून पर्यटक,
गिर्यारोहक सर्व अडचणींचा सामना करून देखील साहसी प्रवास करतात. नवनवीन ठिकाणांना भेटी देऊन तेथील निसर्गाचा आनंद
घेणे या मूळ कल्पनेतूनच कालांतराने पर्यटन नावाचा आधुनिक उद्योग उदयास आला.
सुंदर आणि लोकांना आवडतील अशी पर्यटनस्थळे विकसित करणे आणि पर्यटकांना या पर्यटनस्थळांपर्यंत पोहचवणे हे पर्यटन उद्योगाचे काम आहे.
पर्यटन आणि पर्यावरण प्रकल्प | जलसुरक्षा प्रकल्प मराठी माहिती
जलसुरक्षा कार्यपुस्तिका उपक्रम प्रकल्प नोंदवही | Evs project for college pdf
राजकीय सीमेच्या आधारावर पर्यटनाचे पुढील दोन प्रकार पडतात.
स्वदेशी पर्यटन :
देशांतर्गत केलेले पर्यटन हे स्वदेशी पर्यटन म्हणून संबोधले जाते. उदा., महाराष्ट्रातील पर्यटकांनी तमिळनाडू राज्यात कन्याकुमारी येथे पर्यटनासाठी जाणे. नागपूरच्या पर्यटकांनी औरंगाबाद येथील
वेरूळ व अजिंठ्याची लेणी
पाहण्याकरिता जाणे.
परदेशी पर्यटन :
आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन
होय. उदा., भारतातील पर्यटकांनी स्वित्झर्लंडला पर्यटनासाठी जाणे. अमेरिकेतील पर्यटकांनी भारतात
पर्यटनासाठी येणे
पर्यटनाचा हेतू आणि पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये यांच्या आधारे पर्यटनाचे अनेक प्रकार पडतात. त्यांपैकी काही प्रकार सोबतच्या छायाचित्रांच्या आधारे स्पष्ट केले आहेत.
अभयारण्य |
आरोग्यविषयक पर्यटन |
जंगलातील भटकंती |
यात्रा पर्यटन |
सामुराखालील जीवसृष्टी |
समुद्र पर्यटन |
साहसी पर्यटन |
महाराष्ट्रातील पर्यटन विकास
महाराष्ट्राला
ऐतिहासिक घटनांचा वारसा लाभला आहे, तसेच येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ
घालते. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून
महाराष्ट्राचा विचार केला असता धार्मिक महत्व, आस्था, मंदिरे, ऐतिहासिक वारसा,
सांस्कृतिक वारसा या सर्व घटकांमुळे महाराष्ट्राचे भारताच्या तसेच जगाच्या नकाशावर
आपली छाप निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील काही पर्यटनस्थळे अजूनही विकसित झालेली
नाहीत. या अविकसित असलेल्या पर्यटन स्थळांचा विकास व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले
जात आहेत. ज्या पद्धतीने पर्यटन स्थळांचा विकास व्हायला हवा होता तितक्या प्रमाणात
झाला नाही. एकूणच महाराष्ट्राची पार्श्वभूमी पहिली असता या ठिकाणी प्रयत्नाच्या
दृष्टीने खूपच संधी उपलब्ध आहेत.
इ.स. १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळाची स्थापना करण्यात आली. राज्यात ठीकठिकाणी निवासाच्या सोयी करणे, तसेच सहलीसाठी बस गाड्या
उपलब्ध करून देणे, महाराष्ट्रातील किल्ल्यांचा पर्यटनस्थळे म्हणून उपयोग करण्यास
सुरुवात करणे इत्यादी कार्ये या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आली.
पर्यटनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम
जमीन , हवा ,
पाणी, वनस्पती, प्राणी खनिजे इत्यादी गोष्टी या पर्यावरणाचे घटक आहेत. मानव हा
सुद्धा एक पर्यावरणाचा घटक आहे. पर्यटन हा मानवी व्यवसाय असल्याने या पर्यटन
व्यवसायाचा सभोवतालच्या पर्यावरणावर घातक परिणाम होतो. निसर्गाच्या सानिध्यात जर
पर्यटनस्थळे असतील तर अशा ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा
यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. पर्यटनस्थळी निसर्गरम्य वातावरण तयार
करण्यासाठी विविध प्रकारची वृक्ष लागवड करणे, बाग-बगीचा तयार करणे इत्यादी गोष्टी
केल्या जातात त्यामुळे त्या पर्यटन स्थळाचे सौंदर्य वाढण्यास तसेच पर्यावरणाचा
समतोल राखण्यास देखील मदत होते.
पर्यावरणावर पर्यटनाच्या जसे चांगले
परिणाम होतात त्याचप्रमाणे घातक परिणाम देखील होतात. एखाद्या ठिकाणी पर्यटन
ठिकाणाचा विकास करत असताना त्या ठिकाणी वृक्षतोड, मृदा प्रदूषण यांसारख्या गोष्टी घडून
येतात. याचा परिणाम तेथील पर्यावरणावर होतो. अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी
मोठ्या प्रमाणात उपहारगृहे, निवासाची सोय, वाहतुकीसाठी रस्त्यांची सुविधा इत्यादी
कामे करत असताना मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात येते यामुळे येथील पर्यावरणाचा
र्हास होत चालला आहे. एकंदरीत पहिले तर पर्यटनाचे पर्यावरणावर चांगले आणि वाईट अशा
दोन्ही प्रकारचे परिणाम होतात.
पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी पर्यटन स्थळी या गोष्टींची काळजी घ्या.
पर्यटनाला जाण्याआधी माहिती संकलित करा :
तुम्ही ज्या पर्यटन स्थळाला भेट देणार
आहात त्या पर्यटन स्थळाबद्दल तेथे जाण्यापूर्वी शक्य तितक्या गोष्टींची माहिती
घ्या जसे की, त्या परीसंस्थेमध्ये आढळणारे वन्यजीव, प्राण्यांपासून किती अंतर दूर राहावे,
तेथील पशु-पक्षांच्या अधिवसाला धोका न
पोहचवता भ्रमण कसे करावे इत्यादी गोष्टींची माहिती घ्या.
वाईट प्रथांना प्रोत्साहन देऊ नका :
पर्यटनाच्या
ठिकाणी असलेल्या वन्य प्राण्यांबरोबर फोटो काढणे किंवा त्यांची प्रतिक्रिया
पाहण्यासाठी दगडफेक करणे, तेथील स्थानिक लोकांशी अनादराचे वर्तन करणे, तेथील
प्राण्यांना खायला घालणे इत्यादी गोष्टी पर्यटनाच्या ठिकाणी टाळा.
प्लास्टिक चा वापर टाळा :
दैनंदिन जीवनात शक्य तितका प्लास्टिक चा वापर कमी केला
पाहिजे. नुकत्याच झालेल्या अभ्यासावरून
असे लक्षात आले आहे की प्लास्टिक चे सुमारे 5 ट्रिलियन तुकडे , सुमारे 269,000 वजन असलेला कचरा जगाच्या समुद्रावर तरंगत आहे. सर्वात वाईट बातमी ही की
सर्वात जास्त सागरी प्रदूषण असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचा १२वा क्रमांक
आहे. तुम्ही जेव्हा पर्यटन स्थळाला भेट देता तेव्हा
प्लास्टिक बाटली ऐवजी स्टील च्या बाटलीचा वापर करा.
पर्यटन स्थळांच्या ठिकाणी प्लास्टिक हे सर्वात मोठी समस्या आहे.
जंगलात ट्रेकवर जात असताना पायवाटेचाच वापर करा:
जंगलात
ट्रेकवर जात असताना पायवाटेचा वापर करणे हे तुमच्यासाठी आणि तेथील वन्यप्राण्यासाठी
फायदेशीर ठरते. प्राण्यांना त्रास न देता त्यांच्या अधिवासावर आक्रमण न करता
तुम्ही सहजपणे तुमचे भ्रमण पूर्ण करून परतू शकता. जंगलातील पायवाटांचा मार्ग टाळल्यास
जंगलामध्ये वाट चुकण्याचा धोका निर्माण होतो, तसेच वन्य प्राण्याच्या आक्रमणाचा
देखील धोका निर्माण होतो.
धुम्रापन
करणे टाळा :
धुम्रपान टाळणे हे तुमच्या फुफ्फुसासाठी आणि
पृथ्वीच्या फुफ्फुसांसाठी म्हणजे जंगलांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. कोरड्या
पानगळीच्या जंगलामध्ये फेकल्या गेलेल्या सिगारेट मुले जंगलांना आग लागण्याच्या
अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटनांमुळे एकाचवेळी अनेक प्रजाती नष्ट होतात. सिगारेट
चा उरलेला भाग पर्यावरणात टाकल्यास त्याचे विघटन होण्यास दोन वर्षांपेक्षा अधिक चा
कालावधी लागतो हा कचरा वन्यजीव किंवा सागरी जीव खात असतील तर तो प्राणघातक ठरू शकतो.
जंगलात नैतिक राहायला शिका :
छायाचित्रे एकत्रित करणे ही पर्यटकांची सर्वात आवडती गोष्ट आहे. वन्यजीवांचे फोटो काढत असताना ते कसे क्लिक करावेत यासाठी तज्ञ लोकांचा सल्ला घ्या.
देणगी द्या :
प्रत्येकाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या
संस्थांना आणि ज्या संस्था पर्यावरण पूरक पर्यटन होण्यासाठी कार्य करतात अशा
संस्थांना देणगीच्या माध्यमातून त्यांच्या कार्यात आपण हातभार लावू शकतो.
भारतातील पर्यटन विकासाचे महत्व
भारतातील समाजामध्ये आणि निसर्गामध्ये विविधता आढळते. या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला खूप संधी उपलब्ध आहेत. भारतातील आकर्षक भूदृश्ये, निसर्गसमृद्धता आणि रमणीय सागर किनारे पर्यटकांना आकर्षित करतात. याचबरोबर भारतातील संकृतीमध्ये असणारी विविधता, सण-समारंभ, परंपरा, पोशाख आणि भारतीय अन्नपदार्थ व भारतीयांकडून होणारे सौजन्यपूर्ण आदरातिथ्य यांमुळे पर्यटनासाठी भारतामध्ये खूप संधी आहेत.
पर्यटन व आर्थिक विकास :
पर्यटनामुळे
भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होतो. पर्यटनामुळे उपाहारगृहे, मनोरंजनाची ठिकाणे, दुकाने, वाहतूक व्यवस्थाइत्यादी
घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो. पायाभूत सुविधांचा विकास
आणि रोजगारनिर्मिती होते. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षरित्या फायदा
होतो. पर्यटन हे राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावते.
पर्यटन व पर्यावरणीय विकास :
पर्यावरणीय
विकास होण्यासाठी पर्यटन हे अत्यंत उपयुक्त ठरते. पर्यटन उद्योगाच्या गरजेतून
नैसर्गिक ठिकाणे , राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये इत्यादींचा विकास करण्यासाठी शासनाकडून
आर्थिक गुंतवणूक केली जाते. पर्यावरण पूरक पर्यटनामुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी
घेऊन पर्यटनस्थळांचा विकास केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते.
पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते. निवासस्थाने, रिसॉर्ट्स, वाहतुकीचे
मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज,
पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो.
पर्यटन व आरोग्य :
आरोग्य
सुविधा घेण्यासाठी काही पर्यटक भारतात येतात. भारतातील पर्यटन स्थळांना भेटी
देण्याबरोबरच भारतीय योगशास्त्र, आयुर्वेद, प्राणायाम यांतून मनःशांती आणि शारीरिक
सुदृढता मिळवणे हा यामागचा हेतू असतो.
भारतीय
रुग्णालयांमधील उपचार आणि शस्त्रक्रिया या तुलनेने कमी खर्चिक असल्यामुळे देखील
भारतामध्ये परदेशातून रुग्ण उपचारासाठी येतात. अशा व्यक्तींना लागणाऱ्या सेवा-सुविधांतून
वैद्यकीय पर्यटन विकसित होते.
पर्यटन आणि सामाजिक विकास :
पर्यटनाच्या माध्यमातून काही सामाजिक प्रकल्पांचा विका होऊ शकतो. ग्रामीण संस्कृती, आदिवासी संस्कृती आणि जीवन यांसारख्या घटकांचा पर्यटनामध्ये समावेश केल्यास पर्यटनाला सामाजिक दिशा मिळते व समाजामध्ये जे घटक उपेक्षित आहेत त्या घटकांचा विकास करता येतो.
8} प्रकल्प निष्कर्ष
पर्यटन
व्यवसायामध्ये पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांची निवास व्यवस्था , वाहने पार्किंग ची सुविधा इत्यादी घटकांसाठी
आजूबाजूच्या परिसरातील जंगलांची वारेमाप तोड केली जाते. ही वृक्षतोड दिवसेंदिवस
वाढतच असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
मानवाने आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि आपले जीवन अधिक सुखकर बनवण्यासाठी
वृक्षांची तोड चालूच ठेवली आहे. अशा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यावरण जतन
करण्याचे कार्य न केल्यास काळाच्या ओघामध्ये पर्यटन स्थळांचे सौंदर्य नामशेष होईल.
आजच्या
आधुनिक जगातील मानव पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष करून सुखाच्या मागे
धावत असताना भरकटलेला दिसतो. सुंदर आणि मनमोहक पर्यटन स्थळांची निर्मिती
करण्यासाठी पर्यावरणीय घटकांचे संगोपन व
जतन करणे अतिशय आवश्यक आहे.
9} प्रकल्प संदर्भ
- www.educationalmrathi.com (Educationalमराठी)
- इयत्ता ९वी पाठ्यपुस्तके महराष्ट्र राज्य