BUY PROJECT PDF Click Here!

बदलत्या हवामानाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होतो पर्यावरण प्रकल्प | Climate Change Impacts Agricultural Productivity Environment Project

हवामान बदलाचा पीक उत्पादकतेवर परिणाम बदलत्या हवामानाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होतो pdf हवामान बदलाचा शेतीवर परिणाम12 वी पर्यावरण प्रकल्प
Admin
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

Havaman Badalacha krushi utpadaktevar honara parinam prakalp | पर्यावरण प्रकल्प हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम



Evs project topics - Evs project in Marathi - Evs project topics for 12th std - Evs project for class 12 - Evs project pdf - Evs project for class 12 maharashtra board


प्रकल्प प्रस्तावना/ प्रकल्प विषय निवड


गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाची समस्या सर्व जगालाच भेडसावत आहे. बदलत चालेल्या हवामानामुळे शेतकऱ्याला शेती करणे दिवसेंदिवस कठीण  होत चालले आहे. तरीही शेती केलीच तर अचानक उद्भवणाऱ्या हवामानाच्या आपत्तीजनक घटना उदा. वादळ, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, गारपीट, अचानक येणारे पूर, दुष्काळ, थंडीची व उष्णतेची लाट यांमुळे शेतकऱ्याला शेतीमध्ये दिवसेंदिवस तोटा होऊ लागला आहे. अशा हवामनातील अनियमिततेमुळे पिकांवर कीड पडणे आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पिकांबरोबरच पशुधनावर व रेशीम शेतीवरही हवामान बदलाचा विपरीत परिणाम होत आहे. हवामान बदलाचे शेतीवर होणारे विपरीत परिणाम आणि त्याचे शेती व्यवस्थापनावर कोणते घातक परिणाम होतात. यांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. भारतासारख्या देशाची ज्याची अर्थव्यवस्था कृषी वर अवलंबून आहे अशा देशासाठी कृषी क्षेत्र सुरक्षित असणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारताने शेतीमध्ये या आधी लक्षणीय प्रगती केलेली आढळून येते. परंतु गेल्या काही वर्षांपासून भारतीय शेती ही अनेक आव्हानांना तोंड देत आहे. पठारी उत्पादनाची पातळी, मातीची गुणवत्ता ढासळणे, दरडोई जमिनीची उपलब्धता कमी होणे आणि हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम ही भारतीय शेतीपुढील प्रमुख आव्हाने आहेत. तर दुसरीकडे, मोठ्या प्रमाणवर वाढत चालेल्या लोकसंख्येमुळे कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. भारतातील लागवड केलेल्या क्षेत्रापैकी सुमारे क्षेत्रापैकी सुमारे ६० टक्के पेक्षा जास्त क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. आणि हवामानातील परिवर्तनशीलता आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या जैविक आणि अजैविक तणावांच्या संपर्कात आहे, ८०% जास्त भारतीय शेतकरी किरकोळ आणि सीमांत शेतकरी आहेत. ज्यांची हवामान बदलाशी सामना करण्याची क्षमता कमी आहे. शिवाय भारतातील शेतकरी हे विषम आणि असंघटीत आहेत. हवामानात अचानक होणारे बदल आणि परिवर्तनशीलता यांमुळे भविष्यातील अन्नसुरक्षेची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढत चालली आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून मी बदलत्या पर्जन्यमानाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होणारा परिणाम या विषयाबाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.


प्रकल्प अनुक्रमणिका


अ.क्र.

घटक

पान नं.

१)

प्रकल्पाची उद्दिष्टे

 

२)

विषयाचे महत्व

 

३)

प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती

 

४)

निरीक्षणे

 

६)

विश्लेषण

 

८)

निष्कर्ष

 

९)

संदर्भ

 












































प्रकल्प उद्दिष्ट्ये 


§  हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर झालेल्या परिणामाचा अभ्यास करणे.

§  शेतीवर क्षेत्रावर परिणाम काणाऱ्या कारणांबाबत माहिती मिळवणे.

§  हवामान बदलाचा अभ्यास करणे.

§  हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांबाबत अधिक माहिती जाणून घेणे.

§  ‘बदलत्या पर्जन्यमानाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होणारा परिणाम’ या विषयाबाबत सविस्तर माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन करणे.




प्रकल्प विषयाचे महत्व


भारतासारख्या विकसनशिल देशामध्ये हवामान बदलामुळे होणारा शेती क्षेत्रावर होणार परिणाम हा अत्यंत महत्वाचा व गंभीर विषय मानला गेला आहे. मोठ्या प्रमाणावर भारतीय शेती ही अनियंत्रीत वातावरणातच केली जाते त्यामुळे हवामान आणि भारतीय शेती यांचा जवळचा संबंध आहे. हवामान बदलाचे परिणाम शेती क्षेत्राबरोबर इतरही क्षेत्रावर दिसुन येतात. यामध्ये जमीन, पाणी, उर्जा, जंगल, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. बदलत्या हवामानामुळे कृषि उत्पादनावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. कदाचित शेती हंगामाच्या वेळा व तारखा बदलाव्या लागतील अशी परिस्थीती गेल्या काही वर्षांत निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींचा  आणि शेतक-यांचा जवळचा संबंध येतो. ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट, क्लायमेट चेंज इत्यादी शब्द सध्या वारंवार कानावर पडत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर या गोष्टींची फार गंभीरपणे दखल घेतलेली दिसुन येते. परंतु अजुन गावपातळीवर या गोष्टींचा परिणाम दिसुन यायला काही कालावधी लागेल. परंतु एकंदरीत पहाता हवामान बदलामुळे सर्वच जगभर फार मोठे संकट भविष्यात येण्याची शक्यता दिसुन येते. आणि म्हणूनच आपण ‘बदलत्या पर्जन्यमनाचा कृषी उत्पादकतेवर होणारा परिणाम’ या विषयी थोडी माहिती करून घोणे अत्यंत आवश्यक आहे.



प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यास पद्धती

‘बदलत्या पर्जन्यमानाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होणारा परिणाम’ या विषयाचा अभ्यास करता असताना मी सर्वेक्षण आणि संशोधन या कार्य पद्धतीचा उपयोग प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी केला. प्रकल्प विषयाची माहिती मिळवत असतना सदर विषयावरील प्रकल्प करणे का गरजेचे आहे ? सदर विषयाचे पर्यावरणीय तसेच सामाजिक महत्व काय आहे याबाबत माहिती जाणून घेतली . या विषयाबाबत अधिक माहिती मिळवत असताना भारतातील हवामान बदलाची पूर्वीची स्थिती काय होती , वर्तमानातील स्थिती काय आहे आणि भविष्यात कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल ? इत्यादी गोष्टींचा विचार करून प्रकल्प लेखनासाठी मुद्दे तयार करण्यात आले.

   तयार केलेल्या प्रकल्प मुद्द्यांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी मी इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर केला. इंटरनेट च्या माध्यमातून या प्रकल्पाबाबत अधिक माहिती संकलित करणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकाल्पाध्ये समाविष्ट केली.या माहितीच्या आधारावरून प्रकल्प निष्कर्ष नमूद केला.


प्रकल्प निरीक्षणे 


१} हवामान बदलासाठी जबाबदार घटक


12 वी पर्यावरण प्रकल्प  बदलत्या हवामानाचा कृषी उत्पादकतेवर होणारा परिणाम  हवामान बदलामुळे शेतीवर काय परिणाम होत आहे ते सांगा?  हवामान बदलाचा कोणता परिणाम कृषी पद्धतींमध्ये बदल घडवून आणेल?  ग्लोबल वॉर्मिंगचा हवामान बदलामध्ये कसा हातभार लागतो?

Havaman badlacha shetivar honara parinam project in marathi |  Environmental project havaman badlacha shetivar honara parinam

२}हवामान बदलाचे भारतावरील परिणाम


हवामान बदलाचे परिणाम स्पष्ट करा  हवामान बदलाचा शेतीवर परिणाम  शेतीवर हवामान बदलाचा परिणाम  Havaman badlacha shetivar honara parinam project in marathi  Environmental project havaman badlacha shetivar honara parinam


3} विविध देशांतील कार्बन उत्सर्जन (२०२३)


हवामान बदल आणि त्याचा भारतातील कृषी उत्पादकतेवर होणारा परिणाम.  हवामान बदलाचे शेतीवर होणारे परिणाम  हवामान बदलाचा पीक उत्पादकतेवर परिणाम  बदलत्या हवामानाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होतो pdf


विश्लेषण


१} हवामान बदलास कारणीभूत ठरणारे घटक


१)   जागतिक तपमान वाढ :

पृथ्वीच्या सर्वसाधारण तपमानात होणारी वाढ म्हणजेच जागतिक तापमान वाढ होय. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत जात आहे तसतशी पृथ्वीवर ओढवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये देखील वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या १०० वर्षांचा विचार केला असता पृथ्वीच्या जमिनीजवळच्या हवेचे तपमान जवळ जवळ १ अंश सेल्सीअसने वाढले आहे. हा फरक जरी आपल्याला अंकात कमी वाटत असला तरीही यामुळे भयंकर अशी वादळे, पुर, जंगलांना आपोआप आग लागणे असे प्रकार घडत आहेत.आणि अशा प्रकारच्या आपत्ती या मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात घडत आहेत असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

शास्त्रज्ञांच्या पाहणीनुसार २० उष्ण वर्षांच्या अभ्यासात १९ उष्ण वर्षे ही अलिकडे म्हणजे वर्ष १९८० पासुन आतापर्यंत नोंद झाली आहेत आणि त्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे पुन्हा त्यातील तीन उष्ण वर्षेही मागील दहावर्षात नोंदवली गेली आहेत. शास्त्रीय दृष्ट्या इथे दोन मुद्दे महत्वाचे आहेत ते म्हणजे पृथ्वीचे तपमान कितीने वाढतेय आणि किती कमी कालावधीत वाढतेय. कारण नैसर्गिकरित्या हवामानातील बदल घडून येण्यासाठी ५०,००० ते १,००,००० वर्षे लागतात.


२)  हरितगृह वायू परिणाम :

 

        आकाशातून पृथ्वीकडे पाहिले असला पृथ्वीच्या अवती-भोवती वायुचे आवरण असल्याचे दिसते. या वायुंनाच ग्रीन हाऊस गॅस (हरितगृह वायू)असे संबोधले जाते. कारण या वायुंमुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून राहीली आहे. परंतु आता यामधील काही वायुंच्या उत्सर्जनात प्रमाणापेक्षा वाढ झाल्याने हेच वायु पृथ्वीवरील हवामान बदलास कारणीभूत ठरत आहेत.

        सुर्य हा पृथ्वीच  प्राथमिक उर्जास्तोत्र आहे. पृथ्वीपासुन लाखो किलो मीटर दूर असुनही त्यापासुन कधी कधी असह्य करणारी उष्णता आपणास जाणवते. परंतु सुर्यापासुन निघणारी सर्वच उर्जा आपल्या पर्यंत पोहचत नाही तर त्यातील एक तृतीअंश उर्जा ही वातावरणात पून्हा परावर्तीत केली जाते. यामध्ये बर्फाच्या, पाण्याच्या आणि इतर चकाकणा-या पृष्ठभागामुळे ही उर्जा परावर्तीत होते. राहीलेली दोन तृतीअंश अर्जा जमीनीमध्ये शोषली जाते. यामुळे जमिन, पाणी व वातावरणाच्या तपमानात वाढ होते. शोषलेल्या उर्जेपैकी बरीच उर्जा वातावरणात पून्हा उत्सर्जित केली जाते. त्यावेळी त्यातील काही उर्जा ही वातावरणात साठविली जाते. त्यामुळे वातावरणाचे तपमान हे माणसाला किंवा सजिवसृष्टीला जगवण्या इतपत गरम राहते. यालाच ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट असे संबोधले जाते.

    हरितगृह वायू परिणामात सर्वात जास्त धोकादायक असणा-या वायुचा विचार केल्यास कार्बनडाय ऑक्साईड , मिथेन, नायट्रस ऑक्साईडन इ. वायूंचा समावेश होतो. पाण्याची वाफ, कार्बन डाय ऑक्साईड, ओझोन, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरो कार्बन हे वायु उष्णता शोषून घेतात व त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढते.

    नायट्रस ऑक्साईड हा वायुसुध्दा जागतिक तापमान वाढीला कारण उरतोय, हा वायु रासायनिक खातांच्या स्वरूपातून वातावरणात पसरतोय. या वायुच्या उत्सर्जनानेही जागतील तपमानात वाढ होतोय.

    हरितगृह वायूंचे उत्सर्जन पृथ्वीला झाकून ठेवत असल्याने ते सूर्याच्या उष्णतेला अडकवतात. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल होतात. रेकॉर्ड केलेल्या इतिहासातील कोणत्याही टप्प्यापेक्षा जग आता वेगाने गरम होत आहे. कालांतराने उष्ण तापमानामुळे हवामानाचे स्वरूप बदलत आहे आणि निसर्गाचा नेहमीचा समतोल बिघडत आहे. यामुळे मानवाला आणि पृथ्वीवरील इतर सर्व जीवसृष्टीला अनेक धोके आहेत.


३)  जंगलतोड :

पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याचे काम झाडे करतात. मोठ्या प्रमाणवर जंगलतोड केल्याने पर्यावरणातील कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण वाढून पर्यावरणाचा समतोल ढासळतो.


४)        उर्जेचा वापर :

जीवाश्म इंधने – कोळसा, तेल आणि वायू – हे जागतिक हवामान बदलामध्ये सर्वात मोठे योगदान देणारे घटक आहेत जे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या 75 टक्क्यांहून अधिक आणि सर्व कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाच्या जवळपास 90 टक्के आहेत.

 

२ } हवामान बदलाचा कृषि क्षेत्रावर होणारा परिणाम :

 

हवामान बदलामुळे निर्माण होणा-या समस्या ह्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. यामध्ये दुष्काळ, पूर, कमी कालावधीत जोराचा पाऊस, वादळे इत्यादींचा समावेश होतो; आणि यामुळे आपल्याला खालील प्रकारचे परिणाम दिसुन येतात.

अन्नधान्य उत्पादनात घट होणे.

निर्माण होणा-या उष्णतेमुळे पिक तयार होण्याच्या कालावधीमध्ये बदल.

कृषि उत्पादनांची प्रत खालावणार.

जमिनीची धूप.

जमिनीचा पोत आणि सुपिकतेवर विपरीत परिणाम.

पिकांवर किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढणार.

पाळीव जनावरांच्या संगोपनात बदल करणे गरजेचे ठरेल.

कदाचित भविष्यात पिकांच्या हंगामांच्या तारखा बदलाव्या लागतील.


                    शास्त्रज्ञांच्या मते लहान ते मध्यम शेतक-यांना हवामान बदलाचा  फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे. मोठ्या प्रमाणावर शेती ही निसर्गावर अवलंबून आहे . आणि त्यामुळे त्यामध्ये हवामान बदलातील परिणाम हा तीव्रतेने जाणवनार आहे. कारण भारतीय शेती ही पावसावर जवळ जवळ ८० मिलियन हेक्टरी शेती ही जिरायत आहे. मुळातच जिरायत शेतीमध्ये दर दहा वर्षातील दुष्काळात ३ ते ४ मध्यम तर १ वर्षे तीव्र दुष्काळ दिसुन येतो. अशा जिरायत शेतीमध्ये ८५ टक्के तृणधान्य, कडधान्य व ७५ टक्के तेलबिया पिके घेतली जातात, आणि त्यामुळे हवामान बदलाची झळ अशाप्रकारे सर्वसामान्य शेतक-यांना जास्त बसु शकते.


हवामान बदलाचे परिणाम स्पष्ट करा | हवामान बदलाचा शेतीवर परिणाम | शेतीवर हवामान बदलाचा परिणाम


३} हवामान बदलाचे भारतावरील परिणाम

 

} अत्यंत उष्णता

आपल्याला माहित आहे :

§  भारतात आधीच तापमानवाढीचे वातावरण आहे.

काय होऊ शकते ?

§  उष्णतेच्या लाटा वारंवार येण्याची शक्यता आहे, आणि या लाटा मोठ्या प्रमाणावर क्षेत्र व्यापतात.

काय करता येईल ?

§  झपाट्याने वाढत जाणारी शहरे ही ‘उष्णतेची बेटे’ बनत चालली आहेत. शहरांचे नियोजन करणाऱ्या संस्थांना उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

 

२)पर्जन्यमानातातील बदल.

आपल्याला माहित आहे :

§  1950 पासून मान्सूनच्या पावसात घट झालेली दिसून आली आहे. तसेच मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.

काय होऊ शकते ?

§  जगाच्या सरासरी तापमानात जरी २ अंश सेल्सिअसची वाढ झाली तरी भारतात उन्हाळा वाढेल आणि मान्सूनच्या पावसाबाबत अशास्वतता निर्माण होईल.

काय करता येईल ?

§  हवामान अंदाजासाठी जल-हवामान प्रणालीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

§  पूर चेतावणी प्रणाली बसवल्याने हवामानाशी संबंधित आणि धोक्याची माहिती आपत्ती येण्यापूर्वी लोकांना समजेल. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करता येईल.

 

३)   दुष्काळ

आपल्याला माहित आहे :

§  दुष्काळाचे मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेले पाहायला मिळतात. 1987 आणि 2002-2003 मध्ये, दुष्काळामुळे भारतातील अर्ध्याहून अधिक पीक क्षेत्रावर परिणाम झाला आणि त्यामुळे पीक उत्पादनात मोठी घट झाली.

काय होऊ शकते ?

§  काही भागात, विशेषत: उत्तर-पश्चिम भारत, झारखंड, ओरिसा आणि छत्तीसगडमध्ये दुष्काळ अधिक वारंवार येण्याची शक्यता आहे.

§  2040 च्या दशकात अति उष्णतेमुळे पीक उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.

काय करता येईल  ?

§  दुष्काळ-प्रतिरोधक पिकांच्या विकासासाठी R&D मध्ये केलेली गुंतवणूक काही प्रमाणावर दुष्काळामुळे होणारे नकारात्मक परिणाम कमी करण्यास मदत करू शकते.

४) भूजल 


§  भारतातील 60% पेक्षा जास्त शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

§  भारतातील जास्त प्रमाणावर शेती ही भू-जलावर अवलंबून आहे.

काय होऊ शकते ?

§  वाढती लोकसंख्या, अधिक संपन्न जीवनशैली, तसेच सेवा क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील पाण्याची वाढती मागणी यामुळे पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे.

काय करता येईल ?

§  भूजल स्त्रोतांच्या कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

 

५)   ग्लेशियर वितळणे

 

आपल्याला माहित आहे :

§  हिमालयातील हिमनद्या - जेथे आर्द्रतेचा बराचसा भाग उन्हाळ्यात पावसाळ्याद्वारे पुरविला जातो – या नद्या गेल्या शतकापासून मागे हटताना दिसत आहेत.

काय होऊ शकते ?

§  2.5°C तापमानवाढ, हिमनद्या वितळणे आणि हिमालयावरील बर्फाचे आवरण नष्ट होणे यामुळे उत्तर भारतातील मुख्यतः हिमनद्यांनी भरलेल्या नद्यांची, विशेषतः सिंधू आणि ब्रह्मपुत्रा यांची स्थिरता धोक्यात येण्याची शक्यता आहे.

काय करता येईल ?

§  वसंत ऋतूमध्ये वाढलेल्या नदी प्रवाहाचा फायदा होण्यासाठी आणि नंतरच्या काळात पाणी उपलब्ध होण्यासाठी पाण्याच्या साठवण क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणवर गुंतवणूक करणे आवश्यक आहे.


६)   समुद्र पातळी वाढणे


आपल्याला माहित आहे:

§  मुंबईची जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेली किनारपट्टी ही पुराच्या संपर्कात आहे , ज्यात शहराचा मोठा भाग ज्या जमिनीवर बांधला गेला आहे तो उच्च ओहोटीच्या चीन्हाखाली आहे.

§  जलद आणि अनियोजित शहरीकरणामुळे धोके आणखी वाढतात.

काय होऊ शकते ?

§  समुद्राच्या पातळीत वाढ आणि वादळामुळे किनारी भागात खारे पाणी घुसेल, शेतीवर परिणाम होईल, भूगर्भातील पाण्याची गुणवत्ता खालावेल, पिण्याचे पाणी दूषित होईल.

काय करता येईल ?

§  बिल्डिंग कोडची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि शहरी नियोजनाला हवामान-संबंधित आपत्तींसाठी तयार करणे आवश्यक आहे.


हवामान बदलामुळे शेतीवर काय परिणाम होत आहे ते सांगा?


७)   कृषी आणि अन्न सुरक्षा


आपल्याला माहित आहे:

§  वाढत्या तापमान आणि शेतीच्या हंगामाच्या शेवटी कमी पाऊस यांमुळे भारतातील तांदूळ उत्पादनात लक्षणीय नुकसान झाले आहे.

§  हवामान बदल झाला नसता तर सरासरी तांदूळ उत्पादन हे जवळपास ६ टक्क्यांपेक्षा जास्त असते.

काय होऊ शकते ?

§  हंगामी पाण्याची टंचाई, वाढते तापमान आणि समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी यामुळे पीक उत्पादन धोक्यात येवून देशाचा अन्नधान्य पुरवठा धोक्यात येण्याची शक्यता आहे.

काय करता येईल ?

§  पिकांमधील विविधिकरण आणि माती व्यवस्थापन पद्धतीतील सुधारणा करणे याचबरोबर दुष्काळ-प्रतिरोधक पिकांच्या वाणांचा विकास करणे.


८)   ऊर्जा सुरक्षा

आपल्याला माहित आहे:

§  बदलत्या हवामानाचा पाण्याच्या पातळीवर परिणाम झाला तर भारतातील वीज निर्मितीच्या जलविद्युत आणि थर्मल पॉवर या वीज निर्मितीच्या दोन प्रमुखप्रकारांची क्षमता खालावू शकते.

§  दोन्ही ही वीजनिर्मिती प्रकार हे पुरेशा पाणीपुरवठ्यावर अवलंबून असतात

काय होऊ शकते ?

§  नदीचा प्रवाह कमी झाल्याने जलविद्युत प्रकल्पांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल.

काय करता येईल ?

§  हवामानातील धोके लक्षात घेऊन प्रकल्पांचे नियोजन करणे गरजेचे आहे.

 

९ ) पाणी सुरक्षा


आपल्याला माहित आहे:

§  भारतातील अनेक भाग आधीच पाण्याच्या टंचाईचा सामना करीत आहे.

काय होऊ शकते ?

§  मान्सूनच्या पावसाच्या अनियमितेत वाढ झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात पाणी टंचाई वाढण्याची अपेक्षा आहे.

काय करता येईल ?

§  सिंचन प्रणाली, पाणी साठवण्याचे तंत्र आणि अधिक कार्यक्षम कृषी पाणी व्यवस्थापन यातील सुधारणा यापैकी काही धोके कमी करू शकतात.


हवामानबदलाचे परिणाम थांबविण्यासाठी आपण काय करु शकतो
हवामान बदलाशी कसे जुळवून घ्यावे?


३ } हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठीचे प्रयत्न :

 

हवामान बदलामुळे निर्माण होणा-या परिणामांचा तसेच होणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेण सुध्दा कठीण आहे. कारण यातील वातावरणाचा प्रत्येक घटक व त्यातील बदलामुळे होणा-या एकत्रित परिणामांचा अभ्यास करणे ही खूप गुंतागुंतीची बाब आहे. भविष्यामध्ये शास्त्रज्ञाकडून थंड हवामानात येणा-या पिकांना उष्ण हवामानात किंवा बदलत्या हवामान चांगल्या प्रकार उत्पादन देणा- या जातींचा शोध घेणे आवश्यक आहे. पुर, वादळ आणि वा-यातूनही चांगले उत्पन्न देणा-या फळांच्या जाती विकसित करणे हे आव्हान शास्त्रज्ञांना पेलावे लागणार आहे. जनावरांच्या बाबतीत ही त्यांच्या खाद्यामध्ये बदल घडवून आणावे लागतील की ज्यामध्ये वातावरण बदलामुळे त्यांच्या वयात येणाच्या, दुध देण्याच्या कालावधीत कोणताही फरक होऊ नये किंवा पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन देणा-या संकरांची निर्मिती करणे आवश्यक राहील.

 हवामानबदलाचे परिणाम थांबविण्यासाठी आपण काय करु शकतो?

हवामान बदलाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील उपाय योजना करता येतील.

 

§  मोठ्या प्रमाणवर वृक्ष लागवडीला प्राधान्य देणे.

§  वस्तुंचा पुर्नवापर करण्याचे करण्याबाबत जनजागृती करणे.

§  पावसाच्या पाण्याचे रेनवाटर हार्वेस्टिंगद्वारे योग्य ते नियोजन करणे.

§  वाहनांचा वापर कमीत कमी कसा होईल याचे नियोजन, यासाठी सायकलीवरून रॅलींचे आयोजन करणे.

§  वातानुकुलित सेवांचा वापर शक्यतो कमी वापरणे.

§  शाळांतुन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून पर्यावरणा विषयी जागृती करणे.

§  पर्यावरण विषयी जागृती करण्यासाठी पोस्टर्स, लिफलेट्स, चार्टस् यांचा वापर करून जनजागृती करणे.

§  शेतक-यांमध्ये मृदा व जलसंधारणा विषयी अधिक जागृती करणे.

§  प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा वापर टाळणे त्या एवजी कापडी पिशवीला प्राधान्य देणे.

 

हवामानातील बदलामुळे होणा-या परिणामांच्या अनुभव आपण सध्या घेतोय आणि भविष्याचा विचार केला तर भावी पिढीचे जीवन सुखकर होण्यासाठी आपण आत्तापासूनच सकारात्मक प्रयत्न प्रयत्न केले पाहीजेत तर आणि तरच पुढच्या पिढीला हवामानातील हा बदल सुसह्य होईल अन्यथा येणाऱ्या भावी पिढीला मोठ्या प्रमाणावर याचे परिणाम भोगावे लागतील.


प्रकल्प निष्कर्ष

1.   हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर झालेल्या परिणामाचा अभ्यास केला.

2.   शेतीवर क्षेत्रावर परिणाम काणाऱ्या कारणांबाबत माहिती अधिक माहिती मिळवली.

3.   हवामान बदलाचा सविस्तर अभ्यास करणे शक्य झाले.

4.   हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

5.   ‘बदलत्या पर्जन्यमानाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होणारा परिणाम’ या विषयाबाबत सविस्तर माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन केले.


प्रकल्प संदर्भ

 

Ø Educationalमराठी {https://www.educationalmrathi.com}

Ø ‘‘हवामान बदलाचे भारतीय शेतीवर होणारे परिणाम : एक चिकित्सक अभ्यास ’’डॉ. रामनाथ साांगुळे, श्री.घडलिंग ननवृत्ती साहेबराव.

Ø हवामानातील बदलाचा कृषी क्षेत्रावरील परिणाम (लेखक : श्री. प्रदीप अ. गोंजारी)

Ø https://sigmaearth.com

Ø https://www.slideshare.net ( Impact and effect of climate change on agriculture) 

***********

विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

VIEW

PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.

दलत्या हवामानाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होतो पर्यावरण प्रकल्प प्रकल्प 5.0 MB .pdf

PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा

DOWNLOAD

नवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.

Subscribe Now ! It's Free

PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.

Post a Comment

निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा Contact Form द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो निबंध देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.