Sathiche Rog Praklp | साथीचे रोग प्रकल्प | संसर्गजन्य रोग
या लेखाच्या माध्यमातून
‘साथीचे रोग’ या विषयावर सविस्तर माहिती बघणार आहोत. या विषयाची महीती खाली
प्रकल्पाच्या स्वरुपात विद्यार्थ्यांना दिली आहे जेणेकरून सर्व माहिती एकाच ठिकाणी
उपलब्ध होईल.
1) प्रस्तावना
शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरीत्या
शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय.
साथीचे रोग हे संसर्गजन्य रोग आहेत जे एका
व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे पसरतात. साथीचे रोग हे विषाणू, बॅक्टेरिया, फंगस किंवा परजीवी यांच्यामुळे होऊ
शकतात. साथीच्या रोगांचा प्रसार वेगाने होतो. साथीच्या रोगांमुळे एकाच वेळी अनेक
लोकांना त्यांची लागण होऊन ते आजारी पडतात.
साथीचे रोग विविध कारणांमुळे होऊ शकतात जसे की
सूक्ष्मजीवांनी शरीरात प्रवेश केल्यामुळे. स्वच्छतेच्या अभावामुळे तसेच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे
या रोगांचा प्रसार होतो. पाणी , अन्न
आणि हवा हे घटक संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात.
जर आपण साथीच्या रोगांचा इतिहास पहिला तर
साथीच्या रोगांमुळे मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम केलेला दिसून येतो. १४व्या
शतकात युरोपमध्ये पसरलेल्या प्लेग च्या साथीने लाखो लोक मृत्युमुखी पडले. १९१८-१९
मध्ये स्पॅनिश फ्लू या साथीच्या आजाराने
जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला. एचआयव्ही/एड्स या रोगाने २०व्या
शतकाच्या उत्तरार्धात लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. अलीकडे २०१९ साली कोव्हीड
१९ या साथीच्या आजाराने देखील कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला.
साथीच्या रोगांमुळे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर, अर्थ व्यवस्थेवर तसेच सामाजिक संरचनेवर मोठा परिणाम घडून
येतो. त्यामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या साथीच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी
प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून साथीचे रोग या
विषयावर सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
2) अनुक्रमणिका
अ.क्र. |
घटक |
पान नं. |
१) |
प्रकल्पाची
उद्दिष्टे |
|
२) |
विषयाचे महत्व |
|
३) |
प्रकल्प
कार्यपद्धती / अभ्यासपद्धती |
|
४) |
निरीक्षणे |
|
६) |
विश्लेषण |
|
८) |
निष्कर्ष |
|
९) |
संदर्भ |
|
१०) |
अहवाल |
|
3) प्रकल्प उद्दिष्ट्ये
Ø साथीचे रोग संकल्पना जाणून घेणे.
Ø साथीचे रोग पसरण्यामागील कारणे माहित करून घेणे.
Ø प्रमुख साथीच्या रोगांबाबत माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन करणे.
Ø रोगाच्या साथीच्या परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती मिळवणे.
Ø साथीच्या रोगांवर कोणती औषधे उपलब्ध आहेत तसेच एखादा रोग झाल्यास आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत माहिती मिळवून तिचे संकलन करणे.
Ø साथीचे रोग या विषयावरील सविस्तर माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे.
साथीचे रोग प्रकल्प pdf | साथीचे रोग माहिती
4) प्रकल्प विषयाचे महत्व
साथीचे रोग हे
मानवजातीसमोर उभे राहिलेले एक मोठे आव्हान आहे. संसर्गजन्य रोगांमध्ये साथीच्या
रोगांचा समावेश होतो. साथीचे रोग हे विषाणू , बॅक्टेरिया, फंगस किंवा परजीवी यांच्यामुळे होऊ शकतात. साथीच्या रोगांमुळे एकाच वेळी
अनेक लोक आजारी पडतात. अशा रोगांचा प्रसार अतिशय जलद गतीने होतो.साथीच्या
आजारांबाबत आपल्याला माहिती असणे हे अत्त्यंत आवश्यक आहे.
साथीच्या रोगांबाबत
सर्वांना अधिक माहिती असणे आवश्यक आहे कारण यामुळे साथीच्या रोगांचा प्रसार
थांबवणे आणि लोकांचा जीव वाचवणे अधिक सोयीस्कर होते. साथीचे रोग शारीरिक
आरोग्याबरोबरच आपल्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करतात. त्यामुळे साथीच्या
आजारांबाबत आपण अभ्यास केल्यास, अधिक माहिती मिळवल्यास
साथीच्या रोगांच्या लाटेत आपल्याला मानसिकदृष्ट्याही तयार राहता येते. कोविड-१९ या
साथीच्या रोगाने याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एखाद्या रोगाबाबत आपल्याला
असलेल्या योग्य माहितीच्या अभावामुळे घाबरून जाणे, चुकीचे
उपचार आणि संसार्गामध्ये वाढ होऊ शकते. साथीच्या रोगांचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही
होतो. त्यांचा अभ्यास आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त ठरतो.
साथीच्या रोगांबाबत आपल्याला अधिक माहिती आधीपासूनच असेल तर भविष्यात येणाऱ्या साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी आपण आधीपासूनच तयार राहू शकतो. म्हणून साथीच्या रोगांचा अभ्यास हा सामाजिक आरोग्याची आणि सुरक्षिततेची मूलभूत गरज आहे. म्हणून मी ‘साथीचे रोग’ या प्रकल्पविषयाची निवड केली.
5) प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यास पद्धती
‘साथीचे रोग’ या
विषयाचा अभ्यास करता असताना मी सर्वेक्षण आणि संशोधन या कार्य पद्धतीचा उपयोग
प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी केला. प्रकल्प विषयाची माहिती मिळवत असतना सदर
विषयावरील प्रकल्प करणे का गरजेचे आहे ? सदर विषयाचे पर्यावरणीय
तसेच सामाजिक महत्व काय आहे याबाबत माहिती जाणून घेतली . या विषयाबाबत अधिक माहिती
मिळवत असताना साथीचे रोग म्हणजे ? रोगाच्या साथीच्या
परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी? साथीच्या रोगांवर कोणती औषधे
उपलब्ध आहेत ? एखादा रोग झाल्यास आपण कोणती काळजी घेतली
पाहिजे ? इत्यादी
गोष्टींचा विचार करून प्रकल्प लेखनासाठी मुद्दे तयार करण्यात आले.
वरील प्रमाणे प्रकापाचे मुद्दे तयार करून
प्रत्येक मुद्द्याबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मी इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या
माहितीचा वापर केला. इंटरनेट च्या माध्यमातून या प्रकल्पाबाबत अधिक माहिती संकलित
करणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती
प्रकाल्पाध्ये समाविष्ट केली.या माहितीच्या आधारावरून प्रकल्प निष्कर्ष नमूद केला.
6) प्रकल्प निरीक्षणे
1.संसर्गजन्य रोग
खालील तक्ता मोबाईल मध्ये पूर्ण पाहण्यासाठी तुमच्या मोबाईल चा TILT Option चालू करा.
रोगाचे नाव |
कारक |
संसर्गाचे माध्यम |
लक्षणे |
उपाय व उपचार |
क्षयरोग (Tuberculosis) |
जीवाणू (मायकोबॅक्टेरिअम ट्युबरक्युली) |
रोग्याच्या थुंकीतून, हवेमार्फत प्रसार, रोग्याच्या सान्निध्यात दीर्घकाळ असणे, रोग्याच्या वस्तू वापरणे. |
दीर्घमुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छ्वास प्रक्रियेत त्रास |
बी. सी.जी. लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे. नियमित औषध घ्यावे. DOT हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. |
कावीळ (Hepatitis) |
विषाणू (हेपॅटीटीस A,B,C,D,E) |
पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, रक्तपराधन |
भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी विष्ठा (मल) |
पाणी उकळून व गाळून प्यावे, स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. |
अतिसार (हगवण) (Diarrhoea) |
जीवाणू, विषाणू शिगेल्ला बॅसीलस एन्टामिबा हिस्टोलिटीका |
दूषित अन्न व पाणी |
पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब |
अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व गाळून प्यावे, जलसंजीवनी (ORS) घ्यावी. |
पटकी (Cholera) |
जीवाणू (व्हिब्रियो कॉलरी) |
दूषित अन्न व पाणी |
उलस्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायांत पेटके येणे. |
स्वच्छता राखावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. |
विषमज्वर (Typhoid) |
जीवाणू (सालमोनेला टायफी) |
दूषित अन्न व पाणी |
भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, 104°F पर्यंत ताप येणे. |
स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करून घ्यावे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी. |
2. साथीच्या रोगांचे प्रकार
१)
बॅक्टेरियामुळे
होणारे रोग :
बॅक्टेरिया हे
सूक्ष्मजीव आहेत. बॅक्टेरिया हे शरीराच्या
विविध भागांमध्ये जाऊन तेथे संसर्ग निर्माण करू शकतात. बॅक्टेरियांच्या
संसर्गामुळे जलदगतीने रोग पसरतो.
उदाहरण: कॉलरा,
निमोनिया
२) विषाणूंमुळे होणारे रोग :
विषाणू हे
बॅक्टेरियांच्या तुलनेत खूपच छोटे असतात आणि ते शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करून
त्यांना हानी पोहोचवतात. विषाणूंमुळे होणारे रोग सामान्यतः श्वसनमार्गे आणि
संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतात.
उदाहरण : इन्फ्लुएंझा, एचआयव्ही/एड्स, कोविड-१९
३) परजीवींमुळे होणारे रोग:
परजीवी हे मोठे
सूक्ष्मजीव असतात जे यजमान प्रजातीच्या शरीरात राहून त्यांना हानी पोहोचवतात.
परजीवीजन्य रोग हे प्रामुख्याने संक्रमित पाण्यामुळे आणि कीटकांच्या माध्यमातून
पसरतात.
उदाहरण: मलेरिया,
लेशमॅनियासिस, मलेरिया
आणि टॉक्सोप्लाझोसिस
3. मुख्य साथीचे रोग
1. प्लेग
2. फ्लू (इन्फ्लुएंझा)
3. कोरोनाव्हायरस (COVID-19)
4. डेंग्यू
5. मलेरिया
७) विश्लेषण
१) साथीचे रोग पसरण्याची कारणे
साथीचे रोग हे विविध कारणांनी पसरतात.यामध्ये
सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव, संबंधित
भागात राहणाऱ्या लोकांची जीवनशैली, पर्यावरणीय बदल, आणि आरोग्य सेवांमध्ये असणाऱ्या त्रुटी यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
1. सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव:
§ अस्वच्छ पिण्याचे पाणी आणि परिसरातील अस्वच्छता इत्यादी गोष्टी साथीचे रोग पसरवण्यासाठी पूरक ठरतात.
§ रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावलास त्या कचऱ्यात साथीचे रोग पसरवणारे जीवाणू, विषाणू आणि परजीवी निर्माण होतात.
§ उघड्यावर मलमुत्र विसर्जन आणि अस्वच्छ सार्वजनिक शौचालये यांमुळे रोगजंतूंना प्रचंड वाव मिळतो.
2. गर्दी व दाट लोकवस्ती:
§ अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्य साथीचे रोग जलदगतीने पसरण्याचा धोका वाढतो.
§ दात लोकसंख्येच्या ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी श्वसनाद्वारे होणारे आजार (उदा. फ्लू, क्षयरोग) पटकन पसरतात.
§ पुरेशी खेळती हवा नसणे, आणि दाट लोकसंख्या रोगप्रसारासाठी कारणीभूत ठरतात.
3. अपुऱ्या आरोग्यसेवा:
§ साथीच्या रोगांचे वेळेवर निदान न झाल्यास किंवा त्यावर योग्य वेळी उपचार न घेतल्यास पुढे हे आजारांनी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.
§ संबंधित परिसरात आरोग्यसेवेचा अभाव असल्यास रोग नियंत्रणासाठी लागणाऱ्या औषधोपचारांचा तुटवडा होतो.
§ जनजागृतीचा अभावामुळे रोग नियंत्रणात मोठी अडचण निर्माण होते.
4. बदललेले पर्यावरण व हवामान:
§ तापमानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे विशिष्ट रोगजंतूंची वाढ होते. उदा. डेंग्यू आणि मलेरिया पसरणाऱ्या डासांची संख्या उष्ण हवामान असणाऱ्या ठिकाणी जास्त असते.
§ पूर, दुष्काळ, आणि उष्णतेच्या लाटांमुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढतो.
§ जंगलतोड, शहरीकरण, आणि नैसर्गिक अधिवास नष्ट केल्याने प्राण्यांमधून मानवांमध्ये रोग पसरण्याचे प्रमाण वाढले आहे (उदा. झुनोटिक रोग).
साथीचे रोग पसरण्याची कारणे | साथीचे रोग in marathi | साथीचे रोग म्हणजे काय ?
२) साथीच्या रोगांचे परिणाम
वैयक्तिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्यावर
साथीच्या रोगांचे दीर्घकालीन परिणाम झालेले दिसून येतात.
1. वैयक्तिक परिणाम:
v आरोग्यावर परिणाम:
§ साथीच्या रोगांमुळे शारीरिक अशक्तपणा आणि आजारपणात वाढ होते.
§ साथीच्या आजाराचा कालावधी जास्त असल्यास इतर आरोग्याच्या समस्या उदा. मधुमेह, हृदयविकार किंवा श्वसनविकार यांमध्ये वाढ होते.
§ रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे इतर संसर्ग होण्याची शक्यात वाढते.
v मृत्यू:
§ गंभीर साथीच्या रोगांमुळे मृत्युच्या प्रमाणात वाढ होते. (उदा. प्लेग, कोविड-19).
§ कुपोषण, संसर्ग, आणि उपचारांतील दिरंगाई यामुळे मृत्यूच्या धोक्यामध्ये वाढ होते.
2. सामाजिक परिणाम:
v आरोग्य सेवांवरील भार:
· रुग्णालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडू शकते.
· आरोग्यसेवेतील कामगारांवर कामाचा ताण वाढतो, ज्यामुळे सेवांच्या गुणवत्तेत घट होते.
· औषधे, लसी, आणि वैद्यकीय उपकरणांची कमतरता जाणवते.
v आर्थिक तोटा:
· साथीच्या रोगांमुळे कामगार वर्ग आजारी पडल्याने उत्पादनक्षमता कमी होते.
· व्यापारी व्यवहारांमध्ये अडथळे येतात, परिणामी देशाची अर्थव्यवस्था कोलमडते.
· साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी आणि उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संसाधनांचा वापर करावा लागतो.
v शिक्षण व इतर सेवांवरील परिणाम :
· शाळा, महाविद्यालये, आणि सार्वजनिक सेवा बंद राहिल्याने शिक्षण व सामाजिक प्रगती थांबते.
· अनेक वेळा स्थलांतर आणि बेरोजगारीची समस्या निर्माण होते.
3) मानसिक आरोग्यावर परिणाम:
v भीती आणि असुरक्षितता:
· साथीच्या रोगाच्या भीतीमुळे समाजात अस्थिरता आणि दहशतीचे वातावरण निर्माण होते.
v निराशा आणि ताण:
· काम आणि सामाजिक आयुष्यावर परिणाम झाल्यामुळे व्यक्तींमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढतो.
v विभाजन आणि दुजाभाव:
· आजारी लोकांबद्दल समाजात वेगळेपणाची भावना निर्माण होते.v एकाकीपणा:
· विलगीकरणामुळे लोक मानसिकदृष्ट्या एकाकी होऊ शकतात, ज्याचा मानसिक स्वास्थ्यावर दीर्घकालीन परिणाम होतो.
३) प्रतिबंधात्मक उपाय
साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. हे उपाय वैयक्तिक, सामाजिक आणि वैद्यकीय स्तरावर राबवले जाऊ शकतात. खाली
दिलेले उपाय साथीच्या रोगांचा प्रसार कमी करण्यात आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यात
उपयुक्त ठरतात:
1. प्रतिबंधात्मक लसीकरण:
- महत्त्व: साथीचे अनेक रोग (उदा. पोलिओ, कोविड-19) प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे टाळता येतात.
- लसींचा
नियमित डोस: डॉक्टरांच्या
सल्ल्यानुसार आवश्यक लसी वेळेत घेतल्याने धोका टळतो.
- प्रभाव: लसीकरणामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती
वाढते, ज्यामुळे
विषाणू किंवा जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांचा धोका कमी होतो.
2. स्वच्छता राखणे:
- व्यक्तिगत
स्वच्छता: रोज अंघोळ करणे, वेळोवेळी हात धुणे (विशेषतः खाण्याआधी व शौचालयानंतर).
- सार्वजनिक
स्वच्छता: सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आणि कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट
लावणे.
- पिण्याचे
स्वच्छ पाणी: उकळलेले किंवा शुद्ध पाणी पिणे.
3. संसर्गित व्यक्तीपासून अंतर ठेवणे:
- संपर्क
टाळणे: आजारी व्यक्तीच्या थेट संपर्कात जाणे टाळावे.
- विलगीकरण : संसर्गित
व्यक्तींना इतरांपासून वेगळे ठेवणे.
- गर्दी टाळणे :
साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या काळात सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
4. वैयक्तिक स्वच्छतेचे पालन:
- मास्क चा
वापर करणे: श्वसनमार्गाने पसरणाऱ्या रोगांपासून बचावासाठी चेहऱ्यावर मास्क
घालणे.
- शिंका/खोकल्याचा
योग्य पद्धतीने निवारण: शिंका किंवा खोकताना तोंड व नाक रुमालाने किंवा
कोपराने झाकणे.
- हात
निर्जंतुक करणे: हात निर्जंतुकीकरण करण्याठी सॅनिटायझरचा वापर करणे.
5. योग्य आहार व रोगप्रतिकारशक्ती वाढवणे:
- संतुलित
आहार: शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे,
जसे की व्हिटॅमिन C, प्रथिने, आणि झिंक यांचा आहारात समावेश करावा.
- भरपूर पाणी
पिणे: शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
- योग आणि
व्यायाम: शारीरिक स्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम व योगासन करणे.
- पुरेशी झोप: रोगप्रतिकारक
शक्ती मजबूत ठेवण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे.
6.अतिरिक्त उपाय:
- जंतुनाशकांचा
वापर: घर व आसपासच्या परिसरात जंतुनाशकांचा वापर करून स्वच्छता ठेवणे.
- सजगता: रोगांच्या
लक्षणांबाबत जागरूक राहणे आणि लक्षणे दिसल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे.
- आरोग्य
तपासणी: साथीच्या रोगांच्या काळात नियमित वैद्यकीय तपासणी करून आरोग्याविषयी
खबरदारी घेणे.
४) साथीच्या रोगांची माहिती
१) फ्लू (इन्फ्लुएंझा)
फ्लू हा एक विषाणूजन्य रोग आहे. फ्लू मध्ये रोग्याला
सर्दी होते आणि ताप येतो. फ्लू साधारणतः हवेतील सूक्ष्म कणांद्वारे पसरतो. कधी कधी, फ्लूच्या विषाणूंचा संपर्क असलेल्या वस्तूंच्या
माध्यमातूनही हा पसरू शकतो. फ्लू हा अगदी साधा रोग वाटत असला तरीही वेळेवर योग्य उपचार
घेतले नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. फ्लू हा इन्फ्लुएंझा या विषाणूमुळे
होतो.याचे चार मुख्य प्रकार A, B, C, आणि D आहेत त्यांपैकी A आणि B प्रकार
जास्त सामान्यपणे मानवामध्ये आढळतात.
v फ्लू रोगाची कारणे:
Ø फ्लू रोगाचे मुख्य कारण इन्फ्लुएंझा विषाणू आहे, जो एरोसोल्स (वायूतील सूक्ष्म कण) द्वारे एक व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो.
Ø इन्फ्लुएंझा हा विषाणू श्वासोच्छ्वासाद्वारे, खोकला किंवा शिंकण्याने बाधित व्यक्तीपासून इतरांपर्यंत पसरतो.
Ø ज्या व्यक्तींना फ्लू आहे, त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर हा विषाणू दुसऱ्या
व्यक्तीला होऊ शकतो.
v फ्लू रोगाची लक्षणे:
फ्लू रोगाची लक्षणे साधारणतः 1 ते 4 दिवसांमध्ये दिसू लागतात.
Ø ताप येणे.
Ø घसा दुखणे.
Ø सर्दी किंवा नाक वाहणे.
Ø खोकला.
Ø डोके दुखणे.
Ø थकवा किंवा अशक्तपणा.
v फ्लू चे प्रकार:
1. इन्फ्लुएंझा A:
हा प्रकार प्रामुख्याने प्राण्यांमध्ये आणि
माणसांमध्येही होतो.
2. इन्फ्लुएंझा B:
हा प्रकार मुख्यतः मानवांमध्येच होतो.
3. इन्फ्लुएंझा C:
हा प्रकार कमी तीव्रता असलेला आणि साधारणतः सौम्य असतो.
4. इन्फ्लुएंझा D:
हा प्रकार प्रामुख्याने प्राण्यांमध्ये होतो.
v फ्लू रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय:
Ø लस: फ्लू वर उपचार म्हणून फ्लू च्या लसीचा वापर
केला जातो. फ्लूच्या लसीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे शक्य होते.
Ø हात स्वच्छ धुणे: वारंवार हात स्वच्छ धुणे गरजेचे
आहे.
Ø सामाजिक अंतर राखणे: फ्लू झालेल्या व्यक्तीपासून
दूर राहणे.
Ø खोकताना किंवा शिंकताना नाक व तोंड झाकणे
२) क्षयरोग (टीबी)
क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) नावाच्या जीवाणूमुळे होणारा
संसर्गजन्य आजार आहे. हा मुख्यतः जास्त परिणाम फुफ्फुसांवर होतो. परंतु किडनी,
हाडे, मेंदू, आणि इतर
अवयवांवरही क्षयरोगाचा परिणाम होऊ शकतो.
v क्षयरोगाचे प्रकार
1. सक्रिय क्षयरोग (Active TB):
· लक्षणे स्पष्ट दिसतात, आणि हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरतो.
· योग्य वेळी उपचार करणे आवश्यक असते.
2. सुप्त क्षयरोग (Latent TB):
· या प्रकारामध्ये क्षयरोगाचा शरीरात जीवाणू असतो पण तो निष्क्रिय अवस्थेत असतो.
· या प्रकारात कोणतीही लक्षणे आढळत नाहीत, आणि संसर्ग पसरत नाही.
· परंतु भविष्यात हा सक्रिय होऊ शकतो.
v क्षयरोगाची लक्षणे :
Ø सतत खोकला (3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ)
Ø छातीत दुखणे
Ø रक्तमिश्रित थुंकी येणे
Ø वजन अचानक कमी होणे
Ø थकवा आणि कमजोरी
Ø रात्री घाम येणे
Ø सौम्य ताप, जो सतत राहतो
v क्षयरोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय
Ø लसीकरण: बीसीजी (BCG) लस नवजात बाळांना दिली जाते, ज्यामुळे टीबीचा धोका कमी होतो.
Ø स्वच्छता: संक्रमित व्यक्तीने मास्क वापरणे आणि थुंकीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे.
Ø शक्य तेवढे वेगळे राहणे: आजारी व्यक्तींना इतरांपासून वेगळे ठेवणे.
३) कावीळ (Jaundice)
कावीळ हा यकृताशी संबंधित आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील बॅलिरुबिन (Bilirubin) या पित्तरसाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे त्वचा, डोळे,
आणि शरीरातील इतर भाग पिवळसर होतात. हा आजार कोणत्याही वयोगटातील
व्यक्तींना होऊ शकतो.
v कावीळ होण्याची कारणे :
1. यकृताचे आजार:
· हेपेटायटीस (Hepatitis A, B, C, D, E)
· सिरोसिस (लिव्हर खराब होणे)
2. रक्ताच्या विकारांमुळे:
· लाल रक्तपेशींचा (RBC) वेगाने नाश होणे.
3. पित्तनलिकेचे अडथळे:
· पित्तनलिकेत खडे होणे (Gallstones).
· ट्युमर किंवा कर्करोगामुळे पित्ताचा प्रवाह अडथळला जातो.
4. जन्मजात समस्या:
· नवजात शिशूंमध्ये यकृताचा पुरेसा विकास न झाल्यास कावीळ होऊ शकते.
v कावीळ रोगाची लक्षणे
Ø डोळे व त्वचा पिवळसर होणे.
Ø मूत्र गडद पिवळसर होणे.
Ø थकवा आणि अशक्तपणा येणे.
Ø भूक न लागणे.
Ø वजन कमी होणे.
Ø पोटदुखी किंवा उजव्या बाजूला वेदना होणे.
Ø मळमळ किंवा उलट्या.
Ø त्वचेला खाज सुटणे.
v कावीळ रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय
Ø दूषित अन्न व पाणी खाणे टाळा.
Ø यकृताला हानिकारक पदार्थ (जसे की अल्कोहोल) पिणे टाळा.
Ø वेळोवेळी लसीकरण करून घ्या (उदा. हेपेटायटीस बी साठी).
Ø वैयक्तिक स्वच्छता राखा.
Ø नियमित वैद्यकीय तपासणी करा.
४) अतिसार (Diarrhea)
अतिसार म्हणजे पातळ शौचाला वारंवार होणारा
त्रास. हा कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो आणि योग्य उपचार न झाल्यास तो
गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
v अतिसाराचे प्रकार
1) तीव्र अतिसार (Acute Diarrhea):
Ø या प्रकारामध्ये काही दिवसांपुरता त्रास होतो.
Ø अतिसार हा साधारणतः बॅक्टेरिया, विषाणू किंवा खराब अन्नामुळे होतो.
2) चिरकालिक अतिसार (Chronic Diarrhea):
Ø या प्रकारातील अतिसार हा तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतो.
Ø या प्रकारातील अतिसार हा आरोग्य समस्यांमुळे होऊ शकतो, जसे की इर्रिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) इ.
v अतिसार होण्याची कारणे
अन्न व पाणी: अतिसार हा दूषित अन्न व पाण्यामुळे होणातो.
औषधांचे साइड इफेक्ट्स: अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधांमुळे अतिसार होऊ शकतो.
v अतिसाराची लक्षणे
Ø वारंवार पातळ शौच होणे.
Ø पोटदुखी किंवा क्रॅम्प्स
Ø थकवा
Ø ताप
Ø ओकारी किंवा मळमळ
Ø तोंड व ओठ कोरडे पडणे (निर्जलीकरणाची लक्षणे)
Ø मूत्राचे प्रमाण कमी होणे
v उपचार व प्रतिबंध
1. घरगुती उपाय:
Ø ओआरएस (ORS): शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी.
Ø नारळपाणी, ताक, किंवा भाताच्या पाण्याचा वापर.
Ø हलके आणि पचायला सोपे अन्न खाणे, जसे की खिचडी, फळे, उकडलेली भाजी.
2. औषधोपचार:
Ø निर्जलीकरण टाळण्यासाठी वैद्यकीय उपचार.
Ø बॅक्टेरियल संसर्गासाठी अँटीबायोटिक्स.
3. प्रतिबंध:
Ø स्वच्छ पाणी व अन्न सेवन करणे.
Ø हात धुण्याची सवय लावणे, विशेषतः जेवणाआधी आणि शौचालय वापरल्यावर.
Ø दूषित अन्नपदार्थ खाणे टाळणे.
Sathiche Rog Praklp | पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी
५)कोव्हिड-१९
कोव्हिड-१९ (COVID-19) हा श्वसनमार्गाशी संबंधित संसर्गजन्य आजार आहे. कोव्हिड-१९ हा SARS-CoV-2 या विषाणूमुळे होतो. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात याचा प्रथम प्रादुर्भाव झाला आणि नंतर तो जागतिक महामारी म्हणून पसरला.
v कोव्हिड-१९ चा प्रसार कसा होतो?
1. थेट संपर्काद्वारे:
Ø संक्रमित व्यक्ती खोकल्यावर, शिंकताना किंवा बोलताना लहान थेंब (droplets) हवेत पसरतात.
Ø या थेंबांचा संपर्क इतरांच्या तोंड, नाक, किंवा डोळ्यांशी आला तर संसर्ग होऊ शकतो.
2. स्पर्शाद्वारे:
Ø संक्रमित पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हात तोंड, नाक किंवा डोळ्यांशी लावल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते.
v कोव्हिड-१९ रोगाची लक्षणे:
1. सौम्य लक्षणे:
Ø ताप येणे.
Ø कोरडा खोकला
Ø थकवा जाणवणे
2. गंभीर लक्षणे:
Ø श्वास घेण्यास त्रास
Ø छातीत वेदना
Ø संभ्रम (Confusion)
Ø ओठ किंवा चेहरा निळसर होणे
3. इतर लक्षणे:
Ø स्वाद व गंध न येणे
Ø अंगदुखी
Ø घसा खवखवणे
Ø सर्दी किंवा डायरिया
v कोव्हिड-१९ प्रतिबंधाचे उपाय:
Ø लसीकरण: कोव्हिड-१९ पासून बचावासाठी लस घेणे अत्यावश्यक आहे.
Ø मास्क घालणे: सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे.
Ø सामाजिक अंतर ठेवणे: इतरांपासून किमान ६ फूट अंतर ठेवणे.
Ø हात स्वच्छ ठेवणे: साबणाने वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर.
Ø गर्दी टाळणे: गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.
६) पटकी रोग (Cholera) :
पटकी, यालाच कॉलरा (Cholera) म्हणतात, कॉलरा हा रोग Vibrio cholerae नावाच्या जीवाणूने होणारा संसर्गजन्य आजार आहे. कॉलरा हा रोग मुख्यतः दूषित पाणी आणि अन्नामुळे हा रोग पसरतो.
v पटकी रोगाची कारणे:
Ø Vibrio cholerae जीवाणूचे संक्रमण.
Ø दूषित पाणी किंवा अन्नाचे सेवन.
Ø स्वच्छतेच्या अभावामुळे रोगाचा प्रसार होतो.
v कॉलरा रोगाची लक्षणे :
Ø अतिसार (पाण्यासारखी वारंवार सैल विष्ठा).
Ø उलट्या होणे.
Ø शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन).
Ø भूक कमी होणे.
Ø शारीरिक अशक्तपणा.
Ø त्वचेचा कोरडेपणा आणि लवचिकता कमी होणे.
v प्रतिबंधात्मक उपाय:
Ø स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा वापर करावा.
Ø अन्न शिजवताना आणि हात स्वच्छ करताना स्वच्छतेचे पालन करावे.
Ø मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावणे.
Ø सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा विशेष विचार करावा.
७) टायफाइड:
टायफाइड हा एक गंभीर संसर्गजन्य रोग आहे, टायफाइड हा रोग सॅल्मोनेला टायफी (Salmonella Typhi) या जीवाणूमुळे होतो. हा रोग मुख्यतः दूषित अन्न किंवा पाणी पिल्यामुळे होतो.
v टायफाइड होण्याची कारणे:
Ø दूषित अन्न किंवा पाणी ग्रहण करणे.
Ø स्वच्छतेचा अभाव.
Ø टायफाइडग्रस्त व्यक्तीशी संपर्क.
Ø योग्य अन्न साठवणुकीचा अभाव.
v टायफाइडची लक्षणे:
Ø सतत ताप (जास्त करून १०२-१०४ अंश फॅरेनहाइट).
Ø डोकेदुखी.
Ø पोटदुखी.
Ø थकवा आणि अशक्तपणा.
Ø अन्न खाण्याची इच्छा कमी होणे.
Ø काही वेळा मलात रक्त येणे किंवा अतिसार होणे.
Ø त्वचेमध्ये लालसर पुरळ (रॅशेस) उठणे.
v टायफाइड रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय :
Ø स्वच्छता राखा: नियमित हात धुणे (विशेषतः जेवण्यापूर्वी).
Ø उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या.
Ø योग्य प्रकारे शिजवलेले अन्न खा.
Ø टायफाइड लसीकरण (Typhoid vaccine) करून घ्या.
Ø टायफाइड झालेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवा.
८) निष्कर्ष
साथीचे रोग हे समजासमोर गंभीर आव्हान उभे करतात.
1. स्वच्छतेचे महत्त्व:
ü साथीचे रोग हेप्रामुख्याने दूषित पाणी, अन्न, किंवा अस्वच्छतेमुळे पसरतात.
त्यामुळे वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे.
2. जलद निदान आणि उपचार:
ü कोणत्याही रोगाचे वेळीच निदान व योग्य उपचार
केल्यास त्याचा प्रादुर्भाव कमी करता येतो व मृत्यूदर टाळता येतो.
3. लसीकरणाची
आवश्यकता:
ü लसीकरण हा साथीचे रोग टाळण्यासाठी लसीकरण हा एक
प्रभावी मार्ग आहे. उदाहरणार्थ, टायफाइड,
पोलिओ, आणि इतर रोगांच्या बाबतीत लसीकरणाने
मोठ्या प्रमाणावर बचाव साधला आहे.
4. सामूहिक जबाबदारी:
ü साथीचे रोग नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण
समाजाची जबाबदारी असते. प्रत्येकाने स्वच्छतेचे नियम पाळणे, आजारी व्यक्तीपासून अंतर ठेवणे, आणि
आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.
5. सतर्कता आणि जनजागृती:
ü साथीचे रोग टाळण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता
वाढवणे गरजेचे आहे. आरोग्यविषयक नियम व उपाय योजना यांची माहिती प्रत्येकाला
असावी.
6. निसर्गाचा प्रभाव:
ü हवामानातील बदलांमुळे साथीचे रोग पसरतात. अशा
वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
7. समाजाच्या एकजुटीचा प्रभाव:
ü साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार, वैद्यकीय क्षेत्र, आणि जनतेने
एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे.
ü एकूणच, स्वच्छता, वेळीच उपचार, आणि
समाजाची एकजूट हे साथीचे रोग थांबवण्यासाठी अत्यंत प्रभावी घटक आहेत.
v या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील उद्दिष्ट्ये साध्य
झाली.
ü साथीचे रोग म्हणजे काय याबाबत अधिक माहिती जाणून
घेतली.
ü साथीचे रोग कोणत्या कारणांमुळे पसरतात याबबत माहिती
मिळवली.
ü प्रमुख साथीच्या रोगांबाबत माहिती मिळवून त्या
माहितीचे संकलन केले.
ü रोगाच्या साथीच्या परिस्थितीत कोणती काळजी
घ्यावी याबाबत माहिती मिळवणे शक्य झाले.
ü साथीच्या रोगांवर कोणती औषधे उपलब्ध आहेत तसेच
एखादा रोग झाल्यास आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती मिळवली.
Evs project class 11 and 12 | Evs project topic | evs project for college in Marathi pdf
९) संदर्भ
Ø
पर्यावरण
पुस्तिका
**********
विविध विषयांवरील प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा
VIEWPDF DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगातील बाणावर क्लिक करा.
PDF Password मिळविण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा
DOWNLOADनवीन प्रकल्पांच्या Notification मिळवण्यासाठी Educationalमराठी चे You Tube Channel आत्ताच Sbscribe करा.
PDF DOWNLOAD कशी करावी हे खालील video मध्ये पहा.