पर्यावरण प्रकल्प ११वी,१२वी
प्रकल्प कार्य (३० गुण)
{प्रकल्पांची अनुक्रमणिका या लेखाच्या खाली दिली आहे तेथून तुम्हाला हवा असलेला प्रकल्प मिळू शकतो.}
पर्यावरण प्रकल्प कार्य अहवाल लेखनासाठी खालील मार्गदर्शक सूचनेनुसार करावा . प्रकल्प कार्य अहवाल सादरीकरण विद्यार्थ्यांनी खालील मुद्द्यांना अनुसरून लेखन करणे अनिवार्य आहे . पाठ्यपुस्तकात प्रकल्प कार्यासाठी दिलेल्या संदर्भ प्रकल्प यादीतून किंवा यादीबाहेरील पर्यावरणसंबंधी समस्या विषय घेऊन प्रकल्प कार्य करावे .
Ø प्रकल्प कार्याचे मूल्यमापन खालील मुद्द्याप्रमाणे असेल .
१ ) प्रकल्प विषय निवड ( प्रस्तावना ) :
प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित आहे , जसे – विदयार्थ्यांनी पर्यावरणासंबंधी समस्या , विषयाची निवड का केली, संकल्पना , थोडक्यात विषयाचा इतिहास , नवीन अद्ययावत माहिती, विषयाची सदयस्थिती अशा घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने असावा .
२ ) विषयाचे महत्त्व :
यामध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचे पर्यावरणविषयी ,शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्याचे महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणाने लिहावे .
३ ) प्रकल्प कार्याची उद्दिष्ट्ये :
ज्या हेतूने आपण प्रकल्पाचा विषय निवडला , त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्ट्ये लिहिणे आवश्यक आहे .
४ )प्रकल्प कार्यपद्धती :
प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता येतो . जसे – सर्वेक्षण , प्रश्नावली , मुलाखत , प्रयोग , क्षेत्र निरीक्षणे , क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. ( परंतु यापुरतेच मर्यादित नाही ) सर्वसाधारणपणे विदयार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या समस्यांचा विचार करण्यास प्रवृत्त करावे . जेणेकरून त्यांना सभोवतालच्या समस्यांचा विचार करण्याची त्यावरील उपाय योजण्याची व पर्याय शोधण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
५ ) निरीक्षणे :
निवडलेल्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे , आलेख तक्त्याच्या स्वरूपात प्रदर्शित करावी , तसेच संक्षिप्त व मुद्देसूद असावीत . निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असणे जरुरीचे आहे. अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण संकलित केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करणे हा महत्वाचा टप्पा आहे . मध्य , मध्यमान , सहसंबंध , सरासरी , टक्केवारी इत्यादीच्या आधारे विश्लेषण अधिक अचूक के प्रभावी होते . सदर पद्धतीने आपण आलेख , स्तंभालेख , पायआलेख , अशा आकृतींच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे दर्शवू शकतो.
६) निष्कर्ष :
विश्लेषणावरून प्राप्त माहितीच्या आधारे प्रकल्पाचा निष्कर्ष लिहावा.
Ø प्रकल्प करताना प्रकल्पात समावेश करण्यासाठी आवश्यक मुद्दे:
|
|
|
|
|
|
|
|
|
मित्रांनो वरील माहितीवरून तुम्हाला प्रकल्प लेखन कसे करावे याबाबत कल्पना आलीच असेल. वरील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या मुद्द्यांचा आपल्या पर्यावरण विषयाच्या प्रकल्पामध्ये अवश्य वापर करा.
मित्रांनो तुम्हाला प्रकल्प कसे लिहावेत याची अधिक माहिती मिळण्यासाठी www.educationalmarathi (Educational Marathi) आमची website तुमच्यासाठी विविध विषयांवरील प्रकल्प घेऊन आलो आहोत. तुम्हाला हवा असणारा प्रकल्प पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
(पर्यावरण प्रकल्प ११वी व १२वी)
अजून प्रकल्प पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
प्रकल्प ५६ ते ११० पहा- प्रकल्प आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध , प्रकल्प हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- मित्रांनो या PAGE वरील माहिती आवडल्यास आम्हाला COMMENT करून जरूर कळवा.
- आपल्या काही आमच्यासाठी सुचना असतील तर जरूर कळवा.














Karkhanyamule honarya vayu pradushanacha anhyas karne in marathi
Zade lava zade jagava