औद्योगिक
प्रदूषण प्रकल्प
नमस्कार मित्रांनो Educationalमराठी या शैक्षणिक माहितीच्या वेबसाईटवर तुमचे सहर्ष स्वागत आहे.
मित्रांनो आज आपण ‘औद्योगिक प्रदूषण’ या विषयावरील प्रकल्पाची माहिती घेणार आहोत.
प्रकल्पाची प्रस्तावना , विषयाचे महत्व, निरीक्षणे, विश्लेषण, निष्कर्ष, संदर्भ या
सर्व मुद्द्यांचा समावेश असलेल्या प्रकल्पाची माहिती आम्ही उपलब्ध करून दिली आहे.
११ वी
१२वी पर्यावरण विषयाच्या प्रकल्पासाठी तसेच इतर इयत्तांचा प्रकल्प करताना देखील या
माहितीचा विद्यार्थी उपयोग करू शकतात.
११वी,१२वी
प्रकल्प ‘औद्योगिक प्रदूषण’
चला
तर मग ‘औद्योगिक प्रदूषण’ या प्रकल्पाला सुरुवात करूया
प्रकल्प प्रस्तावना
आजच्या युगातला स्वतःला बुद्धिमान म्हणवणारा माणूस काही
वेळेला तर स्वतः समोर स्वताच्या कृतीतूनच विवध संकटे निर्माण करीत असतो. प्रत्येक
लागणाऱ्या नव्या शोधाबरोबर एका संकटाची देखील निर्मिती होत असते. सृष्टीच्या
निर्मितीच्या सुरुवातीला माणूस व पर्यावरण यांत सुंदर समतोल साधलेला पाहायला मिळत
होता. निसर्ग आणि मानव हे एकमेकांना अगदी पूरक होते.
औद्योगिक क्रांती झाली आणि निसर्गाचा सारा समतोलच बिघडून
गेला. चाकाच्या शोधानंतर एकामागोमाग एक आधुनिक वाहने आले आणि माणसाची गती वाढली. परंतु
या साऱ्याचे पर्यावरणावर वाईट परिणाम होत होते. या कडे माणसाने दुर्लक्ष केले.
उद्योगांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे तयार होणारे दुषित ढग हे पावसाळी ढगांवरदेखील
परिणाम घडवून आणतात. काळाबरोबर बदलताना माणसाने गिरण्या , कारखाने उद्योगधंदे
निर्माण केले पण त्यातून निर्माण होणारे सांडपाणी स्वच्छ पाण्याच्या स्त्रोतात
सोडण्यात आले. माणसाने स्वतःसाठी निर्माण केलेल्या अनेक गोष्टी त्यात नभोवाणी,
दूरचित्रवाणी अशा गोष्टींमुळे आज मोठ्या प्रमाणवर ध्वनीप्रदूषण होत आहे. त्यामुळे
माणसाला कर्णबधिरता येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या तर
ही गंभीर होत जाणारी प्रदूषणाची समस्या काही प्रमाणत कमी होऊ शकेल.
‘औद्योगिक प्रदूषण’ या प्रकल्पाच्या माध्यमातून औद्योगिक
प्रदूषण म्हणजे काय? औद्योगिक प्रदूषणाचे कोणते प्रकार आहेत. प्रदूषणाचे
पर्यावरणावर होणारे परिणाम त्याचबरोबर प्रदूषण पातळी नियंत्रित करण्यासाठीच्या
उपाययोजना यांची माहिती सर्वाना व्हावी म्हणून मी या प्रकल्प विषयाची निवड केली
आहे.
अनुक्रमणिका
|
अ.क्र. |
घटक |
पान नं. |
|
१) |
विषयाचे महत्व |
|
|
२) |
प्रकल्पाची उद्दिष्टे |
|
|
३) |
औद्योगिक प्रदूषण आणि प्रदूषके संकल्पना |
|
|
४) |
औद्योगिक प्रदूषणाचे प्रकार |
|
|
|
Ø हवा प्रदूषण |
|
|
|
Ø जल प्रदूषण |
|
|
|
Ø मृदा प्रदूषण |
|
|
|
Ø ध्वनी प्रदूषण |
|
|
५) |
निष्कर्ष |
|
|
६) |
निरीक्षणे |
|
|
७) |
विश्लेषण |
|
|
८) |
संदर्भ |
|
१.विषयाचे महत्व
ज्या वेगाने साऱ्या
जगभरात औद्योगिक प्रदूषण वाढत चालले आहे . ते पाहता सारे जग हे विनाशाच्या
मार्गावर अग्रेसर झालेले आपल्याला दिसते. आजचे वाढते प्रदूषण पहिले की या जगाचा
विनाश लकारात लवकर होईल की काय, अशी भीती वाटते. आज औद्योगिक
प्रदूषणाची पातळी अनेक ठिकाणी प्रमाणाबाहेर वाढली आहे. ती कमी करणे काही शक्य
नाही. आज हा प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे.
प्रदूषणाचे प्रमाण वाढायला
प्रमुख कारण म्हणजे – कल्पनातीत वाढलेली लोकसंख्या परिणामी वाढत्या लोकसंख्येला
मोठ्या प्रमाणवर सोई सुविधा पुरवण्यासाठी उभ्या राहिलेल्या उद्योगांतून मोठ्या
प्रमाणात प्रदूषण होत आहे. माणसानेच निर्माण केलेले हे प्रदूषण आज माणसाच्याच
जीवावर उठलेले आपल्याला पाहायला मिळत आहे.
हे वाढते
प्रदूषणाचे संकट काही प्रमाणवर कमी करता येऊ शकते. किमान वाढते प्रदूषण हे मर्यादित
प्रमाणत ठेऊ शकतो.; पण हे सर्व होण्यासाठी प्रत्येक माणसाने प्रदूषणाच्या
समस्येबाबत जागरूक होणे गरजेचे आहे. उद्योगधंदे , कारखाने, यांचे म्हणजेच ओघाने
वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. उद्योगांमध्ये प्रदूषणाबाबत चे
नियम कटाक्षाने पाळले गेले तरच प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात वाढू न देता स्थिर
ठेवता येऊ शकेल. जर हे उपाय नाही केले तर येत्या काळात जगावर फार मोठे प्रदूषणाचे
संकट येईल हे मात्र नक्की.
म्हणूनच आज
सर्वांना ‘औद्योगिक प्रदूषण’ या विषयाबाबत सविस्तर माहिती करून घेणे गरजेचे आहे.
२.प्रकल्पाची उद्दिष्ट्ये
Ø औद्योगिक
प्रदूषण संकल्पना जाणून घेणे.Ø प्रदूषके
म्हणजे काय याबाबत अधिक माहिती मिळविणे.Ø औद्योगिक
प्रदूषणाचे प्रकार कोण कोणते आहेत त्यांची माहिती मिळविणे.Ø औद्योगिक
प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे.Ø औद्योगिक
प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे.Ø प्रदूषण
कमी करण्यासाठीच्या उपाय योजनाची अधिक माहिती करून घेणे.Ø औद्योगिक
प्रदूषण याबाबत अधिक माहिती इतरांना मिळवून देणे.
३.औद्योगिक प्रदूषण संकल्पना
कच्च्या
मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्क्या मालाची निर्मिती करणे हे काम उद्योग करत
असतात; या सर्व प्रक्रियांमध्ये पक्क्या मालाची निर्मिती होत असताना कारखान्यांतून
/ उद्योगांतून काही हानिकारक प्रदूषके, बाहेर पडतात या प्रदूषकांमुळे हवा, पाणी,
जमीन आणि ध्वनी यांच्या प्रदुषणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. हे प्रदूषण
उद्योगांमुळे होते त्यामुळे या औद्योगिक प्रदूषण असे म्हणतात.
प्रदूषके संकल्पना
जे घटक
परीसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणतात. आणि जैविक आणि अजैविक गताकांवर (
प्राणी, वनस्पती आणि मानवावर ) घातक परिणाम घडवून
आणतात. अशा घटकांना प्रदूषके असे म्हणतात. मोठ्या प्रमाणावर उद्योगांतून
प्रदूषकांचे उत्सर्जन वातावरणात झाल्याने पर्यावरण विषारी व प्रदूषित होते.
प्रदुषकांचे
दोन प्रकार पडतात नैसर्गिक प्रदूषके आणि मानवनिर्मित प्रदूषके . नैसर्गिक प्रदूषके
काठी ठराविक काळानंतर नष्ट होतात पण मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत.
४.औद्योगिक प्रदूषणाचे प्रकार
1. वायू
प्रदूषण2. जल
प्रदूषण3. मृदा
प्रदूषण4. जल
प्रदूषण
1. हवा प्रदूषण
:
धूर, विषारी
वायू, सूक्ष्मजीव, धुलीकण यांसारखे घटक हवा दुषित होण्यास कारणीभूत ठरतात यालाचे
हवा प्रदूषण असे म्हणतात.
उद्योगांना
मोठ्या प्रमाणावर उर्जेची आवश्यकता असते ही उर्जा मिळविण्यासाठी कोळशाचा मोठ्या
प्रमाणवर वापर केला जातो या कोळशाच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणवर प्रदूषणात भर पडली
आहे. उद्योगांत तयार होणारे विषारी वायू हे मोठ मोठ्या चिमण्यांच्या वाटे
वातावरणात सोडले जातात. हे वायू हवेत मिसळल्याने हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन
हवा प्रदूषित होते.
Ø सल्फर
डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, धूळ, कीडनाशके, मिथेन ही हवा
प्रदूषणाची प्रदूषके आहेत.
Ø हवा
प्रदुषणाचा परिणाम
· वनस्पतींवर
होणारा हवा प्रदूषणाचा परिणाम
§ पर्णछिद्रे
बंद होतात.§ प्रकाशसंशेल्षण
प्रक्रिया मंदावते.§ वनस्पतींची
वाढ खुंटते. पाने गळतात, पिवळी पडतात.§ प्राण्यांवर
होणारा परिणाम§ श्वसनावर
वाईट परिणाम होतो.§ डोळ्याचा
दाह होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
· वातावरणावर
होणारा परीणाम
§ ओझोन
थराचा नाश:
सूर्यापासून येणाऱ्या अतिनील
प्रकाशकिरणांपासून ओझोन थर पर्यावरणाचे रक्षण करतो.मात्र आज प्रदूषणामुळे ओझोन
थराचा ऱ्हास होऊ लागला आहे.
§ हरितगृह
परिणाम व जागतिक तापमानवाढ :
कार्बनडायऑक्साईड वातावरणामध्ये
कमी प्रमाणात उपलब्ध आहे पण तहीही सूर्यापासून निर्माण होणारी उष्णता मोठ्या
प्रमाणात शोषून घेण्याचे काम करतो. मागील शंभर वर्षांमध्ये औद्योगिक करणामुळे
वातावरणातील कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण
वाढले आहे; परिणामी पृथ्वीचे तापमान वाढत आहे.§ आम्लवर्षा:
आम्लयुक्त पावसामुळे मातीची व
पाण्याची आम्लता वाढते. यामुळे जलचर प्राणी, वनस्पती , पर्यायाने संपूर्ण
परीसंस्थेची मोठ्या प्रमाणवर हानी होते.इमारती , पुतळे, ऐतिहासिक
वास्तू, पूल तारेची कुंपणे, धातूच्या मूर्ती यांसारख्या गोष्टींचे क्षरण होते.
Ø हवा
प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय
§ कारखान्यातून,
उद्योगांतून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अनेक प्रकरचे दुषित कान असतात, त्यामुळे या
ठिकाणी हवा प्र अदुषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर करणे बांधण्कारक करावे.§ CFC
निर्मितीवर बंदी / बंधने आणावीत.
2. जल
प्रदूषण
नैसर्गिक किंवा मानवनिर्मित
घटकाच्या मिश्रानामे पाणी जेव्हा अस्वच्छ होते तेव्हा त्या पाण्यातील ऑक्सिजन चे
परमन कमी होते व त्यामुळे जलीय सजीवांना अपाय होतो, साथीच्या रोगांचा फैलाव होतो.
तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणतात.
Ø शैवाल,
जीवाणू, विषाणू, धुलीकण, शिसे, पार, आर्सेनिक, आणि किरणोत्सारी पदार्थांचे अंश ही
जलप्रदूषके आहेत.
Ø जल
प्रदूषणाची कारणे:
§ औद्योगिक
सांडपाणी: कापड, साखर, लोह, कागद, चर्मोद्योग, दुग्ध प्रक्रिया , यांसारख्या
उद्योगांतून, रसायने, पारा, शीशे, तंतू इत्यादी पाण्यात सोडले जातात त्यामुळे
जाल्प्रदुष्ण होते.
§ पाण्यातून
खनिज तेलाची वाहतूक करताना तेल सांडणे, गळती होणे, साफ सफाई करणे यामुळे पाण्यावर
तेलाचा थर जमा होतो परिणामी तेथील जलीय संस्थेवर घातक परिणाम होतो.
Ø जल
प्रदूषणाचे परिणाम
§ प्रदूषित
पाण्यामुळे अतिसार, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार, कवीळ यांसारखे विकार होतात.§ यकृत,
मूत्रपिंड, मेंदू विकार , उच्च रक्तदाब हे जलप्रदूषणाचे परिणाम आहेत.§ वनस्पतींची
वाढ खुंटते .§ पाण्यातील
असणाऱ्या क्षारांचे प्रमाण वाढते§ पाण्यात
विरघळणारया ऑक्सिजन चे प्रमाण घटते§ जलीय
संस्थांवर हानिकारक परिणाम होतात§ पाण्यामध्ये
असणाऱ्या उपयुक्त जीवजंतूंचा नाश होतो.§ जमिनीच्या
सुपिकतेमध्ये बदल घडून येतात.
Ø जल
प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय
§ उद्योगांतून
बाहेर पडणारे पाणी जसेच्या तसे पाण्याच्या स्त्रोतामध्ये न सोडता त्यावर प्रक्रिया
करून नंतरच ते पाणी उद्योगांतून बाहेर सोडावे.§ खनिज
तेलाची वाहतूक करत असताना होणाऱ्या तेल गळतीवर नियंत्रण मिळविणे.§ उद्योगांतून
बाहेर पडणारे अतिउष्ण पाणी थंड करून मगच जाल्त्रोतात सोडावे.
Ø मृदा
प्रदूषण
नैसर्गिक किंवा मानवी
कृत्यामुळे मातीतील रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्मात जे बदल घडून येतात,
त्यामुळे त्या जमिनीची उत्पादक क्षमता कमी होते. तेव्हा त्या जमिनीचे प्रदूषण झाले
असे म्हणतात.
Ø मृदा
प्रदूषणाची कारणे
§ उद्योगांतून
बाहेर पडणारे रासायनिक , प्रदूषित
प्रक्रिया न केलेले पाणी जसेच्या तसे बाहेर सोडल्यावर त्या पाण्यातील प्रदूषके आणि
रसायने जमितीत झिरपतात आणि त्यामुळे मृदा प्रदूषण होते.
§ कारखान्यातून
बाहेर सोडले जाणारे टाकावू तेल जमिनीवर पसरल्याने जमिनीत ऑक्सिजन मिसळण्यास अडथला
निर्माण होतो तसेच जमिनीत पाणी झिरपण्यास सुद्धा अडथळा निर्माण होतो. परिणामी मृदा
प्रदूषण होते.
Ø मृदाप्रदूषणाचे
परिणाम
§ कारखान्यातील
क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी, मातीत मिसळल्याने जमीन नापीक होते.§ किरणोत्सारी
पदार्थ तसेच इतर प्रदूषके मातीमधून पिके, मानव अशा अन्नसाखळीत प्रवेश करतात.§ मृदाप्रदूषणामुळे
जलप्रदूषणाचा धोका वाढतो. कारण विषारी द्रव्ये मातीत मिसळून भुजला मार्फत
पाणीसाठ्यात मिसळतात. तसेच जीव जंतूंमुळे रोगांचा प्रसार होतो.
Ø मृदा
प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय:
§ उद्योगांतून
बाहेर पडणारे रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी, जसेच्या तसे जमिनीत न सोडता त्यावर
योग्य त्या प्रक्रिया करून मगच ते पाणी पर्यावरणात सोडावे.§ किरणोत्सारी
पदार्थांची योग्य ती विल्हेवाट लावावी.§ कारखान्यातील
क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी, मातीत मिसळणार नाही याची काळजी घ्यावी.
Ø ध्वनी
प्रदूषण
मोठा आवाज हा आपल्या कानांना त्रास
देतो आणि मोठा आवाज आपल्याला ऐकायला नकोसा वाटतो. आवाजाची अशी उच्च तीव्रता ही गोंगाट
म्हणून ओळखली जाते. जेव्हा एका प्रमाणित पातळीपेक्षा जर आवाजाची तीव्रता जास्त असेल
तर त्याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात.
Ø ध्वनी
प्रदूषणाची कारणे
§ मोठ
मोठ्या उद्योगांमध्ये वापरलेली उपकरणे व यंत्रे ही ध्वनी प्रदूषणास कारणीभूत
ठरतात.§ उदा:
जनरेटर , एक्झोस्ट, कॉमप्रेशर, इत्यादी आणि फोल्डिंग, कटिंग, ग्राइंडिंग, इत्यादी
प्रक्रिया मोठ्या प्रमाणवर ध्वनी प्रदूषण करतात.§ सामानाची
वाहतूक करताना वाहनाचा आवाज फक्त त्याच्या चालण्यानेच होत नाही तर अनावश्यक हॉर्न
वाजवणे, गाडीच्या हलण्यामुळे , गाडीत असणाऱ्या सामानातून येणाऱ्या आवाजामुळे ध्वनी
प्रदूषण होते.§ उद्योगांमध्ये
समुद्राच्या तळाशी खाणकाम करताना सोनार या पद्धतीच्या वापर केल्यामुळे व्हेल, व डॉल्फिन
या माश्यांच्या संवादामध्ये अडथला निर्माण होतो. त्यांच्या अस्तित्वास धोका
निर्माण होतो.
Ø ध्वनी
प्रदूषणामुळे होणारे परिणाम
§ सतत
किंवा दीर्घकाळ मोठ्याने आवाज ऐकल्याने तात्पुरते किंवा कायमचे बहिरेपण येऊ शकते.§ उद्योगांमध्ये
मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीच्या कानातील ध्वनीपटलावर परिणाम
होऊन त्याला ऐकण्याच्या समस्या उद्भवू शकतात.§ ध्वनी
प्रदूषण एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम करते.§ ध्वनी
प्रदूषणामुळे ऐकण्यात अडथळा निर्माण होतो.§ ध्वनी
प्रदूषणाचा परिणाम हा फक्त माणसांवरच होत नाही तर त्याचबरोबर पशु – पक्षांवर देखील
होतो.
Ø ध्वनी
प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय
§ ध्वनी
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने व कायद्याने निश्चित केलेल्या आवाजाच्या
प्रमाणाचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.§ उद्योगांमधून
आवाज कमीत कमी कसा निर्माण होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
५.निरीक्षणे
Ø औद्योगिक
प्रदूषणाचे प्रकारवायू प्रदूषण
जल प्रदूषण
मृदा प्रदूषण
जल प्रदूषण
Ø प्रदूषण
नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्याजोगे उपाय§ कारखान्यातून,
उद्योगांतून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अनेक प्रकरचे दुषित कान असतात, त्यामुळे या
ठिकाणी हवा प्र अदुषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर करणे बांधण्कारक करावे.§ CFC
निर्मितीवर बंदी / बंधने आणावीत.§ खनिज
तेलाची वाहतूक करत असताना होणाऱ्या तेल गळतीवर नियंत्रण मिळविणे.§ उद्योगांतून
बाहेर पडणारे अतिउष्ण पाणी थंड करून मगच जाल्त्रोतात सोडावे.§ उद्योगांतून
बाहेर पडणारे रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी, जसेच्या तसे जमिनीत न सोडता त्यावर
योग्य त्या प्रक्रिया करून मगच ते पाणी पर्यावरणात सोडावे.§ किरणोत्सारी
पदार्थांची योग्य ती विल्हेवाट लावावी.
६.विश्लेषण
·
जगातील सर्वात जास्त प्रदूषित देश
|
औद्योगिक प्रदूषण प्रकल्प ११ वी ,१२ वी | Audyogik pradushn prakalp 11th 12th |
७.निष्कर्ष
Ø औद्योगिक
प्रदूषण संकल्पना समजून घेतली.Ø प्रदूषके
म्हणजे काय याबाबत सविस्तर माहिती संकलित केली.Ø औद्योगिक
प्रदूषणाचे प्रकार कोण कोणते आहेत याबाबतच्या माहितीचे संकलन केले.Ø औद्योगिक
प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास केला.Ø औद्योगिक
प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घटकांची माहिती घेतली.Ø प्रदूषण
कमी करण्यासाठीच्या उपाय-योजनांची सविस्तर माहिती करून घेतली.
८.संदर्भ
Ø पर्यावरण
पुस्तिका.
✂✂✂✂✂
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
Info!
प्रकल्प PDF FILE डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOD BUTTON क्लिक करा.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
Info!
प्रकल्प PDF PASSWORD डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOD BUTTON क्लिक करा.
Info!
नवीन प्रकल्पांचे NOTIFICATION मिळवण्यासाठी EDUCATIमराठी चे YOUTUBE CHANNEL SBSCRIBE करा.










